Buddha Dhamma in Marathi

बुद्ध धम्माच्या १० पारमिता: 10 Paramitas of Buddha Dhamma

बुद्ध धम्माच्या १० पारमिता: Discover the 10 Paramitas of Buddha Dhamma in Marathi. Learn how these perfections guide spiritual growth and lead to enlightenment through the practice of virtue and wisdom.

बुद्ध धम्माच्या १० पारमिता: 10 Paramitas of Buddha Dhamma

भगवान बुद्धांनी आपल्या उपदेशांत संबोधी मिळवण्यासाठी दहा सद्गुण आवश्यक असल्याचे सांगितले आहे. साधक जेव्हा हे सद्गुण अंगीकारतो, आपल्या अंतरंगात त्यांचा विकास करतो, तेव्हा त्याला अरिहंत किंवा मुक्तीची अवस्था प्राप्त होते.

हे दहा सद्गुण पुढीलप्रमाणे:

१. दान : फक्त आपल्या संपत्तीचा काही अंश नव्हे, तर आपला वेळ आणि ज्ञान यांचाही लाभ लोकांना देण्याची गरज आहे. आपल्या धनावर केवळ आपलाच नाही, तर समाजातील गरजवंत लोकांचाही हक्क आहे. धनाचा उपयोग लोकांची चेतना विस्तृत करण्यासाठी करायला हवा. ही बाब आपण एका उदाहरणाद्वारे समजून घेऊ या.

भगवान बुद्धांचे पाटलीपुत्र नगरीत जेव्हा आगमन झाले, तेव्हा तेथील रहिवासी आपापल्या कुवतीनुसार त्यांना भेट देण्याचे नियोजन करू लागला. बिंबिसार राजानेही मौल्यवान हिरे, मोती आणि रत्नांचा नजराणा बुद्धांना देऊ केला.

त्यानंतर मंत्री, शेठ, सावकार यांसारख्या लोकांनी त्यांना विविध नजराणे दिले. सर्वांनी देऊ केलेले दान बुद्धांनी एका हाताने स्पर्श करत सहर्ष स्वीकारले. त्याच वेळी एक वृद्ध स्त्री तिथे काठी टेकत आली. बुद्धांना नमन करत ती म्हणाली, ‘भगवान, ज्या वेळी मला आपल्या आगमनाची सूचना मिळाली, त्या वेळी मी डाळिंब खात होते.

माझ्याकडे इतर काहीही नसल्यानं मी हे अर्धवट खाल्लेलं डाळिंब आपल्यासाठी घेऊन आले आहे. माझी ही अतिशय छोटीशी भेट आपण स्वीकारली तर हे मी माझं भाग्य समजेन.’

बुद्ध धम्माच्या १० पारमिता: 10 Paramitas of Buddha Dhamma
बुद्ध धम्माच्या १० पारमिता: 10 Paramitas of Buddha Dhamma

भगवान बुद्धांनी दोन्ही हात पुढे करत ते डाळिंब घेतले आणि खाल्ले. ते पाहून बिंबिसार राजाने बुद्धांना विचारले, ‘भगवान, क्षमा करा. पण एक प्रश्न विचारू इच्छितो. आम्ही सर्वांनी आपल्याला अत्यंत मौल्यवान नजराणे, भेटवस्तू दिल्या. त्या तुम्ही एका हातानं स्वीकारल्या. पण, या वृद्ध स्त्रीनं दिलेलं छोटंसं उष्टं फळही आपण दोन्ही हातांनी स्वीकारलं. असं का?’

ते ऐकून स्मित करून बुद्ध म्हणाले, ‘राजन! तुम्ही सर्वांनी खरंच खूप बहुमोल भेटवस्तू दिल्या. पण त्या भेटवस्तूंचं मूल्य तुमच्या सर्वांच्या संपत्तीचा दहावा भागही होत नाही. तुम्ही दिलेलं हे दान दीन-दुबळ्यांच्या, गरिबांच्या भल्यासाठी दिलेलं नाही. त्यामुळे तुमचं हे दान सात्त्विक दानाच्या श्रेणीत बसत नाही.

याउलट, या वृद्धेनं आपल्या तोंडचा घासही मला दिला. ही स्त्री निर्धन असली, तरी तिला संपत्तीची कोणतीही लालसा नाही. त्यामुळेच तिनं दिलेलं दान मी खुल्या हृदयानं, दोन्ही हातांनी स्वीकारलं.’


२. शील : शील म्हणजे नैतिकता. निसर्गनियमांचे पालन करणे, सदाचाराचे जीवन आचरणे, या विषयी मानसिक व्यायामात विस्ताराने विवेचन केले आहे.


३. निष्क्रियता (नैष्क्रम्य): निष्क्रियता म्हणजे प्रापंचिक काम, भोगाचा त्याग करणे.


४. प्रज्ञा: प्रज्ञेचा अर्थ आहे जाणणे. ज्ञानाने प्रकाशमान होणे. यावर बुद्ध बोध अध्यायात विस्ताराने विवेचन केले आहे.


५. वीर्य: वीर्य म्हणजे पुरुषार्थ, मेहनत करणे, कष्ट करणे. सत्यप्राप्तीसाठी प्रत्येक अडथळा, अडचणी यांना तोंड देणे. या गुणांचा उपयोग प्रत्येक गोष्टीत करणे आवश्यक आहे.


६. क्षांति: क्षांति म्हणजे सहनशक्ती. संयमाने, धाडसाने साधना करत राहणे. क्षमाशील राहणे. यावरही याआधी विस्ताराने विवेचन केले आहे.


७. सत्य: सत्य म्हणजे कपट न करणे. चेष्टा करतानाही खोटे न बोलणे. सदैव सत्याची कास धरणे.


८. अधिष्ठान: अधिष्ठान म्हणजे दृढ निश्चय. समाधीचा सराव करण्यासाठी संकल्पशक्ती, वीर्य आणि अधिष्ठान यांची गरज असते.


९. मैत्री: मैत्रीचा अर्थ आहे समग्र सजीव सृष्टीविषयी आपलेपणाची भावना. प्रत्येक व्यक्तीविषयी मैत्रिभाव निर्माण करण्याची गरज आहे. दुःखीकष्टी व्यक्तींविषयी दया आणि करुणा व्यक्त करायला हवी.

गौतम बुद्धांनी आपल्या भिक्षंना सदैव शील आणि सदाचरणाचे जीवन जगण्यासाठी प्रेरित केले. भिधूंच्या आजारपणात परस्परांची सेवा करण्यासाठी ते प्रोत्साहित करत असत. ते म्हणत, ‘भिधुंनो, ज्यांना माझी सेवा करायची असेल, त्यांनी रुग्णांची सेवा करावी. माझी सेवा करून तुम्हांला जे फळ मिळेल, तेच फळ रुग्णसेवा करून तुम्हांला मिळेल.

भुकेल्या अवस्थेतील माणूस रुग्णच असतो. अशा अवस्थेत त्याला ज्ञानदानाऐवजी खायला दिलं पाहिजे. त्यानंतरच तो सत्यश्रवण करू शकेल. हीच खरी सेवा ठरेल.


१०. उपेक्षा: उपेक्षा म्हणजे अलिप्तपणा. या जगात दैनंदिन व्यवहारातील घटनांकडे समता भावाने पाहण्याची स्वतःला सवय लावणे. बुद्धांचे चित्र तुम्ही पाहिलेच असेल, त्यात भगवान बुद्ध अर्थोन्मिलित (डोळे अर्धे उघडे व अर्धे बंद) मुद्रेत दिसतात.

अर्धवट उघडे नेत्र अनासक्त अवस्था दर्शवतात. ज्या वेळी माणूस अनासक्त नजरेने पाहतो, त्या वेळी त्याच्यावर बाह्यदृश्याचा कुठलाही परिणाम होत नाही. या दृश्यांशी आपण संलग्न होत नाही, त्यात स्वतःचे विस्मरण होऊ देत नाही.

ही अवस्था नेमकेपणाने दाखवण्यासाठी बुद्धांचे नेत्र अर्धीन्मिलित दाखवले जातात. तुम्ही एक संपूर्ण दिवस अर्धीन्मिलित नेत्रांनी वावरलात, तर तुमच्यावर कुठल्याच गोष्टीचा प्रभाव पडणार नाही.

तुम्ही हा प्रयोग स्वतःवर करून पाहा. अर्थोन्मिलित नेत्रांनी तुम्ही टीव्ही पाहिलात, तर त्यात दाखवली जाणारी दृश्ये तुमच्यावर काहीच प्रभाव पाडणार नाहीत. क्रिकेटच्या सामन्याचे प्रक्षेपण सुरू असले तरीही तुमच्यावर काहीही परिणाम होणार नाही. खेळणारा क्रिकेटपटू बाद झाला तरी तुम्हांला दुःख होणार नाही.

तुम्ही ही गोष्ट सहजपणे स्वीकाराल आणि म्हणाल, ‘चला ठीक आहे, आउट तर आउट…’ जर एखाद्या गोष्टीत तुम्ही गुंतत असाल, तर तुमचे डोळे विस्फारले जातात. त्यानंतर तुम्ही उद्‌गारता, ‘अरे! हे चाललंय तरी काय?’


बुद्ध म्हणजे मनुष्याची मूळ अवस्था. या अवस्थेत तुम्हांला हे जग कसे दिसते, मूर्त स्वरूपात ते कसे दाखवायचे, या विचारातून बुद्धांना अशा अर्धीन्मिलित नेत्रांमध्ये दाखवले जाते. याचा अर्थ बुद्ध असेच बसलेले असायचे, असा नाही.

बुद्ध म्हणजे एक अशी अवस्था, ज्यात तुम्ही दृश्य पाहत असतानाही त्यांच्याशी आसक्त होत नाहीत. अशा अवस्थेत तुम्ही केवळ द्रष्टा बनून पाहत असता. ‘हे पण ठीक, ते पण ठीक’ अशी ही अवस्था असते. यात उपेक्षा भाव साहाय्यक ठरतो.

You may like this: बुद्धांचा मध्यम मार्ग: The Buddha’s Middle Way In Marathi

Follow our Podcast: Buddha Dhamma in Marathi

Conclusion on बुद्ध धम्माच्या १० पारमिता: 10 Paramitas of Buddha Dhamma

In conclusion, बुद्ध धम्माच्या १० पारमिता (The 10 Paramitas of Buddha Dhamma) provide a comprehensive framework for spiritual development and the attainment of enlightenment.

These ten perfections—दान (generosity), शील (virtue), नेकपणा (renunciation), प्रज्ञा (wisdom), वीर्य (energy), क्षांती (patience), सत्य (truthfulness), अधिष्ठान (determination), मेत्ता (loving-kindness), and उपेक्षा (equanimity)—serve as essential guidelines for cultivating a life of virtue, compassion, and wisdom.

By diligently practicing these Paramitas, individuals can overcome obstacles, foster inner peace, and progress on their spiritual journey. The timeless relevance of these teachings in Marathi culture underscores their transformative power and enduring significance.

Embracing the 10 Paramitas of Buddha Dhamma not only enhances personal growth but also contributes to a more compassionate and harmonious society, reflecting the profound essence of Buddha’s teachings.

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *