वाणी, व्यवहार आणि व्यापार: Explore the 8 Fold Path in Buddhism in Marathi. Learn how right speech, conduct, and livelihood guide ethical living and spiritual growth in the Buddhist tradition.
वाणी, व्यवहार आणि व्यापार: 8 Fold Path In Buddhism Marathi
जे गृहस्थ आहेत, ज्यांच्याकडे ध्यानसाधना अथवा मनन करण्यासाठी वेळ नाही, त्यांच्यासाठी तिसरा आवश्यक उपाय सांगितला गेला आहे.
उच्चार: सम्यक वाणी
दिवसभर आपण उच्चारत असलेल्या शब्दांचा, भाषेचा योग्य उपयोग केला पाहिजे. अयोग्य शब्दांचा उपयोग करू नये. शब्दांचा अयोग्य उपयोग केल्याने आपली शब्दांची शक्ती कमी होत जाते. आपल्या बोलण्याची पद्धतच अशी असावी, की समोरच्याला वाईट न वाटता, तुम्हांला जे सांगायचे आहे ते त्याच्यापर्यंत पोहोचले पाहिजे.
तुम्ही शब्दांचा ज्या प्रकारे वापर करता, तसेच विचार तुमच्या मनात निर्माण होण्यास सुरुवात होते. त्यामुळे तुमच्या वाणीतून शिवी, चहाडी, वाईट भाषा, निंदा, व्यंग, असत्य इत्यादी गोष्टींचा वापर टाळायला हवा.
एकदा, एका व्यक्तीच्या घरी वीज-उपकरणांच्या दुरुस्तीसाठी एक इलेक्ट्रिशियन आला. काम पूर्ण केल्यानंतर दीडशे रुपयांचे बिल देऊन तो म्हणाला, ‘आता पैसे दिले तर दीडशे रुपये होतील; पण पुढच्या आठवड्यात बिल भरल्यास दोनशे रुपये होतील.’ हे ऐकून आपल्याला उगाचच भुर्दंड का भरावा लागतोय, याचे त्या घरमालकाला वाईट वाटले.
पण, हीच बाब त्या इलेक्ट्रिशियनला वेगळ्या पद्धतीनेही सांगता आली असती. तो जर असे म्हणाला असता, ‘आपलं बिल दोनशे रुपये झालं आहे; लगेच ते भरलं तर आपल्याला फक्त दीडशे रुपये द्यावे लागतील’ तर हे ऐकून समोरच्या व्यक्तीला समाधान वाटले असते. खरे तर यात कुठलीच नवीन गोष्ट सांगितलेली नाही.
फक्त सांगण्याच्या शैलीत फरक केला गेला आहे. त्यामुळे समोरच्या व्यक्तीलाही वाईट वाटत नाही आणि आपलेही काम सहज होते. जर कुणी आरडाओरडा करत असेल, तर ‘ओरडू नका’ असे सांगण्याऐवजी ‘हळू आवाजात बोला’ असे सांगितल्यास फरक पडतो. ‘ओरडू नका’ हे नकारात्मक वाक्य आहे. पण ‘हळू आवाजात बोला’ हे सकारात्मक वाक्य आहे.
आचरण: सम्यक व्यवहार
आचरण म्हणजेच व्यवहार. आपल्या व्यवहारात चोरी, नशा, व्यभिचार, जुगार, हत्या आदी कुकर्मांना स्थान असता कामा नये. या गोष्टींपासून दूर राहिल्यास मन शांत होऊ शकते. शांत मनच अंतर्शोध घेऊ शकते.
अशांत मन विवेक नष्ट करतो. योग्य आचरण, सम्यक कर्माचे फळ परिपक्व होताच सुख आपोआप माणसाच्या जीवनात प्रवेश करते. वाईट कर्माचे फळ मिळण्यापूर्वीच मूर्ख व्यक्ती आनंद साजरा करते; पण पापाचे फळ मिळाल्यावर दुःखी होऊन ती आणखी मूर्खपणा करू लागते.
व्यापार: सम्यक उपजीविका
बुद्धांनी तिसरा शब्द वापरला, संचार-व्यापार. ज्याला सध्या व्यवसाय म्हणतात. माणसाला जगण्यासाठी अन्न, वस्त्र आणि घर यांची गरज असते. शिवाय, या सर्वांसाठी पैसा आवश्यक असतो. पैसे कमावण्यासाठी नोकरीची किंवा व्यवसायाची गरज असते.
मात्र, ही उपजीविका दुःख निर्माण करणारी नसावी. उपजीविकेचा असा मार्ग निवडा, ज्यामुळे सुख-समाधान आणि गुणांचा विकास होण्यास मदत होईल. तुम्ही मद्यविक्रीचा व्यवसाय करत असाल, तर ते मद्य पिणाऱ्यांच्या घरी कुरबुरी-भांडणे-संघर्ष होणार, हे निश्चित.
त्यामुळे लोकांचे नुकसान होणार नाही, असा व्यवसाय करा. तुमचा व्यवसाय तुमच्या ग्राहकांच्या घरातील शांती भंग करणारा नसावा. स्फोटके, पिस्तूल, मांस, शिकार, चरस-गांजा यांसारख्या अमली पदार्थांच्या व्यापारापासून स्वतःला नेहमी दूर ठेवा.
या तिन्ही उपायांसह सम्यक व्यायामही आवश्यक आहे. सम्यक व्यायामाविषयी पुढील ब्लॉग पोस्ट मध्ये विस्तारपूर्वक जाणून घेऊ या.
You may like this: संकल्प, कर्म, स्मृती, समाधी: Noble Eightfold Path In Marathi
Follow our Podcast: Buddha Dhamma in Marathi
Conclusion on वाणी, व्यवहार आणि व्यापार: 8 Fold Path In Buddhism Marathi
In conclusion, वाणी (right speech), व्यवहार (right conduct), and व्यापार (right livelihood) form essential components of the Eightfold Path in Buddhism, guiding individuals towards ethical living and spiritual growth.
These principles emphasize the importance of integrity, kindness, and mindfulness in our daily interactions and professional lives. By adhering to these guidelines, we cultivate a life of harmony, reduce suffering, and progress on the path to enlightenment.
The teachings of the Eightfold Path, deeply embedded in the Buddhist tradition, continue to offer profound wisdom and practical guidance for leading a balanced and meaningful life.
Embracing these principles in the Marathi context reinforces their timeless relevance and transformative power, helping individuals navigate life’s challenges with compassion and clarity.
One Comment