Buddha Dhamma in Marathi

तिसरे आर्य सत्य – दुःखाचे निवारण आहे | The Third Arya Satya

Explore the path to freedom from pain with “The Elimination of Suffering | The Third Arya Satya in Marathi.” Learn how Buddhism’s Four Noble Truths offer insights into overcoming suffering and achieving lasting peace and happiness.

तिसरे आर्य सत्य – दुःखाचे निवारण आहे | The Third Arya Satya is The Elimination Of Suffering

आर्य सत्य केवळ दोनच असती तर ती काहीच कामाची नव्हती. अर्धसत्य नेहमी घातक असते. पूर्ण असत्यापेक्षा धोकादायक असते. मात्र दुःख आहे, याची जाणीव होणे हा सत्याचा प्रारंभ आहे. दुःखाचे कारण आहे, हे अर्धसत्य आहे.

या दुःखापासून मुक्ती होऊ शकते, या सत्याने पूर्णता प्राप्त होते. पण आजार आहे तर त्यावर उपायही आहे, हे शुभ वृत्त आहे. तिसरे आर्य सत्य सांगते, ‘दुःखाचे कारण नष्ट झाल्यानंतर दुःखाचे निवारण होते.’ दुःखाचे कारण तृष्णा आहे. या तृष्णेतून मुक्त झाल्यानंतर दुःखाचे निवारण होऊ शकते.

मनुष्यामध्ये तीन प्रकारच्या तृष्णा, इच्छा आणि आकांक्षा असतात.

१. स्थूल स्वरूपाच्या ढोबळ तृष्णा : गाडी, बंगला, पद, प्रतिष्ठा, कीर्ती, नाव इत्यादी.



२. सूक्ष्म किंवा छोट्या तृष्णा : सुख-सुविधा, सुरक्षा, श्रेय मिळावे; पण दुःख, संभ्रम, असुरक्षा, आरोप, बदनामी आदी मिळू नये.

३. अतिसूक्ष्म किंवा सुप्त तृष्णा : सुखद संवेदना सदैव अनुभवायला मिळाव्यात, दुःखद संवेदना वाट्याला येऊ नयेत, तारुण्य चिरकाल टिकावे. आजारपण कधीही येऊ नये. कुठलेही काम सहज व्हावे, त्यात अडथळा येऊ नये वगैरे.

तिसरे आर्य सत्य - दुःखाचे निवारण आहे | The Third Arya Satya
तिसरे आर्य सत्य – दुःखाचे निवारण आहे | The Third Arya Satya

अशा प्रकारच्या सुप्त इच्छा एखाद्या प्रतिकूल घटनेतच आपल्या लक्षात येतात.

उदाहरणार्थ, आत्ता तुम्हांला पंख्याची आवश्यकता आहे आणि नेमकी त्याच वेळी अचानक वीज गेली, तर तुम्ही नक्कीच चिडचिड कराल. वीजवितरण विभागाला दूषणे द्याल. तेव्हा वीज अखंड राहावी, अशी सूक्ष्म इच्छा तुमच्या मनात होती, हे तुमच्या लक्षात येईल. अशा प्रकारच्या अतिसूक्ष्म, सुप्त इच्छा समजून घेण्यासाठी बुद्धीचा सम्यक उपयोग करायला हवा.

या इच्छांमध्ये गुरफटून जगताना माणसाला या इच्छांची इतकी सवय होते, की त्याशिवाय तो राहूच शकत नाही. त्याच्या मनात प्रत्येक क्षणी नवनवीन इच्छा निर्माण होत असतात. प्रत्येक आकांक्षा, अपेक्षापूर्तीनंतर अहंकार निर्माण होतो.

कारण ते संबंधित काम पूर्ण होण्याचे श्रेय अहंकार आपल्याकडे घेत असतो. त्याच्या मनात मी केले, मी श्रेष्ठ आहे, हा भाव निर्माण होतो. हा अहंकारभाव भविष्यात दुःखच निर्माण करतो. एक आसक्ती पूर्ण होईपर्यंत दुसरी निर्माण होते. नव्या आसक्तीविना मनाला कंटाळवाणे वाटते.

इच्छा निर्माण झाल्या की मनाला उत्तेजना मिळते. उत्तेजनांच्या आहारी गेलेले मन नवनवीन कल्पनाविलासात रममाण होते. मन चंचल होत जाते. दुःखाचे मूळ कारण मनाची चंचलता आहे.

आपल्या आसक्तीची पूर्तता न झाल्यास निराशा, व्याकुळता, हीन भावना, तिरस्कारयुक्त भावना जागृत होतात. अशा त-हेने आसक्तीची पूर्तता झाली तरी माणूस दुःखीच होतो आणि ती पूर्ण झाली नाही तरीही तो दुःखीच राहतो.

आपण जेव्हा आसक्तीची आसक्ती सोडून द्याल, तेव्हाच दुःखापासून मुक्त व्हाल. आसक्तीची आसक्ती असणे, या सवयीतून मुक्त होणे अत्यावश्यक आहे.

या सवयीतून मुक्त झाल्यावर आपल्याला समजेल, की जोपर्यंत आपण आसक्त होत नाही, तोपर्यंत या इच्छा, आसक्ती आपल्याला दुःखी करत नाहीत. या इच्छांपासून अलिप्त राहिल्यास त्यापासून निर्माण होणारे दुःख नष्ट होते. सर्व प्रकारच्या इच्छा निर्माण होताना, आपण अलिप्तपणे पाहू शकाल, तेव्हाच दुःखापासून मुक्त व्हाल.

आपल्याला होणाऱ्या दुःखाकडे आपण त्रयस्थपणे पाहायला शिकाल, तेव्हाच दुःखातून मुक्त व्हाल. ज्या वेळी सर्व इच्छांपासून मुक्त होण्याची मंगल कामना आपल्यात निर्माण होईल, त्या वेळी दुःखमुक्ती होईल.

You may like this: दुसरे आर्य सत्य – दुःखाचे कारण आहे | The Four Arya Satya

Follow our Podcast: Buddha Dhamma in Marathi

Conclusion on The Third Arya Satya is The Elimination Of Suffering

In conclusion, the Third Arya Satya, or the elimination of suffering, is a central tenet of Buddhism that provides profound hope and direction for those seeking relief from life’s pains.

By understanding that the cessation of suffering is achievable through the relinquishment of craving and attachment, we open ourselves to a life of greater peace and contentment.

The promise of Nirvana, a state of ultimate liberation and bliss, becomes attainable through dedicated practice and adherence to the Eightfold Path.

Embracing this truth can transform our lives, guiding us toward a deeper sense of well-being and spiritual fulfillment.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *