Explore the early life of Siddhartha Gautama, the prince who became the Buddha. Learn about his upbringing, his encounters with suffering, and the events that led him on the path to enlightenment. Discover the profound teachings and timeless wisdom that emerged from his early experiences.
सिद्धार्थच्या जन्मानंतर एका आठवड्यातच त्याच्या मातोश्री महामाया यांचे निधन झाले. शुद्धोधन यांची दुसरी पत्नी प्रजापती गौतमी ही महामाया यांची बहीणच होती. तिने लहानग्या सिद्धार्थच्या संगोपनाची जबाबदारी आनंदाने स्वीकारली.
Siddhartha’s Early Life
नात्याने ती सिद्धार्थची मावशीच असल्यामुळे सिद्धार्थला गौतम या नावानेही ओळखले जाऊ लागले. प्रजापती गौतमीने सिद्धार्थला त्याच्या सख्ख्या आईची कमतरता कधीही जाणवू दिली नाही.
सिद्धार्थ थोडा मोठा होऊन चालू-बोलू लागल्यावर राज्यातील महान पंडितांकडून त्याला शिक्षण मिळू लागले. तो कुशाग्र बुद्धिमत्तेचा हुशार विद्यार्थी होता. राजघराण्यातील इतर मुलांसमवेत सिद्धार्थही शिक्षण घेत असे.
समाधीचा पहिला अनुभव
शाक्य वंशातील परंपरेनुसार वर्षातील पीक लागवडीपूर्वी राजा शेतात नांगरणी करत असे. त्या वेळी हा दिवस एखाद्या उत्सवासारखा साजरा केला जात असे. अशातच एके दिवशी राजा शुद्धोधन सिद्धार्थला घेऊन हा उत्सव साजरा करायला गेले. नांगरणी करण्यासाठी जाताना शुद्धोधनांनी सिद्धार्थला एका झाडाखाली बसवले आणि सर्व जण उत्सव साजरा करू लागले.
एका झाडाखाली सिद्धार्थ आरामात बसला होता. थोड्या वेळाने त्याचे लक्ष अचानक स्वतःच्या श्वासाकडे गेले. आपला श्वास आत-बाहेर कसा जातो, एका स्वयंचलित पद्धतीने आपले शरीर कसे काम करते, याचे निरीक्षण तो करू लागला. श्वास कधी उजव्या, तर कधी डाव्या बाजूने आत जातो. कधी तो कुठे तरी अडकतो. श्वास कधी दीर्घ असतो, तर कधी छोटा असतो.
कधी पोटापर्यंत जातो, तर कधी वर वरच राहतो. हे पाहताना तो आश्चर्यचकित होऊन समाधी अवस्थेत पोहोचला. बराच काळ तिथे तो तसाच बसून होता. नंतर काही जण तिथे आले आणि ते सिद्धार्थला हाका मारू लागले. पण सिद्धार्थला शरीराचे भान नसल्याने त्याला या हाका ऐकू येत नव्हत्या. सर्वांना सिद्धार्थच्या या समाधी अवस्थेची जाणीव झाली. त्यांनी जवळ जाऊन सिद्धार्थला उठवले.
सिद्धार्थच्या जीवनातला समाधीचा तो पहिलावहिला अनुभव होता. परंतु या समाधीकाळात प्रज्ञा, समज कमी असल्याने सिद्धार्थला हा अनुभव समजू शकला नाही. त्याने समाधीचा अनुभव तर घेतला; पण त्याचे महत्त्व आणि अर्थ समजण्यासाठी बराच काळ जावा लागला.
कालांतराने वयाच्या २८-२९व्या वर्षी त्यांनी घर त्यागून सहा वर्षे साधना केली. त्यानंतर त्यांना संबोधी प्राप्त झाली. तेव्हा त्यांना समजले, की ते सात वर्षांचे असताना त्यांनी या समाधी-अवस्थेचा अनुभव घेतला होता. जरा विचार करा, आपणदेखील सतत श्वास घेत असतो, पण आपले लक्ष त्याकडे कधी जाते का?
लहानपणापासून सिद्धार्थला ध्यानाचे मोठे आकर्षण होते. तो आपल्या मित्रांना नेहमी ध्यान करण्यासाठी प्रेरित करत असे. ध्यान करताना एखाद्या वस्तूवर आपले चित्त एकाग्र करण्यास तो मित्रांना शिकवत असे. त्याच्या आईवडिलांना मात्र त्याचे हे ध्यानमग्न होणे अजिबात आवडत नसे. सिद्धार्थने एका क्षत्रियाप्रमाणे आचरण करावे, अशी त्यांची अपेक्षा होती.
त्यामुळे शुद्धोधनांनी सिद्धार्थला धनुर्विद्येसह इतर शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण दिले होते. परंतु, सिद्धार्थला कुठल्याही प्राण्याला अनावश्यक त्रास द्यायला अजिबात आवडत नसे. सिद्धार्थ शिकारीसाठी जात नसे. तसेच तो आपल्या मित्रांची नेमबाजी पाहण्यासाठी जाण्यासही इच्छुक नसे. निष्पाप प्राण्यांचा वध होताना, त्या घटनेचा साक्षीदार होण्याची त्याची इच्छा नव्हती.
सिद्धार्थच्या अशा वागणुकीमुळे माता गौतमी चिंतित होऊ लागली होती. सिद्धार्थच्या जन्माच्या वेळी सांगण्यात आलेली भविष्यवाणी तिला वारंवार आठवायची. सिद्धार्थ एक चक्रवर्ती राजा झालेला पाहण्याची तिची इच्छा होती. त्यामुळे गौतमी सिद्धार्थला नेहमी क्षात्रधर्माच्या कर्तव्याचे स्मरण करून देत असे.
यावर सिद्धार्थ तिच्याशी नेहमी युक्तिवाद करत असे. लढाई, युद्ध हा क्षत्रियांचा असलेला धर्म सिद्धार्थला अमान्य होता. सिद्धार्थचा चुलत भाऊ देवदत्त लहानपणापासून त्याचा मत्सर करत असे. एके दिवशी देवदत्तने मारलेल्या बाणाने एक पक्षी जखमी होऊन कोसळला. मात्र, सिद्धार्थने त्या जखमी पक्ष्यावर उपचार केले. देवदत्तने हा पक्षी त्याला परत देण्याची सिद्धार्थकडे मागणी केली.
पण, त्याने ती नाकारली. अखेर हा वाद राजदरबारापर्यंत पोहोचला. दरबारात देवदत्त आणि सिद्धार्थ यांनी आपापली बाजू मांडल्यानंतर त्यावर विचारविनिमय झाला. या वादात सिद्धार्थने केलेला युक्तिवाद मान्य करण्यात आला. मारणाऱ्यापेक्षा वाचवणारा कायम श्रेष्ठ असतो. म्हणून तो पक्षी अद्याप जिवंत असल्याने सिद्धार्थकडेच राहील. जर तो पक्षी मृत्युमुखी पडला असता, तर देवदत्तचा त्यावर हक्क राहिला असता.
सिद्धार्थची बाजू सर्व मंत्र्यांना पटली. सिद्धार्थच्या कुशीत तो पक्षी सुरक्षित होता. यासाठी त्याचा ताबा सिद्धार्थकडेच ठेवण्यात आला. या घटनेनंतर देवदत्तने नेहमीच सिद्धार्थविरुद्ध कट-कारस्थाने रचली.
कालांतराने जेव्हा सिद्धार्थ बुद्ध बनले, तेव्हा त्यांच्या संघात देवदत्तने प्रवेश केला. तिथेही तो असेच वागत राहिला. संघातील लोकांना फितवून तो त्यांना आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करत असे. अजातशत्रू राजाशी हातमिळवणी करून देवदत्त बुद्धांच्या विरोधात काम करू लागला. अखेर आपल्याच कट-कारस्थानांच्या जाळ्यात अडकून आणि विविध रोगांमुळे त्याचा अंत झाला. बुद्धांनी मात्र देवदत्तच्या सर्व चुकांबद्दल त्याला सदैव माफच केले.
सिद्धार्थ जसजसा मोठा होत होता, तसतसे त्याच्या वर्तनाने राजा शुद्धोधन आणि राणी गौतमी चिंतित होऊ लागले. सिद्धार्थचे वारंवार ध्यानमग्न होणे, संन्याशांसारखे बोलणे शुद्धोधनाला असित ऋषींच्या भविष्यवाणीची आठवण करून देत असे. सिद्धार्थ आता विवाहयोग्य झाला होता. विवाहानंतर सिद्धार्थच्या आचारविचारांमध्ये बदल होऊन तो ध्यानापासून परावृत्त होईल, या हेतूने दण्डपाणी राजाची कन्या यशोधरा हिच्याशी सिद्धार्थचा विवाह केला.
आपल्या मुलाच्या विवाहामुळे राजा शुद्धोधन आनंदित होता; पण असित ऋर्षीची भविष्यवाणी एखाद्या भुताप्रमाणे त्याचा पाठलाग करत होती. ज्योतिषांनी सांगितलेल्या चार प्रसंगांपासून सिद्धार्थला दूर ठेवण्याचा जणू निर्धारच त्यांनी केला होता. त्यामुळेच त्यांनी सिद्धार्थसाठी तीन महाल बनवले. उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा या तिन्ही ऋतूंसाठी खास स्वतंत्र असे हे महाल होते.
या ऋतुमानानुसार तो या महालात राहिल्यानंतर त्याच्या दृष्टीस पानगळही पडणार नाही, याची काळजी घेतली जात असे. जेणेकरून पानगळ अथवा वाळलेली पाने पाहून सिद्धार्थ दुःखी होऊ नये. त्याला वृद्धत्वाचे दर्शन होऊ नये म्हणून सेवेसाठी सदैव तरुण सेवक नेमले होते. एखादा वृद्ध, रोगग्रस्त व्यक्ती अथवा कुणाचा मृत्यू सिद्धार्थच्या नजरेस पडू नये, याची पुरेपूर काळजी घेतली गेली होती.
अशा प्रकारे त्याला सुखासीन वातावरणात ठेवले होते. ऋतुबदलामुळे होणाऱ्या त्रासांपासून त्याला दूर ठेवण्याची काळजी सदैव घेतली जात असे.
वस्तुतः सिद्धार्थच्या मनात सुखांविषयी मोह निर्माण करण्यासाठी ही काळजी घेतली जात होती. सिद्धार्थचे पिता किती महान होते, आपल्यालाही असेच वडील मिळायला हवे होते, असा विचार आपल्या मनात डोकावू शकतो.
स्वाभाविकपणे असे पाहून पुत्राला कुठल्याही दुःखाला सामोरे जावे लागू नये, असेच कुणालाही वाटू शकते. यासाठी हा पिता किती प्रयत्न करत आहे, शिवाय तो किती हितचिंतक आहे असे वाटेल. अशी व्यक्ती आपल्या जीवनात यावी, यासाठी लोक प्रार्थना करत असतात. आपली जर कुणी एवढी काळजी घेत असेल तर कुणालाही आवडेल.
जमिनीवरील काटा टोचेल, यासाठी तुम्ही जमिनीवर पाऊलच टेकवू नका, असे जर कुणी सांगत असेल, तर ते आपल्याला निश्चितच आवडेल ना! पण अशी व्यक्ती खरेच आपली हितचिंतक असते का? ही बाब आपल्याला तेव्हाच समजेल, जेव्हा आपण ती सखोलपणे समजून घेऊ.
You may like this: राजकुमार सिद्धार्थची कथा | The story of Prince Siddharth
Follow our Podcast: Buddha Dhamma in Marathi
Conclusion
In conclusion, Siddhartha Gautama’s early life is a fascinating journey marked by privilege, introspection, and a quest for deeper meaning.
Raised in luxury, he was shielded from the harsh realities of life until encounters with suffering and impermanence sparked a profound awakening within him.
This period of his life laid the foundation for his later teachings as the Buddha, emphasizing the importance of compassion, mindfulness, and the pursuit of enlightenment.
Siddhartha’s early experiences serve as a powerful reminder of the transformative potential of self-discovery and the universal nature of human suffering.
One Comment