Discover the path to liberation with “The State of Freedom from Pain | The Fourth Arya satya.” Learn how the Fourth Noble Truth in Buddhism guides us to overcome suffering and attain a state of enduring peace and happiness.
चौथे आर्यसत्य – दुःख मुक्तीची अवस्था | The fourth Arya Satya – The State Of Freedom From Pain
या इच्छा-आकांक्षांपासून निर्माण होणाऱ्या आसक्तीचे पाश तोडणे शक्य आहे का? जर ते नसेल तर पहिली तीन आर्य सत्य निरर्थक ठरतील. एक अवस्था अशीही आहे, ज्यात माणूस मुक्तीचा आनंद घेऊ शकतो.
ही चौथी अवस्था आहे. चेतनेच्या चार अवस्था असतात : जागृतावस्था, निद्रावस्था, स्वप्नावस्था आणि समाधी-अवस्था. चौथे आर्य सत्य समाधी-अवस्थेचे वर्णन करते. पण ही अवस्था उपलब्ध आहे हे समजले, तर ती प्राप्त करण्यासाठी आपण पाऊल उचलाल.
चौथे आर्य सत्य सांगते, ‘धारणांपासून मुक्त होणे शक्य आहे,’ अशीही एक अवस्था आहे. उदाहरणार्थ, आजारपण आहे, त्यामागे कारण आहे, त्यावर उपचार आहेत आणि निरोगी स्वास्थ्यपूर्ण अवस्थाही आहे. रोग बरा झाल्यानंतर माणूस निरोगी तर होतोच; पण त्याच्यात स्वास्थ्य निर्माण होते. हे स्वास्थ्य म्हणजेच चौथे आर्य सत्य.
त्याचप्रमाणे दुःख आहे, दुःखाचे कारण आहे, दुःखाचे निवारण आहे आणि दुःखमुक्तीची अवस्थादेखील आहे. निवारण म्हणजे मार्ग. दुःखाचे दुःख होणे बंद कसे व्हावे, इच्छेपासून मुक्त कसे व्हावे, धारणांपासून मुक्ती कशी मिळवावी हे जाणून घेणे म्हणजे दुःखनिवारणाचा उपाय.
तेज म्हणजे दोहोंपलीकडे. जसे, आपल्या अंतरंगातच सुखसंपदा आहे, कधीही न संपणारा तेज आनंद आहे- हेच तेज सत्य आहे. आनंद आहे व त्यामागे कारणही आहे. ते कारण तुम्ही स्वतःच आहात. आनंदामागचे कारण हे तुमचे स्वतःचे अस्तित्व आहे.
मी माझ्यामुळेच खूश आहे. माझ्या अस्तित्वामुळेच मी आनंदी आहे. आनंदासाठी मला कुठलेही निमित्त गरजेचे वाटत नाही. माझे असणे हेच आनंदी राहण्यासाठी पुरेसे आहे, असे सांगणारी व्यक्ती आजवर तुम्हांला क्वचितच भेटली असेल. माझे अस्तित्व (बिइंगनेस) म्हणजे वास्तवात आपण जे आहोत, त्या खऱ्या स्वरूपाचे अस्तित्व.
आनंदी राहण्यासाठी माझे असणे पुरेसे आहे. माझा आनंद भविष्यावर अवलंबून नाही. अमुक असे झाल्यावर मी आनंदी होईन, असा भावी काळावर माझा आनंद विसंबून नाही. मी आताही खूश आहे आणि भविष्यातही आनंदी राहीन.
कारण भविष्यात खूश न राहण्याचे कारणच माझ्याकडे नसेल. माझ्या आनंदामागे माझे अस्तित्व हेच एकमेव कारण आहे, असे ठामपणे सांगणारे फार कमी लोक तुम्हांला भेटतील.
मोक्षावस्था ही निर्वाणाची अवस्था आहे, कैवल्यावस्था आहे, चौथी अवस्था आहे. या अवस्थेत पूर्ण ब्रह्मांडाचे रहस्य बुद्धिद्वारे नव्हे, तर अनुभवाद्वारे जाणले जाते. ब्रह्मांडाचे रहस्य म्हणजे सूर्य आणि चंद्र यांच्यातील अंतर तुम्हांला समजणे, या पृथ्वीचे वजन किती आहे हे समजणे, शास्त्रज्ञांचे भविष्यातील शोध समजणे, अग्निबाणांना लागणाऱ्या यंत्राचा शोध तुम्हांला लागेल, असे नव्हे.
ब्रह्मांडाचे रहस्य उकलणे म्हणजे या ब्रह्मांडाचे कार्य कसे चालते, त्यामागे कोणते तत्त्व आहे, ही शक्ती हे काम कसे करते, याचे ज्ञान प्राप्त होणे. आपले तुलनात्मक मन अहंकारामुळे स्वतःला श्रेष्ठ मानून श्रेय कसे घेते, दुःखनिर्मिती कशी होते, शरीराचे आकर्षण कसे असते, रूढी-परंपरा कशा निर्माण होतात, शरीरावर विविध संस्कारांचे परिणाम कसे होतात, प्रत्येक कर्मफळ कसे मिळते, बंधने आपल्याभोवती कशी गुरफटतात, बंधनांपासून मुक्ती कशी होते, या रहस्यांची उकल होणे म्हणजे ब्रह्मज्ञान होणे, मोक्षावस्था प्राप्त करणे होय.
You may like this: तिसरे आर्य सत्य – दुःखाचे निवारण आहे | The Third Arya Satya
Follow our Podcast: Buddha Dhamma in Marathi
Conclusion on The fourth Arya satya – the state of freedom from suffering
In conclusion, the Fourth Aryasatya, or the state of freedom from pain, encapsulates the essence of Buddhist practice and the ultimate goal of the spiritual journey.
This Noble Truth emphasizes the importance of following the Eightfold Path, a practical guide to ethical living, mental discipline, and wisdom.
By committing to this path, individuals can gradually eliminate the causes of suffering and attain Nirvana, a state of profound peace and liberation.
The Fourth Aryasatya not only offers a roadmap to personal transformation but also inspires a compassionate and harmonious way of life that benefits both the individual and the broader community.
Embracing this truth leads to a deeper understanding of existence and a lasting sense of serenity and fulfillment.