Buddha Dhamma in Marathi

19. Buddha Story on Temperament: आपला खरा स्वभाव जाणा

Buddha Story on Temperament in Marathi: आपला खरा स्वभाव जाणा – Discover the enlightening story of Buddha in Marathi, focusing on understanding one’s true nature. Learn how Buddha’s teachings guide self-discovery and spiritual growth.

आपला खरा स्वभाव जाणा: Buddha Story on Temperament in Marathi

कौशलचा राजा प्रसेनजितकडे पायेक्का नावाचा एक हत्ती होता. तो आपली ताकद, शौर्य आणि साहस यांसाठी प्रसिद्ध होता. हा हत्ती विशाल, बुद्धिमान आणि चलाख होता. त्या हत्तीला प्रसेनजित राजाची शान मानले जात असे. प्रसेनजित महाराज त्या हत्तीवर बसून युद्धमोहिमेवर गेले तर युद्ध तेच जिंकत.

त्या वेळी कुठलेच सैन्य त्यांना हरवू शकत नव्हते, अशी त्याची ख्याती होती. पायेक्का हत्तीचा चीत्कार ऐकूनच शत्रुसेनेची दाणादाण उडत असे, पळापळ होत असे. शत्रुसैन्याने अनेकदा त्या हत्तीला मारायचा प्रयत्न केला, पण त्यांना नेहमीच अपयश आले होते.

कालांतराने हा हत्ती आणि त्याचा माहूतही वृद्ध झाल्याने सेवानिवृत्त झाला. एकदा हा हत्ती तलावात डुंबायला गेला आणि दलदलीत फसला. त्याने या दलदलीतून बाहेर पडण्यासाठी खूप शक्ती पणाला लावली. पण जेवढी शक्ती त्याने पणाला लावली, तेवढा तो दलदलीत अधिकच फसत गेला. नव्या माहुताने त्या हत्तीला बाहेर काढण्यासाठी हरतऱ्हेचे उपाय योजले.

Buddha Story on Temperament: आपला खरा स्वभाव जाणा
Buddha Story on Temperament: आपला खरा स्वभाव जाणा

पण काही फायदा झाला नाही. आपली ही दुर्दशा पाहून त्या हत्तीलाही रडू कोसळले. प्रसेनजित महाराजांना ही बातमी समजल्यावर ते तातडीने त्या तलावापाशी पोहोचले. आपल्या सर्वात प्रिय हत्तीची अशी दुर्दशा पाहून त्यांनाही अतीव दुःख झाले. संध्याकाळ होईपर्यंत ही बातमी सर्व नगरामध्ये पसरली आणि त्या तलावापाशी मोठी गर्दी झाली.

त्या काळात हत्तीचा जुना माहूत सेवानिवृत्त झाल्यानंतर भगवान बुद्धांकडून दीक्षा घेऊन अनाथपिंडकाच्या जेतवनाराममध्ये राहत होता. त्या वेळी तो बुद्धांचे प्रवचन ऐकत होता. हा हत्ती दलदलीत फसल्याची बातमी बुद्धांपर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी त्या माहताला हत्तीची सुटका करण्यासाठी पाठवले. त्या हत्तीला दलदलीत असे अडकलेले पाहून माहुताला सुरुवातीला हसू आले.

प्रथम तो खळखळून हसला. नंतर त्याने युद्धाचा बिगूल वाजवण्यास सांगितले. रणवाद्याचा आवाज ऐकून तो हत्ती एवढ्या जोरात चीत्कारला, की त्याचा आवाज त्या सगळ्या परिसरात निनादला.

तेथील लोकांनी खूप वर्षांनी हत्तीचा असा चीत्कार ऐकला. आणि काय आश्चर्य… तो हत्ती चीत्कारतच चपळपणे आपल्या खास शैलीत त्या दलदलीतून असा बाहेर पडला, जणू त्या तलावात दलदल नव्हतीच !

त्या गर्दीत बुद्धांचे काही भिक्षूही होते. त्यांनी भगवान बुद्धांना त्या माहुताच्या हसण्याचे आणि बिगूल वाजवण्यामागचे कारण विचारले. त्या दिवशी बुद्धांनी याच घटनेचा आधार घेत सर्वांना मार्गदर्शन केले.

त्यांनी सर्वांना समजावून सांगितले, ‘तो माहूत यासाठी हसला, की या महान हत्तीची ख्याती शेकडो मैल दूरवर पसरली आहे. तरीही तो हत्ती अडकला कुठे, तर एका तलावाच्या दलदलीत ! शिवाय, आपण महान हत्ती आहोत, आजवर अनेक युद्धं जिंकलेली, याचं त्या हत्तीला विस्मरण तरी कसं झालं?

त्या हत्तीला आपला मूळ स्वभाव आठवावा म्हणून बिगूल वाजवायला सांगितलं गेलं. बिगुलाचा आवाज ऐकून आपण दलदलीत फसलो आहोत, याचंच त्या हत्तीला विस्मरण झालं.

काही क्षणांसाठी त्याला आपण युद्धमोहिमेवर निघालो आहोत, असं वाटलं. त्यामुळे त्यानं आपली उरलीसुरली सर्व ताकद, सर्व ध्यान युद्धावर केंद्रित केलं आणि तत्क्षणी तो त्या दलदलीतून बाहेर पडला.’

बुद्ध पुढे म्हणाले, ‘या हत्तीची अवस्था पाहून आपणही काही गोष्टी शिकल्याच पाहिजेत. सर्वाधिक बलवान तरुणही एके दिवशी वृद्धापकाळामुळे शक्तिहीन होतो. जसं, एके काळी धनाढ्य असलेले लोक कालांतरानं निर्धन होतात.

कारण या जगात काहीही नित्य नाही. कायमस्वरूपी टिकणारं नाही. ज्या वासनांची सवय आपण तरुणपणी स्वतःला लावतो, त्याच सवयी वृद्धापकाळी प्रबळ होऊन प्रकटतात. तो हत्ती तारुण्यातही त्या तलावावर डुंबायला जात असेल. त्या वेळी त्याच्यात प्रचंड शक्ती असल्यानं तो दलदलीत फसला नाही.

परंतु वृद्धापकाळातही त्या तलावात जाऊन डुंबण्याच्या सवयीतून हत्ती मुक्त झाला नाही. त्यामुळे या भ्रमात कधीही राहू नका, की तारुण्यात व्यसन वगैरे करून म्हातारपणी ते सोडून देता येईल, ही गोष्ट फार कठीण असते.’

बुद्ध म्हणाले, ‘माहुतानं बिगूल वाजवून हत्तीला त्याच्या स्वभावाचं स्मरण करून दिलं- तो एक महाबलवान हत्ती असल्याची. आपल्या अंगातील ताकदीच्या मदतीनं दलदलीतून सहज बाहेर येता येईल, याची आठवण त्याला करून देण्यात आली. या जगात नित्य काही नाही, सर्व अनित्य आहे, या उपदेशाचा मीदेखील बिगूल वाजवत असतो.

तुम्ही या भवसागराच्या चिखलातून जन्म-मरण, रोग-वृद्धत्वाच्या दुःखकारक दलदलीतून नक्की बाहेर येऊ शकता. तुम्ही जर आपली सर्व शक्ती, सगळं ध्यान राग, द्वेष, चिंता, भयविकारांना हटवण्यासाठी पणाला लावलं, तर लवकरच जागृत होऊ शकाल. त्यासाठी आपली इच्छाशक्ती मजबूत करा आणि या भवसागररूपी दलदलीतून बाहेर पडा…’

या घटनेतून आपल्याला हेही समजते, की भगवान बुद्धांसारखे खरे मार्गदर्शक आपल्या शिष्यांना स्वर्गाची लालुच किंवा नरकाचे भय दाखवत नव्हते. ते शिष्यांना त्यांच्या खऱ्या स्वभावाचा परिचय करून देत होते.

ते नेहमी सर्वांना योग्य मार्गच दाखवत, ज्यायोगे त्या मार्गावरून चालताना लोक निर्वाणाचा परमानंद मिळवू शकतील. शिवाय जीवनातील दुःख आणि कर्मबंधन यांपासून मुक्त होतील.

You may like this: बुद्ध धम्माच्या १० पारमिता: 10 Paramitas of Buddha Dhamma

Follow our Podcast: Buddha Dhamma in Marathi

Conclusion on आपला खरा स्वभाव जाणा: Buddha Story Buddha Story on Temperament in Marathi

In conclusion, the story of Buddha in Marathi, आपला खरा स्वभाव जाणा (Understanding One’s True Temperament), offers profound insights into the journey of self-discovery and spiritual growth.

Buddha’s teachings emphasize the importance of looking within to recognize our true nature, free from illusions and misconceptions. By understanding and embracing our authentic selves, we can lead lives of greater clarity, compassion, and inner peace.

This story not only illuminates Buddha’s path to enlightenment but also serves as an inspiring guide for anyone seeking deeper self-awareness and spiritual fulfillment.

The timeless wisdom of Buddha’s teachings continues to resonate, providing valuable lessons for leading a meaningful and enlightened life.

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *