Discover the ‘बुद्धांची महत्त्वाची शिकवण | Important Teachings of Buddha.’ Learn how Buddha’s wisdom can guide you towards a life of peace, mindfulness, and enlightenment.
भगवान बुद्धांच्या शिकवणींपैकी तीन विशेष महत्त्वाच्या आहेत. पहिली शिकवण होती ‘बुद्धम् शरणम् गच्छामि’ म्हणजेच बुद्धांना शरण जा. इथे बुद्धम् शरणम्चा अर्थ बुद्धांच्या शरीराला शरण जा असा नव्हे. खरे तर बुद्ध असे म्हणत आहेत, की जागृत संबुद्धांना शरण जा, जागृत व्यक्तीला शरण जा.
कारण तेच सर्वात सुरक्षित शरणस्थळ आहे. अन्यथा, आपण जंगल, पर्वत किंवा कुठल्या तीर्थस्थळी आश्रयाला गेलात तरी तिथे चिंता किंवा इतर वासनांचे भय असतेच. त्यामुळे अशी स्थळे सुरक्षित नसतात.
बुद्धांची महत्त्वाची शिकवण | Important teachings of Buddha in Marathi
बुद्धांची दुसरी महत्त्वाची शिकवण म्हणजे ‘धम्मम् शरणम् गच्छामि’. म्हणजेच धर्माला शरण जा. इथे धर्म म्हणजे कुठला पंथ, संप्रदाय असा अर्थ अभिप्रेत नाही. खरे तर याद्वारे बुद्ध म्हणतात, ‘आध्यात्मिक मार्गदर्शनाला शरण जा. ते आचरणात आणा म्हणजे तुम्हांला मोक्ष मिळेल.’
बुद्धांची तिसरी महत्त्वाची शिकवण म्हणजे ‘संघम् शरणम् गच्छामि’. म्हणजे संघास शरण जा. याचा अर्थ, जे लोक मार्गदर्शनाप्रमाणे वागतात, जे गुरूंच्या सान्निध्यात असतात, जागृत व्यक्तीशी ज्यांचे शिष्यत्वाचे नाते आहे, अशांच्या समूहास संघ म्हणतात.
एरवी संघाच्या नावाखाली लोक संभ्रमावस्थेत कुठल्या तरी क्लबचे सदस्य होतात. शिवाय, ज्या लोकांना ही शिकवण आचरण्याची इच्छा नसते, ते म्हणतात, या शिकवणुकींनुसार किंवा तत्त्वांनुसार यथावकाश आचरण करू या, एवढी घाई कसली आहे?
मनन वगैरेही नंतर करू या. तसंही या वासना नष्ट होत नसतात. त्यांना संपवण्याच्या गोष्टी वृथा आहेत वगैरे वगैरे, असे ही मंडळी म्हणत असतात. तुम्ही अशा चुकीच्या संघात (समूहात) सामील झालात तर तिथे तुम्हांला असे युक्तिवाद ऐकायला मिळतील.
ज्या लोकांचा बुद्ध आणि त्यांच्या तत्त्वांशी काही संबंध आलेला नाही, त्यांना लोकांनी ध्यानसाधनेत वेळ घालवणे रुचणार नाही. ते नक्की असेच म्हणतील, ‘चला गप्पा मारू या. व्यापार-व्यवसायाच्या गोष्टी करू. तुमचा व्यापार कसा वाढला, हे आधी आम्हांला सांगा.
मग त्या पद्धतीनं आम्हीही आमचा व्यापार वाढवू.’ आपण जास्त पैसे कमवू शकलो नाही, असा विचार अनेकांच्या डोक्यात सतत सुरू असतो. त्यामुळे अशा व्यक्ती तुम्हांला कामधंद्याबाबतच सल्ला मागत असतात.
अशा लोकांच्या समूहाला संघ मानण्याची चूक कदापि करू नका. इथे कामधंदा, व्यवसाय, व्यापाराशी संबंधित भेटीगाठी घेऊ नयेत, असा याचा अर्थ अजिबात नाही.
आपण ज्याला संघ मानता, तेथील सदस्यांना आध्यात्मिक शिक्षणामध्ये रुची असावी, तरच त्याला संघ म्हणता येईल. अशा संघामध्ये सक्रिय झाल्यास तुमचा लाभच होईल.
बुद्ध तत्त्वज्ञानामध्ये ‘ज’ म्हणजे जागृतीचे महत्त्व आपल्याला समजलेच असेल. बुद्धांची ही सर्वश्रेष्ठ अवस्था पाहून त्या काळात त्यांना अनेक नावे दिली गेली. उदाहरणार्थ, बुद्धदेव, भगवान बुद्ध आदी. मात्र, त्यांनी नेहमीच अशी विशेषणे नाकारली.
त्यांना जेव्हा कोणी विचारत, ‘तुम्ही ज्ञानप्राप्तीनंतर देव किंवा भगवान झालात का?’ तेव्हा त्यांनी नेहमी असेच उत्तर दिले, ‘असं काहीही नाही. खरं तर मी जागृत झालो आहे. शिवाय, सर्वांनाच अशी जागृती मिळण्याची शक्यता असते.’
Follow our Podcast: Buddha Dhamma in Marathi
Conclusion on Important teachings of Buddha in Marathi
Buddha’s teachings offer profound insights into leading a meaningful and fulfilling life. By understanding and practicing these teachings, we can cultivate mindfulness, compassion, and inner peace.
Key teachings such as the Four Noble Truths and the Eightfold Path provide a roadmap for overcoming suffering and achieving enlightenment.
Embracing these principles can help us navigate life’s challenges with wisdom and grace, fostering a sense of harmony and balance within ourselves and the world around us.
Let us be inspired by Buddha’s timeless wisdom and strive to embody his teachings in our daily lives, paving the way for a more peaceful and enlightened existence.
One Comment