Buddha Dhamma in Marathi

संकल्प, कर्म, स्मृती, समाधी: Noble Eightfold Path In Marathi

संकल्प, कर्म, स्मृती, समाधी: Discover the Noble Eightfold Path in Marathi. Learn how right intention, action, mindfulness, and concentration guide the journey to spiritual enlightenment and a balanced life.

संकल्प, कर्म, स्मृती, समाधी: Noble Eightfold Path In Marathi

ज्या व्यक्ती थेट श्रवणाद्वारे समजू शकत नाहीत, त्यांना एखादी विधी दिली जाते. या विधीद्वारे सम्यक साधना केली जाते. बहुतांश लोक या दुसऱ्या मार्गाचा लाभ घेतात. या अंतर्गत पहिला उपाय असा:

दुसऱ्या उपायांतर्गत पहिला शब्द आहे: सम्यक संकल्प

भगवान बुद्धांनी जंगलात सहा वर्षे तपस्या केली. अचानक एके दिवशी त्यांनी संकल्प केला, जोपर्यंत मला ज्ञानप्राप्ती होत नाही, तोपर्यंत मी या वृक्षाखाली (बोधीवृक्ष) बैठक घालून बसेन, तिथून उठणारच नाही.

ती रात्र उलटल्यानंतर खरोखरच सकाळी त्यांना संपूर्ण ज्ञान प्राप्त झाले. अर्थात, त्यासाठी त्यांची तेवढी पूर्वतयारी झाली होती. त्यांनी संकल्प करून इच्छित फलप्राप्ती करून घेतली. तुम्हीही असा दृढ संकल्प करू शकणार का? ठाम निर्धार करणार का?

संकल्प केल्यानंतर किती फरक पडतो, हे एका उदाहरणाद्वारे समजून घेऊ या.

काही ज्येष्ठ नागरिकांना आजारपणामुळे वेगाने चालता येत नव्हते. ते अगदी हळूहळू चालायचे. त्यांच्या दोन पावलांत फार अंतर नसायचे. त्यांच्यावर डॉक्टरांनी एक प्रयोग केला. त्यात त्या रुग्णांसमोर एक रेष आखण्यात आली.

त्यांना या रेषेपलीकडे पावले टाकण्यास सांगण्यात आले. ज्या ज्येष्ठ लोकांना लांब अंतरांवर पावले टाकता येणे शक्य नव्हते, तेदेखील या रेषेपलीकडे पावले टाकण्यात यशस्वी झाले. त्यांना त्या रेषेपलीकडे जाण्याचे एक लक्ष्य, संकल्प दिला गेला. त्याप्रमाणे त्यांनी पावले उचलली आणि ते या प्रयत्नात यशस्वी झाले. यामागे काय कारण असावे?

या रेषेपलीकडे पाऊल टाकायचे, असा संकल्प त्यांनी केला आणि तो पूर्ण केला. जर एक छोटे लक्ष्य ठरवले, दृढ निश्चय केला, तर तोच निर्णय अथवा संकल्प फलदायी ठरतो. आपल्या शरीराच्या पेशींमध्ये विचारांमुळेच शक्तीचा संचार होतो. एखाद्या रुग्णाने ‘मला बरं व्हायचंय, मी बरा होणारच’ असा विचार वारंवार केला तर, त्याच्यात शक्तीचा संचार होतो.

आपले शरीर आजारी पडते, यामागे काय कारण असू शकते? कारण आपल्यासमोर कुठलेही ध्येय नसते. वयाची साठ वर्षे होताच वृद्धत्व येते… आता खूप जगून झाले आहे, असे विचार येऊ लागतात.

संकल्प, कर्म, स्मृती, समाधी Noble Eightfold Path In Marathi
संकल्प, कर्म, स्मृती, समाधी : Noble Eightfold Path In Marathi

या समजुतीमुळेच साठीनंतर लोकांना विविध प्रकारचे रोग-विकार होऊ लागतात. पण तेच लोक एका अशा समाजात राहिले, जिथे साठ वर्षांचे वय जास्त समजले जात नाही, सगळे सकारात्मक विचारांचेच लोक आहेत.

शिवाय आपल्या ध्येयपूर्तीसाठी कार्यरत आहेत. तेव्हा दृश्य कसे असेल बरे? संकल्प बदलल्यानंतर मनुष्याच्या अंतर्यामी नवीन स्फूर्ती निर्माण होते. माणसाने ठरवले तर तो संकल्पाद्वारे, जीवनस्फूर्तीद्वारे आपले वय वाढवू शकतो.

सत्यप्राप्तीचे ध्येय समोर असेल, तर जीवनात सत्य अवतरेलच. अशा प्रकारे बुद्धांनी दृढ संकल्प केल्यानंतरच त्यांना अंतिम सत्य प्राप्त झाले.

दुसऱ्या उपायांतर्गत दुसरा शब्द आहे: सम्यक कर्म, प्रयत्न

प्रयत्नांविना यश मिळत नाही, असे बुद्धांनी सांगितले आहे. एका उदाहरणातून हे समजून घेऊ या.

एक माणूस नोकरीसाठी मुलाखत देण्यास गेला. त्या वेळी त्याने आपल्या बॉसला विचारले, ‘मला किती पगार मिळेल?’ तेव्हा त्याला सांगितले गेले, सध्या दहा हजार रुपये पगार मिळेल आणि दहा महिन्यांनी त्याला वीस हजार रुपये पगार दिला जाईल.’ त्या वेळी तो माणूस म्हणाला, ‘मग मी दहा महिन्यांनंतरच नोकरीसाठी येतो!’

कुठल्याही प्रयत्नांविना, कष्टांविना आपल्याला जास्त पगार मिळावा, अशी त्या माणसाची इच्छा होती. पण विनाकष्ट यश मिळत नाही. नोकरी मिळत नाही. पगारही वाढत नाही.

दुसऱ्या उपायांतर्गत तिसरा शब्द आहे: सम्यक स्मृती

स्मृतीचा अर्थ आहे जागृती. आपल्या विचारांना पाहणे. आपल्या शरीराला बसलेले, आडवे पडलेले, चालताना-बोलताना पाहणे हा सम्यक स्मृतीचाच एक भाग आहे. जर रंगमंचावर एखादा पुरुष स्त्रीचे पात्र रंगवत असेल, तर त्या वेळी तो पुरुष असल्याचे विसरतो का?

ती स्त्रीची भूमिका साकारतानाही त्याला हे भान सतत असते, की तो पुरुष आहे. तसेच ‘कोण आहे,’ हे जेव्हा तुम्हांला उमगते, तेव्हा ही स्मृती सतत तुमच्या सोबत राहते. हनुमंतांनाही कुणी तरी आठवण करून द्यावी लागली, की तू एका उडीत समुद्र पार करू शकतो, आणि त्यांनी तसे केले.

दुसऱ्या उपायांतर्गत चौथा शब्द आहे: समाधी (मनाचे स्नान)

समाधीचा अर्थ आहे, आपल्या अंतरंगात डुबकी लावणे. आपल्या अंतर्यामी प्रवेश करणे. मनाला स्नान घालणे. प्रत्येकाची स्नानाची ठरावीक अशी वेळ व स्थळ असते. त्याचप्रमाणे मनाच्या स्नानाचीही वेळ आणि स्थळ निश्चित असायला हवे.

त्यामुळे तुमची त्यासाठी पूर्वतयारी होऊ शकेल. मनाचे स्नान म्हणजे मनाला निर्मळ, शुद्ध बनवणे. आपल्या मनाचे काम कसे चालते, हे जाणून घेणे. आपल्या मनाला जाणणे म्हणजे समजून घेणे. मन शुद्ध झाल्याने शांती, दृढता आणि आत्मविश्वास वृद्धिंगत होतो.

बाह्य जगात जेव्हा आपण वावरतो, तेव्हा कुणी न्यायाधीशाच्या, तर कुणी वकिलाच्या, इन्स्पेक्टरच्या, उद्योगपतीच्या, विद्यार्थ्याच्या, गृहिणीच्या भूमिकेत असतो. मग तो खरा कोण आहे? कारण मनुष्य आपल्या वरिष्ठांसमोर वेगळे वागतो, तर नोकरासमोर त्याची वर्तणूक वेगळी असते.

आईसमोर भिन्न असतो, मित्रांशी त्याचे वागणे वेगळेच असते, तर शिक्षकांसमोर निराळे असते. अशा प्रकारे प्रत्येकासमोर माणसाचा चेहरा वेगळाच असतो. मग त्याला त्याचा खरा चेहरा कधी समजेल ? मनाच्या स्नानानेच आपल्याला खरा चेहरा समजतो.

समाधीद्वारे मनुष्याची एकाग्रता वाढते आणि सम्यक समाधीद्वारे प्रज्ञेचा उदय होतो. समाधी साधना करताना पुढील पाच शत्रूपासून नेहमी सावध राहायला हवे :

१. साशंकता: स्वतःविषयी साशंकता, गुरूविषयी साशंकता किंवा साधनेच्या विधीविषयीच साशंकता.

२. तमोगुण, सुस्ती: आळसामुळे साधक समाधीसाधना टाळतो.

३. कामवा-सनेचे विचार: मनात उत्पन्न होणारे भोगविलासाचे विचार साधकास समाधीपासून परावृत्त करतात.

४. निराशेचे विचार: साधनेत आपण अपयशी ठरू, असे निराशाजनक विचार उद्विग्नता निर्माण करतात.

५. द्वेषपूर्ण विचार: कुणाशी शत्रुत्व असेल तर त्याच्या विचारानेही सूडभावना उत्पन्न होते.

सम्यक समाधीद्वारे या सर्व शत्रूपासून मुक्ती मिळते. मन निर्मळ होते. सहनशीलता, कार्यक्षमता, एकाग्रता, आरोग्य व निरपेक्ष कर्म करण्याची भावना प्रबळ होते.

You may like this: सम्यक दृष्टी: Right vision-Measure of Buddha’s Enlightenment

Follow our Podcast: Buddha Dhamma in Marathi

Conclusion on संकल्प, कर्म, स्मृती, समाधी: Noble Eightfold Path In Marathi

In conclusion, the Noble Eightfold Path, encompassing संकल्प (right intention), कर्म (right action), स्मृती (right mindfulness), and समाधी (right concentration), offers a comprehensive guide to achieving spiritual enlightenment and a balanced, harmonious life.

These principles, deeply rooted in Buddha’s teachings, provide a practical framework for overcoming suffering and fostering personal growth.

By integrating these elements into daily practice, individuals can cultivate wisdom, ethical conduct, and mental discipline, paving the way to inner peace and ultimate liberation.

The enduring relevance of the Noble Eightfold Path in Marathi culture underscores its timeless wisdom and its capacity to transform lives, guiding seekers on their journey towards enlightenment and a deeper understanding of the self and the world.

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *