Buddha Dhamma in Marathi

बुद्धांचा मध्यम मार्ग: The Buddha’s Middle Way In Marathi

बुद्धांचा मध्यम मार्ग: Discover the Buddha’s Middle Way in Marathi. Learn how this balanced approach to life and spirituality fosters harmony, avoiding extremes, and guiding towards enlightenment.

बुद्धांचा मध्यम मार्ग: The Buddha’s Middle Way In Marathi

भगवान बुद्धांनी आपल्या साधनेच्या सुरुवातीच्या काळात टोकाचा मार्ग अवलंबला होता. राजवाड्यात राहून भोगविलासाचा अतिरेक त्यांनी अनुभवला होता. जंगलात खडतर तप करताना त्यांनी अतिशय शारीरिक त्रास सहन केला.

हे दोन्ही टोकाचे अनुभव घेतल्यानंतर खूप शारीरिक त्रास, वेदना सहन केल्याने पापे नष्ट होतात या धारणेला बुद्धांनी छेद दिला.

टोकाची अवस्था माणसाला आवडते. पण त्यामुळे तो निसर्गापासून दूर जातो. निसर्गापासून दूर होऊन तो आजार आकर्षित करतो. भोजन करताना स्वादिष्ट पदार्थांच्या मोहात पडून तो हे पदार्थ गरजेपेक्षा जास्त प्रमाणात खातो.

अशा प्रकारे अतिभोजन करून मनुष्य आपले आरोग्य बिघडून टाकतो. अन्यथा, भोजन न करण्याचा संकल्प करून, तो दुसरे टोक गाठतो.



बुद्धांचा मध्यम मार्ग The Buddha's Middle Way In Marathi Image
बुद्धांचा मध्यम मार्ग The Buddha’s Middle Way In Marathi Image

प्रसेनजित राजा खवैय्या होता. त्याला खाण्याची खूप आवड होती. जेव्हा त्याने बुद्धांकडून दीक्षा घेतली, तेव्हा मध्यममार्गाचा अवलंब केला. सुरुवातीला हा मार्ग त्याला कठीण वाटला. म्हणून बुद्धांनी त्याला उपदेश दिला, भरपेट खाऊन झोपलेल्या डुकराप्रमाणे निद्रिस्त राहणे, सुस्त राहणे मूर्खपणा आहे.

अधिक भोजन केल्याने रोग सतावतात आणि त्रास होतो. मात्र संयमाने योग्य प्रमाणात आहार घेणे हे बुद्धिमान माणसाचे लक्षण आहे. मिताहार करणाऱ्या व्यक्तीचा वृद्धापकाळ तुलनेने लवकर येत नाही. शिवाय, अनेक शारीरिक व्याधींपासून त्याचा बचाव होतो.

प्रसेनजित राजाने आहाराच्या बाबतीत मध्यम मार्ग साधण्याचे अनेक प्रयत्न केल्यानंतरही त्याला अपयश आले, तेव्हा बुद्धांनी त्यांचा भाचा सुदर्शनला या कामासाठी त्याला सतर्क करण्याची आज्ञा दिली. दर वेळी जास्त आहार घेतल्याबद्दल प्रसेनजित राजाकडून हजार नाणी दंड वसूल केला जात असे. अशा प्रयत्नातून अखेर त्यांचे वजन कमी झाले.

जास्त खाण्याने माणूस निसर्गापासून दूर जातो, कारण तो निसर्गनियमांचे उल्लंघन करतो. ही सृष्टी सदैव समतेच्या तत्त्वावर चालते. जेव्हा उष्णता वाढते, तेव्हा पावसाद्वारे समतोल राखला जातो.

माणसाची हीच सवय प्रत्येक बाबतीत काम करते. तो एक तर खूप झोप घेतो किंवा खूप कमी झोपतो. खूप गरम अन्न खातो किंवा थंड पेय पितो. अशा प्रकारचा आहार घेतल्यानंतर माणसाच्या शरीरात उन्माद, उत्तेजना निर्माण होते. ही उत्तेजना माणसाला हवीहवीशी वाटते. मग त्याची हीच सवय हळूहळू व्यसनात रूपांतरित होते.

त्यामुळे खूप गरम किंवा खूप थंड खाण्याची आवड माणसात निर्माण होते. असे मनाजोगते खाणे न मिळाल्यास माणूस संतप्त होतो. त्यामुळे भोजनासंदर्भात असा अतिरेक करू नये. कुठलाही अतिरेक वाईटच ‘अति सर्वत्र वर्जयेत’.

व्यायाम करणे आरोग्यास हितकारक आहे; पण दिवसभर व्यायाम करणे योग्य नाही. जगण्यासाठी आहार गरजेचा आहे; मात्र आहारासाठी जगणे योग्य नाही. एखादी व्यक्ती जेव्हा कुठल्याही गोष्टीचा अतिरेक करते, तेव्हा त्या व्यक्तीला ‘मुडी’, सणकी म्हटले जाते. ती व्यक्ती कुठल्याही बाबतीत अतिरेक करत असेल, तर अशा व्यक्तीचा विकास संतुलित न होता एकतर्फी होतो.

ज्या व्यक्तीला आपला संपूर्ण विकास साधायचा आहे, ती कधीही अतिरेक करत नाही. सम्यक आहार, सम्यक व्यायाम, सम्यक आराम आणि सम्यक उपजीविका हे संतुलित, निरोगी आणि समाधानी जीवनासाठी अमृत आहे.

अति भोजन, अति काम, अति आराम आणि अति विचार हे संतुलित, निरोगी आणि समाधानी जीवनासाठी विषासमान आहेत. त्यामुळे कधीही अतिरेक न करता मध्यम मार्गाचा अवलंब करा.

You may like this: उपासकांसाठी: सम्यक व्यायाम Buddha’s Teaching on Right Effort

Follow our Podcast: Buddha Dhamma in Marathi

Conclusion on बुद्धांचा मध्यम मार्ग: The Buddha’s Middle Way In Marathi

In conclusion, बुद्धांचा मध्यम मार्ग (The Buddha’s Middle Way) offers a balanced and harmonious approach to life and spirituality, steering clear of extreme asceticism and indulgence.

This profound teaching emphasizes moderation and mindfulness, guiding individuals towards a path of inner peace and enlightenment.

By adopting the Middle Way, practitioners can navigate life’s challenges with wisdom and equanimity, cultivating a deeper understanding of themselves and the world around them.

The relevance of बुद्धांचा मध्यम मार्ग in Marathi culture highlights its timeless applicability and transformative potential.

Embracing this path encourages a life of balance, compassion, and spiritual fulfillment, embodying the essence of Buddha’s teachings and inspiring others on their journey towards enlightenment.

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *