Buddha Dhamma in Marathi

ज्ञानप्रसार: Dissemination Of Knowledge by Buddha in Marathi

Discover the profound impact of Buddha’s teachings in Marathi culture. Explore how Buddha disseminated knowledge and wisdom, influencing spirituality and daily life in Maharashtra. Dive into the rich heritage of Buddhist philosophy and its enduring legacy.

ज्ञानप्रसार: Dissemination Of Knowledge by Buddha in Marathi

भगवान बुद्धांनी ज्ञानप्रसार करताना अनेक गोष्टी सांगितल्या. त्यातील पहिली होती सर्वव्यापी सत्य. हे सत्य सर्वांना लागू होते. मग ती व्यक्ती अमेरिकेत राहो, ऑस्ट्रेलियात राहो अथवा भारतात; सर्वांचे मन एकसारखेच असते. कारण सर्वांची मने सारखीच असल्याने भगवान बुद्धांनी सर्वव्यापी सत्याचा प्रसार केला.

दुसरी गोष्ट विवेकबुद्धी म्हणजेच प्रज्ञा. बुद्धांच्या काळात बहुसंख्य लोक कर्मकांडात अडकलेले होते. त्यामुळे त्यांनी विवेकबुद्धीचा प्रसार केला. त्यांनी सांगितले, माणसाने आपल्या विवेकबुद्धीच्या निकषावर प्रत्येक गोष्ट पारखून घेतली पाहिजे. या गोष्टीमुळे माझे दुःख संपणार आहे का? हे मला मुक्त करणारे सत्य आहे का?

या कर्मकांडांमुळे खरोखर स्वर्गप्राप्ती होते का? खरे तर एका टप्प्यानंतर लोक या कर्मकांडांनाच अध्यात्म मानू लागतात. त्यामुळेच बुद्धांनी विवेकबुद्धीचे महत्त्व लोकांना समजावून सांगितले. प्रत्येक गोष्ट विवेकाच्या निकषांवर तपासून घेणारे खरे पारखी व्हा, असे त्यांनी सांगितले.

माणसाने मनन, पारखणे, पडताळणी करणे सोडून दिले, तर कुठली गोष्ट उपयोगी आहे आणि कुठली नाही, हे त्याला कसे समजेल? त्यामुळे लोकांमध्ये विवेकबुद्धी जागृत करणे आवश्यक आहे.



ज्ञानप्रसार: Dissemination Of Knowledge by Buddha in Marathi
ज्ञानप्रसार: Dissemination Of Knowledge by Buddha in Marathi

बुद्धांनी सम्यक समाधी संघ या तिसऱ्या बाबीचा प्रसार केला. बुद्धांनी सर्व उपदेशात ‘सम्यक’ या शब्दाचा फार वापर केला. समाधी-अवस्थेत लोकांचे मन एकाग्र होते. एखादा आवडता चित्रपट पाहताना, तीन तास कसे निघून जातात हे समजतच नाही;

तुम्हांला काळ-वेळेचे भानही उरत नाही. जशी एखादी मांजर उंदराला पकडण्यासाठी त्याच्या बिळासमोर दबा धरून बसते. कारण त्या वेळी तिला उंदराशिवाय इतर काहीही महत्त्वपूर्ण नसते. तिला उंदराची शिकार करायची असल्याने, तिचे लक्ष उंदराच्या त्या बिळाच्या तोंडावर पूर्णपणे एकाग्र झालेले असते. ही एका अर्थाने समाधीची अवस्था असते. पण ती सम्यक समाधी नसते.

कारण सम्यक समाधीत कुठलाही मोह किंवा भीती अस्तित्वात नसते. ज्या वेळी कुठल्याही गोष्टीत आपण गुंतत नाही किंवा तिच्याशी संघर्षही करत नाही, तेव्हा सम्यक समाधी अवतरते.

सम्यक समाधी संघ

सम्यक समाधी संघ या संकल्पनेत ‘संघ’ या शब्दाला महत्त्व आहे. सम्यक समाधीची साधना करणाऱ्या साधकांचा समूह म्हणजे सम्यक समाधी संघ होय. आपण कोणत्या समूहात – संघात राहतो, याला फार महत्त्व आहे. खरे तर ज्यातून काही शिकायला मिळते, त्यालाच संघ म्हणतात. अन्यथा काही लोक संघाच्या नावाखाली क्लब सुरू करतात. क्लबमध्ये शिकण्यासारखे काही नसते.

किंबहुना तिथे भेटीगाठी, गप्पाटप्पा, खाणेपिणे यालाच महत्त्व असते. अशा समूहांना संघ समजण्याची चूक कदापि करू नये. सम्यक समाधी संघाचा जो विस्तार झाला, त्याकडे आपल्याला वेगळ्या दृष्टिकोनातून पाहायला हवे. त्यासाठी सर्वव्यापी सत्याचा (Universal truth) U जाणून घेऊ या. विवेकबुद्धीचा V आणि सम्यक समाधी संघाचा ऽ घेऊ या. म्हणजे UVS याचा अर्थ उच्चतम विकसित समाज. अशा सर्वोच्च विकसित समाजाचा विस्तार बुद्धांनी केला.

तुम्हांला आदी शंकराचार्य माहीत आहेतच. त्यांनी वेद, शास्त्र आणि उपनिषदे यांचा तत्कालीन प्रचलित भाषेच्या माध्यमातून प्रसार केला होता. कारण त्या काळात बहुसंख्य लोकांना वेद, शास्त्र आणि उपनिषदे यांचे विस्मरण झाले होते. आपल्याला उपनिषदांचा U घ्यायचा आहे, वेदांसाठी ✓ घ्यायचा आहे आणि शास्त्रांसाठी ऽ घ्यायचा आहे.

अशा त-हेने आपल्याला उच्चतम विकसित समाज (यूव्हीएस) समजेल. या समाजात राहणाऱ्यांना या सर्व बाबींचे ज्ञान असेल, सर्वव्यापी सत्य माहीत असेल, विवेकबुद्धी असेल. अशा समाजात सम्यक समाधी संघ असेल.

काही श्रीमंत मंडळी मौजमजा करण्यासाठी एखादा समूह किंवा सोसायटी बनवतात. त्यात जलतरण तलाव, क्लब आणि इतर अनेक सुखसोयी असतात. त्याचप्रमाणे UVS हादेखील उच्चतम विकसित समाज असेल. मात्र, त्यात शिक्षणाला आणि पृथ्वीलक्ष्य साधण्याला महत्त्व असेल.

अशा समाजात एखाद्याला असे लक्ष्य मिळवणे कठीण जात असेल, तर सर्व जण त्याला ते लक्ष्य प्राप्त होण्यासाठी साहाय्य करतील, त्यामुळे ते लक्ष्य साधणे संबंधिताला सोपे जाईल. पृथ्वीलक्ष्य म्हणजे आपले मन अकंप, प्रेमळ, निर्मळ आणि अखंड बनवणे, ज्यासाठी आपण पृथ्वीवर आलो आहोत.

मायेपासून अनासक्ती

बुद्धांनी सर्वव्यापी सत्य, विवेकबुद्धी आणि सम्यक संघाचा प्रसार केला. त्यांनी सांगितले, जर तुम्ही मायामोहात गुंताल, तर तुमचे नुकसानच होईल. त्यामुळे त्यामागे जाऊ नका. कारण मायेशी तुमचे नाते खूप सूक्ष्म असते. त्यामुळे मायेत आपण कधी गुंतलो, हे माणसाला समजतच नाही. जसे, जेव्हा तुम्ही एखाद्या वातानुकूलित खोलीत जाता, तेव्हा तुम्हांला खूप छान वाटते.

परंतु, ज्या वेळी तुम्ही त्या खोलीबाहेर येता, त्या वेळी आतून अवरोध निर्माण होतो. त्याचप्रमाणे काही लोकांना सकाळी झोपेतून जागे होणे फार कठीण जाते. कारण रात्रभर वातानुकूलित खोलीत त्यांच्या सर्वांगाला आराम मिळालेला असतो. माणसाचे शरीर दिवसभर उभे असते. परंतु हेच शरीर रात्री बराच काळ अंथरुणावर आडवे (क्षितिज समांतर) असते. त्यामुळे सकाळी उठणे थोडे त्रासदायक ठरते. मात्र, प्राण्यांचे शरीर क्षितिजावस्थेतच असते. म्हणून त्यांना सकाळी उठणे त्रासदायक ठरत नाही.

सकाळी उठल्यानंतर तुम्हांला, ‘दोन-चार तास अजून झोप, काही हरकत नाहीये’ असे सांगितले तर खूप बरे वाटते. रोज सुमारे सात-आठ तास झोपल्यानंतर माणसाच्या शरीराला क्षितिजसमांतर, आडव्या अवस्थेची सवय होते. त्या अवस्थेचा मोह झाल्याने त्याला अंथरूण सोडणे कठीण जाते. याचा अर्थ, तुम्ही झोपू नका असा होत नाही.

पण या गोष्टीचे भान तुम्हांला आले, तर अंथरुणातून बाहेर पडणे सोपे जाईल. त्या सुखामध्ये अडकून, गुंतून न पडता, तुम्ही त्याचे सुख उपभोगाल, शिवाय आनंदाने अंथरूण सोडाल. अशा गोष्टींनाही साक्षीभावाने (Mindfulness), पुन्हा साक्षी होऊन (Remindfulness) आणि हसत-खेळत (Playfulness) पाहायला शिकले पाहिजे. सकाळी उठल्यापासून घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे तुम्हांला याच पद्धतीने पाहता यायला हवे.

असे केल्याने सुखांच्या मोहात आपण कसे गुंतून जातो आणि दुःखाशी संघर्ष कसा करतो, हे आपले आपल्यालाच उमगेल. दिवसभर आपल्याला अनेक सुखद गोष्टी दिसतील, ज्याच्यात आपले मन रममाण होते. त्याचबरोबर अनेक दुःखद घटनाही घडतील, ज्या मनाला आवडणार नाहीत. मग त्यांच्याशी आपले मन संघर्ष करत राहते. या दोन्ही भावनांकडे बुद्धांच्या बोधभावाने पाहायला हवे.

You may like this: निर्वाण अवस्थेचे ज्ञान | Knowledge of Nirvana State of Buddha

Follow our Podcast: Buddha Dhamma in Marathi

Conclusion on Dissemination Of Knowledge by Buddha in Marathi

In conclusion, Buddha’s dissemination of knowledge has left an indelible mark on Marathi culture and spirituality. His teachings, which emphasize compassion, wisdom, and mindfulness, continue to inspire and guide individuals on their spiritual journeys.

The influence of Buddha’s wisdom is evident in the values and practices of the Marathi people, fostering a deeper understanding of life and the path to enlightenment.

As we reflect on the enduring legacy of Buddha’s teachings, we are reminded of the timeless relevance of his message and the importance of integrating these profound insights into our daily lives.

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *