Buddha Dhamma in Marathi

दुसरे आर्य सत्य – दुःखाचे कारण आहे | The Four Arya Satya

Uncover the root causes of suffering with “The Cause of Suffering | The Four Arya Satya.” Learn how the Four Noble Truths in Buddhism explain the origins of suffering and the path to overcoming it for a more enlightened life.

दुसरे आर्य सत्य – दुःखाचे कारण आहे | The Cause of Suffering | The Four Arya Satya

खरे तर दुःख म्हणजे काय, हे समजावून सांगण्यासाठीच भगवान बुद्धांनी दुसरे आर्य सत्य सांगितले आहे. ‘दुःख आहे’ या पहिल्या सत्याची खातरीच त्याद्वारे पटते. आता दुसरे सत्य काय आहे, ते समजून घेऊ या.

माणूस दुःखाचे दर्शन करतो, तेव्हा तो त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही शोधतो. जेव्हा या दुःखातून बाहेर पडण्याची तुमची इच्छा तीव्र होते, तेव्हा या दुःखापासून मुक्तीचा मार्गही तुम्हांला गवसतो.

दुसरे आर्य सत्य आहे – ‘दुःखाचे कारण आहे.’ आता दुःख आहे म्हणजे त्यामागचे कारणही असेलच ना? त्याच कारणाचा आपण शोध घेऊ या… मुलं परीक्षेत चांगले गुण मिळवतात, तेव्हा मुलं आईवडिलांवर गेली असेच सर्व जण म्हणतात.

पण हीच मुलं जेव्हा अनुत्तीर्ण होतात, तेव्हा असे कुणी म्हणत नाही. त्या वेळी सर्व जण मुलांनाच दोष देतात, त्यांना मूर्ख म्हणतात. त्यामुळे मुलांना वाईट वाटते. हे असे का? याचा विचार करून मुलं दुःखी होतात.

अशा प्रकारे प्रत्येकाच्या दुःखाचे कारण भिन्न आहे. आपल्या दुःखाचे कारण प्रत्येक जण आपापल्या परीने शोधत असतो. पण आता आपल्याला खरे कारण शोधायचे आहे. दुःखाचे खरे कारण समजले, तरच जीवनाचा प्रवास सुखकर होईल. ‘दुःखाचे दुःख हेच दुःखाचे खरे कारण आहे.’ हे दुसरे आर्य सत्य भगवान बुद्धांनी सांगितले.

माणसाला दुःख होते, तेव्हा तो ‘मला हे दुःख का होत आहे’ या विचारामुळेच दुःख स्वीकारू शकत नाही. त्यामुळे तो अधिक दुःखी होतो. त्याला क्रोध आला, तर आपल्याला क्रोध का आला आहे, या विचारानेच तो अधिक संतप्त होतो. अशा त-हेने तो क्रोधावर संतप्त होऊन आरडाओरड करू लागतो.

दुसरे आर्य सत्य - दुःखाचे कारण आहे The Four Arya Satya Image
दुसरे आर्य सत्य – दुःखाचे कारण आहे | The Four Arya Satya Image

एखाद्या व्यक्तीमुळे वेळ वाया गेला, तर काही जण खूप पश्चात्ताप करतात. अशा व्यक्तीस जर सांगितले, ‘अरे, आता पश्चात्ताप करून आणखी वेळ वाया का घालवतो आहेस?’ तरीही त्याला काही समजत नाही. तो अर्ध्या तासापेक्षा अधिक काळ पश्चात्तापदग्ध अवस्थेत असला तरी अजूनही वेळ वाया घालवतच असतो.

मग तो अचानक भानावर येऊन विचार करू लागतो, ‘अरे, या पस्तावण्यात तर मी आणखी अर्धा तास वाया घालवला आहे. किती मूर्ख आहे मी!’ असा विचार करून तो आणखी पश्चात्ताप करत राहतो. माणसाची ही कथा आणि व्यथा कधी संपतच नाही, ती अखंडपणे चालूच राहते.

यासाठी सर्वप्रथम हे समजून घ्या, की माणसाला दुःखाचे दुःख होते. कारण तो विविध कामना, तृष्णा, वासना आणि इच्छा यांमध्ये पूर्णपणे गुरफटलेला असतो. दुःखाविषयी दुःख का वाटते? कारण माणसाच्या इच्छा कधीच पूर्ण होत नाहीत. त्याला वाटते, अमुक एक इच्छा पूर्ण झाली, तर माझे दुःख संपेल.

अमुक एक काम झाले, तर मी खूप आनंदी होईन. भविष्याची काळजी राहणार नाही… मला नोकरी मिळाली, तर मी सुखी होईन… माझ्या मुलाचा विवाह झाला, तर मी आनंदी होईन….

अशा प्रकारे सुख आणि दुःखाविषयी प्रत्येकाच्या विभिन्न कल्पना असतात. त्यानुसारच ते जगत असतात. ही बाब आपण एका कथेद्वारे समजून घेऊ या…

दोन कुटुंबं असतात. एक गरीब असते तर दुसरे श्रीमंत. या दोन्ही कुटुंबांतील मुलं उपजीविकेच्या शोधार्थ आपापल्या मार्गाने जातात. ही कथा त्या काळातील आहे, जेव्हा लोक व्यापारासाठी, उपजीविकेच्या शोधार्थ दूरदूर पायी प्रवासाला जायचे. या दोन्ही तरुणांना त्यांच्या गावापासून खूप दूर अंतरावर नोकरी मिळाली. पण नोकरी मिळाल्यानंतर अवघ्या वर्षभरातच त्या गरीब कुटुंबातील तरुणाचा मृत्यू झाला.

आता त्या श्रीमंत घरातील युवक ज्या व्यापाऱ्याकडे काम करत होता, त्याला समजले, की कुणीतरी त्याच्या गावी जाणार आहे. तेव्हा या श्रीमंत घरातील युवकाने त्या व्यक्तीला सांगितले, ‘माझ्या घरातील लोकांना सांगा, की मला नोकरी लागली आहे.

मी इथे खूप पैसे कमावतो आहे आणि माझ्या मित्राच्या घरी जाऊन त्याचा मृत्यू झाल्याची माहिती द्या.’ ती व्यक्ती गावी जाऊन नेमका उलटा निरोप देते. त्याने गरीब घरी जाऊन सांगितले, ‘तुमचा मुलगा चांगले कमावतो आहे. खूप आनंदी आहे.’ आणि श्रीमंत घरी जाऊन सांगतो, ‘तुमच्या मुलाचे निधन झाले आहे.’

आता हे वृत्त ऐकून त्या दोन्ही मुलांचे आईवडील दुःखी झाले. आपल्या मुलाचा मृत्यू झाल्याने श्रीमंत कुटुंब दुःखी आहे. त्यांच्या जीवनावर दुःखाची छाया पसरली आहे. खरे तर त्यांचा मुलगा जिवंत आहे, तरीही ते दुःखी आहेत.

जर त्या अवस्थेत त्यांना कुणी सांगितले, ‘तुम्ही ज्याबद्दल एवढा शोक करत आहात, ते दुःख खोटं आहे कारण तुमचा मुलगा जिवंत आहे,’ तर ते ऐकणार नाहीत. त्यांना खोटे दुःखच खरे वाटेल.

आपला मुलगा कमावेल आणि आपल्यासाठी पैसेही पाठवत जाईल, या आशेवर असणारे गरीब घरातील आईवडीलही या विचाराने दुःखी आहेत. त्यांना वाटत असतं, ‘आम्ही इथे एवढ्या गरिबीत दिवस कंठत आहोत आणि तिकडे तो मजेत आहे.

एवढे पैसे कमावूनही आमच्यासाठी काहीही पाठवत नाही. त्याला आमची काही काळजीच नाही.’ वास्तविक त्यांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. परंतु आपला मुलगा नालायक निघाला, पैशांची मदत करत नाही या विचारांनी हे माता-पिता दुःखीकष्टी होतात. खोट्या दुःखात जीवन व्यतीत करतात.

मात्र, जिवंत असलेला मुलगा श्रीमंत घरातला असल्याने त्याने आपल्या कमाईतून घरी पैसे पाठवले नाही तरी त्याच्या घरच्या लोकांना काहीही फरक पडणार नसतो. पण त्या कुटुंबातील सदस्य दुःखी आहेत, कारण त्यांच्या धारणेनुसार या श्रीमंत मुलाचा मृत्यू झाला आहे.

या दोन्ही कुटुंबांना चुकीची माहिती मिळाली हे आपण जाणतोच. या गैरसमजातच ते सर्व जण जगले आणि मृत्युमुखी पडले, पण, आता तुम्हांला वास्तव आणि या कथेचे सर्व पैलू ठाऊक आहेत. जेव्हा आपण पूर्ण ज्ञान प्राप्त करतो, तेव्हाच त्या दुःखातून आपली मुक्ती होते. या दुःखाचे मूळ कारण आहे अज्ञान, गैरसमज, तमोगुण आणि तृष्णा म्हणजेच इच्छा….

You may like this: पहिले आर्य सत्य – दुःख | The Four Noble Truths In Marathi

Follow our Podcast: Buddha Dhamma in Marathi

Conclusion on The Cause of Suffering | The Four Arya Satya

In conclusion, understanding the cause of suffering through the Four Arya Satya, or Four Noble Truths, offers a transformative perspective on life’s challenges.

By delving into the origins of suffering, we recognize the role of desire, attachment, and ignorance in perpetuating our pain. This awareness empowers us to adopt the Eightfold Path, guiding us toward wisdom, ethical conduct, and mental discipline.

Embracing these teachings can lead to a profound reduction in suffering, fostering a life of greater peace, clarity, and spiritual fulfillment.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *