उपासकांसाठी: सम्यक व्यायाम – Discover Buddha’s teachings on Right Effort in Marathi. Learn how to cultivate positive mental states and overcome negativity through dedicated practice on the Noble Eightfold Path.
उपासकांसाठी: सम्यक व्यायाम Buddha’s Teaching on Right Effort
स्त्री-पुरुष, तरुण, गृहस्थ, व्यापारी, राजा, राजकारणी, भिक्षू आदींसाठी भगवान बुद्ध वेगवगळ्या प्रकारे उपदेश देत असत. त्यांनी प्रत्येकाला ज्ञानदान करण्याची व्यवस्था तयार केली.
त्यांच्याकडे ज्ञानप्राप्तीसाठी आलेल्या साधकांची विभागणी त्यांनी दोन भागांत केली. एका भागाचे नाव त्यांनी ‘भिक्षू’ किंवा ‘श्रमण’ ठेवले, तर दुसऱ्याचे नाव ‘उपासक’. भिक्षूनी संघात राहून दीक्षा घेतली.
संन्यस्त होऊन त्यांनी ध्यानसाधना आणि भिक्षा मागणे सुरू केले. उपासकांनी गृहस्थाश्रमात, संसारात राहून पंचशीलांचे पालन करत, शील आणि सदाचाराचे जीवन अवलंबले. या उपासकांना ज्ञानदान करताना भगवान बुद्धांनी त्यांना सम्यक व्यायामावर मार्गदर्शन केले.
प्रत्येक व्यक्तीला शारीरिक व्यायामासह सम्यक व्यायामाची गरज असते. व्यायाम म्हणजे विविध प्रकारच्या शारीरिक कसरती, मुद्रा. सम्यक व्यायाम म्हणजे विवेकपूर्ण मानसिक कसरत. मन जेव्हा चुकीच्या वृत्तींमुळे दुर्बळ बनते, तेव्हा त्याला सम्यक व्यायामाची खूप गरज असते. कमकुवत मनामुळे माणूस दुःखाच्या खोल गर्तेत जाण्याचा धोका असतो.
परंतु हेच मन निरोगी होऊन मोक्ष मिळवण्यास मदत करू शकते. या मनाला योग्य दिशा देण्यासाठी थोडा व्यायाम करण्याची गरज असते. रिते मन किंवा कुठलेही ध्येय नसलेले मन सैतानाचे घर मानले जाते. प्रत्येक व्यक्तीने मनासाठी पुढे दिलेले चार व्यायाम करणे गरजेचे आहे :
१. आपल्यात कुठलेही दुर्गुण नाहीत ना, याची खातरी करा. ते नसल्यास आगामी काळात आपल्यात ते दुर्गुण येणार नाहीत, यासाठी सदैव सावध-सजग राहिले पाहिजे. या दुर्गुणांना, वृत्तींना आणि चुकीच्या सवयींना रोखण्याचा व्यायाम हा पहिला व्यायाम आहे.
आपल्यात काही दुर्गुण असल्यास, त्यांना जाणीवपूर्वक हटवण्याचा व्यायाम करावा. संयम आणि साहसाने या दुर्गुणांतून, वृत्तींतून आणि वाईट सवयींतून मुक्त होता येते. या दुर्गुणांमुळे माणसाचे अधःपतन होते. त्यामुळे हा दुसरा व्यायाम खूप गरजेचा आहे. पंचशीलांचे पालन या व्यायामाला साहाय्यक ठरते. हे पंचशील
पंचशील पुढीलप्रमाणे:
१. खोटे न बोलणे किंवा सदैव सत्याच्या मार्गावर चालणे.
२. हिंसा किंवा कुणाची हत्या न करणे. कुठल्याही सजीवाला भाव, विचार, वाणी किंवा कृतीद्वारे दुःखी करू नये.
३. चोरी करू नये किंवा परक्याची वस्तू आपल्या ताब्यात ठेवू नये.
४. नशा, अमली पदार्थांचे व्यसन करू नये. जुगारापासून नेहमी दूर राहावे.
५. परस्त्रीची अभिलाषा करू नये. व्यभिचारास अथवा भोगविलासास बळी पडू नये.
प्रत्येक व्यक्तीने स्वतःसाठी नियम आणि पंचशील पालनाच्या मर्यादा आखून घ्याव्यात. यामुळे आपले पतन होत आहे की उन्नती, हे त्याच्या लक्षात येईल. जी व्यक्ती जीवनाचे नियम आणि पंचशील समजून घेत नाही, तिची कधीही प्रगती होत नाही.
ती व्यक्ती सदैव दुःखाच्या खोल गर्तेत फसत जाते. ज्या व्यक्तीला आपले पतन होत आहे, याची जाणीव होते, ती आज ना उद्या पंचशीलपालनाचा संकल्प करून आपल्या जीवनाचे उन्नयन करू शकते.
तुम्ही जेव्हा स्वतःसाठी यम-नियम, शीलाचरण निश्चित कराल, तेव्हा स्वतःला एक प्रश्न विचारा, या नियमपालनामुळे माझे हित साधले जाणार आहे ना? दुसरा प्रश्न असा विचारा, या नियमपालनामुळे दुसऱ्याचे नुकसान तर होत नाही ना?
जेव्हा पहिल्या प्रश्नाचे उत्तर होकारार्थी येईल आणि दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर नकारार्थी येईल तेव्हा आपण योग्य नियम बनवले आहेत, असे समजण्यास हरकत नाही. उदाहरणार्थ, चोरी करण्यात माझे हित आहे का? किंवा चोरी न केल्याने इतरांचे नुकसान होईल का?
२. दुसऱ्या प्रकारच्या व्यायामात आपण श्रेष्ठ जीवनाचा प्रारंभ करतो. मनाला अशांत करणाऱ्या सवयींपासून आपण स्वतःला वाचवतो. आपल्या अंतरंगात आपले उन्नयन होते की पतन, याचे सदा स्मरण राहते.
उदाहरणार्थ, शिवीगाळ, निरर्थक गप्पा, चहाडी-चुगली, इतरांची टीका करणे अशा प्रकारांमध्ये गुंतू नये, याची आपल्याला जाणीव होते. अशी जाणीव होणे, अतिशुभ आहे. त्यामुळे आगामी काळात संकल्प करून या सवयींतून स्वतःला मुक्त करण्याचा व्यायाम तुम्ही कराल.
३. आपल्यात काही गुण असणे आवश्यक आहे. सत्याच्या यात्रेत हे गुण आपल्याला खूप उपयुक्त ठरतात. उदाहरणार्थ, आत्मसंयमन, कट-कारस्थान-कपटविरहित मधुर संवाद साधणे, सर्वांशी नम्रतेने आणि संयमाने वागणे, शरीराची कार्यक्षमता वाढवणे, शरीराला शिस्तीत, साधनेत ठेवणे, काम वेळेत संपवणे, रुग्णांची सेवा करणे इत्यादी.
या गुणांमुळे आपण लोकांपासून, शरीरापासून, विचारांपासून होणाऱ्या अनेक प्रकारच्या त्रासांपासून वाचतो. आपल्या वेळेची बचत होऊन आपण तो ध्यानसाधनेत लावू शकतो.
तिसऱ्या व्यायामात तुम्ही स्वतःमधील गुणांची पडताळणी करा. यातील कोणते गुण आपल्यात नाहीत, ते लवकरात लवकर आत्मसात करण्याचा संकल्प करा.
४. लोकांकडून शिकण्यासारखे अनेक गुण असतात. तुमच्यातही अनेक गुण आहेत, ते ओळखणे आवश्यक आहे. त्या गुणांचा उपयोग करून घेता आला पाहिजे. या गुणांना अभिव्यक्त करताना आपली उन्नतीही झाली पाहिजे. हे गुण सदा आपल्यात राहतील, यासाठी व्यायाम करायला हवा. हे गुण रोखण्याव्यतिरिक्त त्यांचे संवर्धन म्हणजेच विकासही करायला हवा.
You may like this: वाणी, व्यवहार आणि व्यापार: 8 Fold Path In Buddhism Marathi
Follow our Podcast: Buddha Dhamma in Marathi
Conclusion on उपासकांसाठी: सम्यक व्यायाम Buddha’s Teaching on Right Effort
In conclusion, सम्यक व्यायाम (Right Effort) is a vital aspect of Buddha’s teachings, emphasizing the importance of diligently cultivating positive mental states and eradicating negative ones.
For उपासक (devotees), embracing Right Effort involves consistent and mindful practice, promoting personal growth and spiritual development.
By focusing on this principle, individuals can foster resilience, enhance their inner strength, and progress along the Noble Eightfold Path.
Buddha’s guidance on Right Effort remains timeless, offering profound insights for overcoming life’s challenges and achieving lasting peace and enlightenment.
Through dedicated practice and unwavering commitment, उपासक can transform their lives, embodying the core values of Buddhism and inspiring others on their spiritual journey.
One Comment