Buddha Dhamma in Marathi

सम्यक दृष्टी: Right vision-Measure of Buddha’s Enlightenment

सम्यक दृष्टी: Explore the concept of Right Vision as a measure of Buddha’s enlightenment. Understand how this fundamental aspect of the Eightfold Path guides spiritual awakening and fosters a deeper understanding of life’s truths.

बुद्ध बोधाचा पहिला उपाय – सम्यक दृष्टी: Right vision (Measure of Buddha’s Enlightenment)

भगवान बुद्धांनी चार आर्य सत्यांसह आर्य अष्टांग मार्गाचाही प्रचार केला. ही आठ अंगे अशी:

  • (१) सम्यक दृष्टी
  • (२) सम्यक संकल्प
  • (३) सम्यक वाणी
  • (४) सम्यक कर्म
  • (५) सम्यक उपजीविका
  • (६) सम्यक व्यायाम
  • (७) सम्यक स्मृती
  • (८) सम्यक समाधी.

या आठ अंगांना तीन प्रकारच्या लोकांमध्ये विभागल्यास त्यांच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी तीन प्रकारचे उपाय सापडतील. या तीन प्रकारच्या लोकांपैकी पहिल्या प्रकारचे लोक जणू सुरुंगांवर बसलेले असतात. सत्याची सूक्ष्म ठिणगीही त्यांच्यात सत्यानुभवाचा विस्फोट घडवते. या प्रकारच्या व्यक्ती ज्ञानप्राप्तीसाठी सुयोग्य असतात. सत्याच्या एखाद्या संकेताद्वारेही त्यांना बोध प्राप्त होऊ शकतो.

दुसऱ्या प्रकारचे लोक हे वाळलेल्या लाकडाप्रमाणे असतात. त्यांच्यावर थोडी मेहनत घेतल्यास त्यांच्यात सत्याची ज्वाला प्रदीप्त होऊ शकते. काही विधींद्वारे सत्याची ही तृष्णा वाढवली जाऊ शकते. अशा लोकांसाठी काही कर्मे, प्रयत्न आणि विधी आवश्यक असतात.

तिसऱ्या प्रकारचे लोक ओल्या लाकडाप्रमाणे असतात. ते संसारात गुरफटलेले असतात. त्यापासून त्यांना थोडी मुक्ती हवी असते. अशा लोकांसाठी शील आणि सदाचाराचा मार्ग उपयुक्त ठरतो.

पहिला उपाय: समज (Understanding)

सम्यक दृष्टी: Right vision-Measure of Buddha's Enlightenment
सम्यक दृष्टी: Right vision-Measure of Buddha’s Enlightenment

भगवान बुद्धांनी पहिला उपाय सांगितला आहे- अंडरस्टॅण्डिंगचा, समजेचा, प्रज्ञेचा आणि सम्यक दृष्टीचा. ज्या व्यक्तींमध्ये सत्य सांगून ज्ञानप्राप्ती होण्याची शक्यता होती, त्यांना थेट सत्य सांगितले गेले. ज्यांना ते ऐकून समजले नाही, त्यांच्यासाठी वेगवेगळे विधी सांगितले गेले. बुद्धांनी जी पहिली पद्धत सांगितली, ती होती, सत्य श्रवणातून सम्यक दृष्टी मिळवणे.

ज्यांची ऐकायची पूर्ण तयारी झाली होती, त्यांना सत्य श्रवणातून आत्मसाक्षात्कार झाला. या मार्गाचा भगवान बुद्धांनी अनेकांवर प्रयोग केला. त्यांच्याबरोबर सत्य शोधार्थ निघालेले बुद्धांचे जे मित्र होते व अर्ध्यावरच त्यांना सोडून गेले, त्या पाच मित्रांना सत्य श्रवणातून आत्मसाक्षात्कार झाला.

बुद्धांच्या सत्य श्रवणाद्वारे थेट आत्मसाक्षात्काराची पात्रता निर्माण व्हावी म्हणून कौंडण्याने आपला व्यवसाय, घर आणि राज्य यांचा त्याग केला होता. भगवान बुद्धांची ज्ञानवाणी ऐकूनच कौंडण्य मुक्त झाले. बुद्धी आणि सम्यक विचारांच्या योग्य उपयोगाद्वारे प्रज्ञा (समज) प्राप्त होते. अन्यथा, सहज सरळ गोष्टीचे आकलनही आपल्याला होत नाही आणि आपण संभ्रमित होतो.

एका ज्येष्ठ महिलेचा गुडघा दुखत होता. त्यामुळे ती डॉक्टरांकडे गेली. ती डॉक्टरांना म्हणाली, ‘माझा गुडघा दुखतोय. त्यात नेहमी वेदना होत असतात.’ डॉक्टरांनी तिला त्यावरचे औषध दिले. त्या महिलेने या गुडघेदुखीचे कारण विचारले.

त्यावर डॉक्टर म्हणाले, ‘वृद्धापकाळामुळे गुडघे दुखतात.’ त्यावर त्या महिलेने विचारले, ‘माझ्या दोन्ही गुडघ्यांचं वय तर सारखंच आहे. मग एकच गुडघा का दुखतो?’ यावर डॉक्टर काय सांगत आहेत, हेच त्या ज्येष्ठ महिलेच्या लक्षात येत नाही.

यासाठीच जे सांगितले जात आहे, तसेच समजून घेतले जात आहे का? हे लक्षात घेणे गरजेचे आहे. ते जर योग्यरीत्या तसेच समजले गेले तर सत्य त्वरित तुमचे आयुष्य बदलून टाकेल. सत्य ऐकताच तुमच्यात हा बदल घडेल. आपले विचार हे आरशाप्रमाणे आहेत. त्यानुसारच आपल्या जीवनात घडामोडी घडत असतात. त्यामुळे सम्यक विचार ठेवावेत, असे बुद्धांनी सांगितले आहे.

एक वकील कोर्टात पिंजऱ्यात उभ्या असलेल्या आरोपीला म्हणाला, ‘तुझ्या जागी मला सैतान असल्याचा भास होतोय.’ वकील आपण चालवलेला खटला जिंकण्यासाठी काहीही करतात, त्यामुळे तो वकील असे म्हणाला असावा.

मात्र, त्याला उत्तर देताना तो आरोपी म्हणाला, ‘माझा चेहरा आरशाचं काम करतो, हे मला प्रथमच समजतंय…’ आपण जसा विचार करतो, तसे लोक आपल्याला दिसतात. आपण पूर्वग्रहांच्या चष्म्यातूनच लोकांकडे पाहत असतो. लोकांच्या प्रतिसादाकडेही आपण आपल्याच चष्म्यातून पाहतो. असे अनुमान आपल्याला सत्यापासून दूर नेतात.

सत्य नुसत्या श्रवणाने उमगू शकते, ही गोष्ट कुणी पहिल्यांदा ऐकली, तर त्यांचा विश्वासच बसत नाही. ते विचार करतात, की सत्य केवळ ऐकल्याने उमगू शकते, तर ते आपण फोनवर ऐकू या. जशी बंदुकीची गोळी आपण हाताने फेकून मारली तर निष्प्रभ ठरते.

तिचा योग्य परिणाम ती बंदुकीतून सुटल्यानंतरच घडतो. तसेच सत्य जेव्हा सत्संगात ऐकले जाते, तेव्हाच त्याचा परिणाम घडतो. फोनवर हे कसे शक्य आहे? सत्य श्रवणाद्वारे अहंकाराचा कर्ताभाव नाहीसा होतो.

सत्य श्रवणानंतरही काही परिणाम होत नसेल तर ते निरुपयोगी ठरते. त्यासाठी पूर्वतयारी आवश्यक असते. त्याद्वारे श्रावक सत्य श्रवण करण्याची क्षमता योग्यरीत्या प्राप्त करतो. सत्य ऐकताच खोट्या ‘मी’चा मृत्यू होतो. सत्य जाणण्यासाठी चुकीच्या धारणा, समजुतींचे अडथळे हटवणे गरजेचे असते. हे अडथळे दूर झाल्यावर सत्य प्रकाशात येऊ लागते.

या धारणा, पूर्वग्रह समोर येताच त्यांच्यापासून मुक्ती, बोध सहजपणे मिळू शकतो. हा बोध कसा मिळवायचा याचा दुसरा उपाय पुढील ब्लॉग पोस्ट मध्ये पाहू या.

You may like this: बौद्ध धम्म जिज्ञासा | Curiosity About Buddhism In Marathi

Follow our Podcast: Buddha Dhamma in Marathi

Conclusion on सम्यक दृष्टी: Right vision-Measure of Buddha’s Enlightenment

In conclusion, सम्यक दृष्टी (Right Vision) is a cornerstone of Buddha’s enlightenment, serving as the foundational step in the Noble Eightfold Path.

This right understanding of reality and the nature of existence is crucial for spiritual development and liberation from suffering. By embracing सम्यक दृष्टी, individuals can cultivate a clear, compassionate, and mindful perspective, enabling them to navigate life’s challenges with wisdom and equanimity.

The teachings of Buddha on Right Vision continue to resonate, offering timeless guidance for those seeking enlightenment and a deeper connection to the truth.

Through this profound measure of enlightenment, we can aspire to live more meaningful and harmonious lives, rooted in the principles of compassion, wisdom, and inner peace.

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *