Buddha Dhamma in Marathi

बौद्ध धम्म जिज्ञासा | Curiosity About Buddhism In Marathi

बौद्ध धम्म जिज्ञासा : भाग – १६

प्रश्न ६९ : काश्यप बंधू कधी प्रव्रजित झाले?

उत्तर : भगवान बुद्ध उस्वेलेस गेले. तेथे अभिपूजकांच्या एका मोठ्या पंथाचे जटाधारी साधु फाला नदीच्या काठावर राहत. उरुवेल काश्यप नावाचा त्यांचा गुरू होता. तो फार विदान म्हणून प्रसिद्ध होता, त्याला व त्याच्या दोन्ही भावांना (नदी काश्यप व गया काश्यप यांना) भगवान बुद्धांनी प्रव्रजित केले. त्यामुळे त्यांचे सर्व जटाधारी जटील शिष्य देखील भगवान बुद्धांचे अनुयायी झाले.

उरुवेल काश्यपाचे पाचशे, नदी काश्यपाचे तीनशे आणि गया काश्यपाचे दोनशे शिष्य होते. भगवंतांनी त्या अप्रिपूजकांना उपदेश दिला की – काम, क्रोध आणि अविद्या हीच ती अनिरूपे आहेत. ज्यात सर्व गोष्टी भस्मसात होतात व जगात दुख आणि शोक निर्माण करतात. काम, क्रोध आणि अविद्येचा अग्नी विझल्याने विद्या आणि पवित्र आचरणाचा अविर्भाव होतो.

प्रश्न ७० : भगवंतांचे मुख्य चारिका क्षेत्र कोणते होते?

उत्तर : भगवंत श्रावस्तीहून कोसल, कोसलहून मल्ल, मल्लहून वजी, वज्जीहून काशी आणि काशीहून मगध जनपदांमध्ये अधिकाधिक विहार करीत असत. हा सारा प्रदेश सध्याचा उत्तर प्रदेश व बिहार याच्या अंतर्गत येतो.

प्रश्न ७१ : त्यांच्या कडून व त्यांच्या शिष्यांकडून कोण कोणत्या प्रकारच्या लोकांनी दीक्षा घेतली?

उत्तर : सर्व दर्जाच्या, सर्व देशांच्या आणि सर्व जातीच्या लोकांनी दीक्षा घेतली. एक आणि राव, श्रीमंत आणि गरीब, निर्बल आणि बलवान, अशिक्षित तसेच प्रकांड पंडित अशा सर्व प्रकारच्या लोकांनी त्यांच्या धम्माची दीक्षा घेतली. त्यांचा पम्म सर्वाकरिताच सोईस्कर होता. स्वतःच सगळ्यांना भिक्खूची दिक्षा देणे. शक्य नसल्यामुळे परगावी भिक्खूनीच दिक्षा देण्याचा नियम त्यांनी घालुन दिला.

प्रश्न ७२ : भगवान बुद्धांची उपसंपदा झाली होती काय?

उत्तर : बुद्ध गयेमधील पिंपळाच्या वृक्षाखाली बसून भगवान बुद्धांनी बुद्धत्वाचा लाभ घेतला होता, तीच त्यांची उपसंपदा होती. त्या वृक्षाखाली भगवंतांना बुद्धत्व प्राप्त झाले होते, म्हणून त्याला ‘बोधी वृक्ष’ म्हटले आहे.

प्रश्न ७३ : राजा बिंबिसाराने धम्म दीक्षा कधी घेतली?

उत्तर : राजगृह मगध नरेश श्रेणिक बिबिसाराची राजधानी होती. भगवंताचे राजगृहास आगमन झाल्यावर त्याला वाटले की – कट्टर जटिलांचे मत परिवर्तन करणारे स्वतः सम्यक संबुद्ध अवश्य असतील. म्हणून तो हजारो ब्राह्मण आणि प्रजाजनांसह भगवंतांकडे गेला. तेथे उरुवेल काश्यपाला पाहून लोकांना कुतूहल वाटले. त्यांना भगवंतांनी धर्मोपदेश दिला. तेव्हा राजा बिंबिसार भगवंतांचा शरणागत उपासक झाला

बौद्ध धम्म जिज्ञासा : भाग – १७

प्रश्न ७४ : अनाथ पिण्डिकाची धम्म दीक्षा कधी झाली?

उत्तर : कोसल जनपदाची राजधानी श्रावस्ती येथे सुदत्त नावाचा नागरिक होता. कोसल देशाचा राजा प्रसेनजित याचा मुदत्त हा खजांजी (श्रेष्ठी) होता व दरिद्री लोकांना तो पुष्कळ दान देत असे, म्हणून त्याचे नाव अनाथ पिण्डिक असे पडले. तो राजगृहास आपल्या मेहूण्याकडे गेला. तेव्हा तेथे भगवंतांच्या आगमनासाठी फार मोठी तयारी करताना त्याने पाहिले.

तेथेच त्यास भगवंतांचे दर्शन झाले व धर्मोपदेशाचा लाभ झाला. त्याने भगवंतास विचारले की, आपली धन, संपत्ती, घरदार आणि कारभार यांचा त्याग करून संन्यासी होणे. धर्म जीवनाचे सुख प्राप्त करण्यासाठी आवश्यक आहे काय? त्यावर भगवंतांनी उपासक राहून देखील धर्म लाभ करता येतो, अशी त्यास शिकवण दिली. तेव्हापासून तो भगवंतांचा शरणागत उपासक झाला. उपासक राहूनच त्याने धम्माची व संघाची बरीच मोठी सेवा केली.

प्रश्न ७५ : राजा प्रसेनजितास भगवंतांनी कोणता उपदेश दिला?

उत्तर : भगवान जेतवनात असताना राजा प्रसेनजित त्यांच्याकडे गेला व भगवंतास धम्मोपदेश देण्याची विनंती केली. भगवंतांनी राजाला असा उपदेश दिला. :-

“आपली चांगली किंवा वाईट कर्मे आपला छायेप्रमाणे पाठलाग करीत असतात. मैत्रीपूर्ण हृदयाची आवश्यकता सर्वाधिक आहे. आपल्या प्रजेस आपल्या एकुलत्या एक अपत्यासारखे समजावे. दुसऱ्यांना खाली पाडून स्वतःस वर नेण्याचा प्रयत्न करू नये. दुःखी लोकांना सांत्वना द्यावी. राजकीय थाटमाटाला विशेष महत्व देऊ नये. खुशामती लोकांच्या गोड गोड गोष्टीच ऐकू नये. काया, क्लेशाने स्वतःस त्रास देऊ नये. धर्म आणि सुमार्ग याचा विचार करावा. अन्याय करू नये.

कामामीचे भय सर्वासाठी समान आहे. जो एक वेळ त्या भोवऱ्यात फसेल त्याचे बाहेर पडणे कठीण असते. धम्माची अशी मागणी आहे की, ‘मार’ रूपी शत्रूपासून स्वतःला सुरक्षित ठेवावे. स्वत:च्या विचारांवर नजर असू द्यावी जेणेकरून हातून काहीच वाईट घडणार नाही. भौतिक वस्तूंच्या तुच्छतेवर खोलवर विचार करायला पाहिजे. जीवनाच्या अस्थिरतेला चांगल्या प्रकारे समजून घ्यावे. राज धर्माच्या नियमांचे उल्लंघन करू नये. बाह्य पदार्थाना आपल्या प्रसन्नतेचा आधार न बनविता, प्रितियुक्त मनासच प्रसन्नतेचा आधार बनवावे म्हणजे राजाचे यश भविष्यात अमर होईल.”

प्रश्न ७६ : जीवकाने धम्म दीक्षा कधी घेतली?

उत्तर : राजगृहातील एक वेश्या शालबती हिचा तो पुत्र होता. त्याला कचऱ्याच्या ढिगाजवळ एका टोपलीत जिवंत पाहून त्याचे नाव जीवक असे ठेवण्यात आले. पुढे त्याने दुसऱ्यांचे जीवन वाचविण्याचे व्रत घेतले व तो नामांकित वैद्य झाला. त्याने बिंबिसार राजाला भगंदर रोगापासून मुक्त केले.

त्याने राजगृहातील एकाच्या डोक्यावर शल्य चिकित्सा केली आणि काहींच्या आंतड्यावर ही शल्य क्रिया केली. जीवकाची तथागतांवर खूपच श्रद्धा होती व तो श्रमणांची निःशुल्क चिकित्सा करीत असे. तो तथागतांचा गृहस्थ उपासक होता. त्याला राजा कडून मिळालेली शाल जोडी त्याने भगवंतांना अर्पण केली. तेव्हा भगवंतांनी सर्वच भिक्खूना चिवर दान स्वीकारावयास अनुमती दिली.

प्रश्न ७७ : विशाखेने भगवंतास कोणते आठ वर मागून घेतले?

उत्तर : श्रावस्ती नगरी मध्ये विशाखा नांवाची एक अत्यंत श्रीमंत स्त्री राहत होती. ती धनंजय श्रेष्ठीची कन्या व मिगार श्रेष्ठीची सून होती. तिची भगवंतांवर अतीव श्रद्धा होती. तिने पाराम नांवाचा बगीचा भिक्खू संघास दान केलेला होता. दायिका – उपासिकांमध्ये सर्वश्रेष्ठ अशी तिची ख्याती होती. तिने भिक्खू संघाच्या हिताकरिता भगवंतांजवळ आठ वर मागून घेतले व ते काय आहेत? हे जाणून घेतल्यावर भगवंतांनी तिला अनुमती दिली. विशाखा म्हणाली – भगवंत जे वर मी मागू इच्छिते. ते योग्य व कल्याणकारी आहेत ..ते वर असे :-

(१) पूर्ण वर्षासाठी भिक्खू संघाला लागणारी वस्त्रे माझ्या आयुष्यभर मी पुरवावी, अशा माझी इच्छा आहे.

(२) मी आगंतुक भिक्खूना भिक्षान्न देऊ इच्छिते.

(३) येथून परगावी जाणाऱ्या भिक्खूना भिक्षान्न देऊ इच्छिते.

(४) आजारी भिक्खुंकरिता भिक्षान्न देऊ इच्छिते.

(५) आजाऱ्याची शुश्रूषा करणाऱ्या भिक्खूना ही भिक्षान्न देऊ इच्छिते.

(६) आजारी भिक्खुंकरिता औषधे देऊ इच्छिते.

(७) सर्व भिक्खू संघाला तांदळाची खीर (पायस) देऊ इच्छिते.

(८) भिक्खूणी करिता स्नानाच्या वेळी वापरण्यासाठी वस्त्रे देऊ इच्छिते.

त्यावर भगवंतांनी विचारले – “विशाखे, असे कोणते कारण पहले की तू तथागताकडून हे आठ वर मागत आहेस?’ त्यावर तिने सांगितले – “भगवंत मी दासीला आज्ञा दिली होती की, जा भोजन तयार असल्यामुळे भिक्खू संघाला बोलावून आण.”

तेव्हा दासीला विहारात भिक्खूनी पाऊस पडत असतांना आपली वस्त्रे काढलेली आहेत, असे दिसले. भगवंत नाता पृणास्पद आणि मलिन आहे, म्हणून मी वर्षा ऋतूसाठी संघाला विशेष प्रकारची वस्त्रे आजीवन पुरविण्याची इच्छा केली. आगंतुक भिक्खुला रस्त्यांची माहिती नसल्यामुळे, विहारात परत येतांना भिक्षाटनाने तो पूर्णपणे थकून गेलेला असतो, म्हणून आगंतुक भिक्षूना अन्नदान करू इच्छिते.

भिक्षेच्या शोधांत राहिल्याने प्रवासास जाणारा भिक्षु बरोबरीच्या भिक्खूच्या मागे सुटू शकतो, हे तिसरे कारण, चवथे कारण असे की – आजारी भिक्खूला पथ्यकारक अन्न मिळाले नाही तर त्याचा आजार वाढू शकतो. पाचवे कारण असे की – जो भिक्खू आजान्याची सुश्रूषा करावयास त्याच्या जवळ थांबलेला असतो, याला भिक्षा मागावयास बाहेर जायची संधीच मिळायची नाही. सहावे कारण असे की – जर आजारी भिक्खूला योग्य औषधी मिळाली नाही.

तर त्याचा आजार वाढू शकतो. सातवे कारण असे की – भगवंतांनी तांदळाच्या खिरीची स्तुती केलेली आहे. कारण तिने मन ताजेतवाने होते. आठवे कारण असे की – भिक्षुणी अचिरावती नदीच्या एकाच घाटावर गणिकांच्या सोबत नग्न अवस्थेत स्नान करतात व गणिका भिक्खुणींचा उपहास करतात. भगवंत स्त्रियांची नग्नता किळसवाणी, तिरस्करणीय आणि मलिन असते. त्यावर सर्वांनी तिला साधुकार दिला.

प्रश्न ७८ : रट्टपालाने दीक्षा कधी घेतली ?

उत्तर : तथागत कुरु देशात भ्रमण करीत असताना चुल्लकोट्ठीत नावाच्या एका गावात आले. तेथे इतरांसोबत रट्टपालाने ही भगवंतांचा उपदेश ग्रहण केला व त्यास प्रनजित व्हावयाची उत्कट इच्छा झाली. तेव्हा भगवंतांनी त्यास माता, पित्याची परवानगी घ्यावयास सांगितले. तो एकुलता एक पुत्र असल्याने माता, पित्यांनी परवानगी नाकारली. तेव्हा केवळ जमिनीवरच तो झोपला व म्हणाला की – मी एक तर भिक्खुं होईल किंवा जमिनीवर पडल्या पडल्याच मृत्यूस प्राप्त होईल. शेवटी माता, पित्यांनी त्यास परवानगी दिली. त्यानंतर त्याने परीवज्रा घेतला व पुढे तो आदर्श भिक्खू बनला.

बौद्ध धम्म जिज्ञासा : भाग – १८

प्रश्न ७९ : भगवान बुद्धांचे सर्वात विद्वान आणि प्रिय शिष्य कोणते होते?

उत्तर : सारिपुत्र आणि मोग्गल्लान हे दोघे त्यांचे अग्रश्रावक होते. ते त्यापूर्वी संजय नावाच्या तपस्व्याचे मुख्य शिष्य होते. संजयाचे अडीचशे शिष्य होते. सारिपुत्रास अश्वजित् स्थवीर नावाचे भगवंतांचे शिष्य भेटले. त्यांच्या चेहऱ्या वरील धीर गंभीर तेज पाहून सारिपुत्राने भगवंताकडे जाण्याचे ठरविले. सारिपुत्र अतिशय विद्वान, ‘प्रज्ञावंत’ म्हणून आणि मोग्गल्लान दैवी शक्ती प्राप्त असलेले ‘सिद्धिवंत’ म्हणून प्रसिद्ध होते.

प्रश्न ८० : भगवंतांनी भिक्खुना धम्म प्रचारासाठी ‘चरथ भिख्खवे चारिक’ हा आदेश कधी दिला?

उत्तर : भगवान ऋषिपत्तनात राहत असताना त्यांच्यापाशी साठ भिक्खूचा संघ जमला. हे सगळे भिक्खू अर्हत पदाला पोहोचले होते. त्यांना एकत्र जमवून ते म्हणाले :-

भिक्खूनो…

बहुजनांच्या हितासाठी, बहुजनांच्या सुखासाठी, लोकांवर अनुकंपा करण्यासाठी, देवांच्या आणि मनुष्यांच्या कल्याणासाठी धम्मोपदेशाचा प्रसार करावयास भ्रमण करा. प्रारंभी कल्याणप्रद, मध्यंतरी कल्याणप्रद व शेवटी कल्याणप्रद अशा या धम्म मार्गाचा अर्थ आणि भावासहित परिशुद्ध अशा ह्या धर्माचा ब्रह्मचर्य राखून प्रकाश करा.

चरथ भिक्खवे चारिकं, बहुजन हिताय, बहुजन सुखाय, लोकानुकंपाय अत्थाय, हिताय, सुखाय देवमनुस्सान, देसेत्थ भिक्खवे धर्म, आदि कल्याणं मज्झेकल्याणं, परियोसान कल्याणं, सात्थं सव्यंजनं केवल परिपुण्णं परिसुद्धं ब्रह्मचरियं पकासेथ।

प्रश्न ८१ : भगवंतांनी अनेक खेडूत ब्राह्मणांना देखील धम्म दीक्षा दिली काय?

उत्तर : होय. एक छोटेसे गाव होते. त्यात सत्तर ब्राह्मण परिवार राहत असत. ते सर्व पशु पालनाने उपजीविका करीत असत. त्यांना भगवंतांनी उपदेश केला की, जे सत्य आणि असत्याला समजून घेतात. त्या सम्यक दृष्टि लोकांना सद्गती प्राप्त होते. पुढे त्या सर्वांनी श्रमण व्हावयाची इच्छा व्यक्त केली आणि लवकरच ते सर्व भिक्खुं संघात सामील झाले.

प्रश्न ८२ : उत्तरवतीच्या ब्राह्मणांनी धम्म दीक्षा कधी घेतली?

उत्तर : जेव्हा भगवान बुद्ध श्रावस्तीच्या जेतवनामध्ये विहार करीत होते आणि सर्वांच्या कल्याणार्थ उपदेश देत होते. तेव्हा श्रावस्तीच्या पूर्वेकडील उत्तरवती गावी पाचशे ब्राह्मण राहत होते. ते सर्व गगेच्या काठावर निवास करीत असलेल्या व शरीरावर धूळ माखणाऱ्या निर्ग्रन्थ तपस्व्याकडे (म्हणजे भगवान महावीरांच्या शिष्यांकडे) जावयाचा विचार करीत होते. रस्त्यामध्येच त्यांना फार तहान लागली.

तेव्हा एका वृक्ष देवतेने त्यांना यथेच्छ पाणी पाजले आणि असा उपदेश दिता की – यज्ञयाग इत्यादी रात्रं – दिवस दुख देणारे व चिंतेचे जनकच आहेत. चिंतेपासून मुक्त व्हावयास भगवान बुद्धांच्या धर्माचा स्वीकार करणे उत्तम होय. तेव्हा ते सर्व ब्राह्मण श्रावस्तीला गेले व भगवंतांचे शिष्य झाले.

भगवंतांनी त्यांना उपदेश केला की – माणूस ना राहो किंवा लांब जटा धारण करो किंवा पानांची व चिवरांची वल्कले धारण करो किंवा शरीरावर धूळ टाकून दगडावर झोपणारा असो. त्यामुळे त्याला तृष्णेपासून मुक्ती मिळत नाही. परंतु जो कोणाशी कलह करीत नाही. कुणाची हत्या करीत नाही. कुणाला पराजित करून विजयी होऊ इच्छित नाही. ज्याची सर्वाप्रती मैत्रीची भावना आहे. अशा माणसाला कोणाविषयी द्वेष किंवा घृणा होत नाही. जो सदाचारी आहे. जो वरिष्ठांचा आणि वृद्धांचा आदर करतो. त्याला चार गोष्टींची प्राप्ती होते. आयु, वर्ण, सुख आणि बल!

प्रश्न ८३ : भगवंतांची उपसंपदा झाली होती काय?

उत्तर : होय. बोधी वृक्षाखाली भगवंतांना जे बुद्धत्व मिळाले तीच त्यांची उपसंपदा होय. जशी उपसंपदा त्यांचे अनुयायी घेत होते. तशी त्यांनी कुणा दुसऱ्या कडून उपसंपदा घेतली नाही. भगवंतांनी नियम बांधून दिला की भिक्खूने प्रथम उपसंपन्न व्हायलाच पाहिजे. सर्व भिक्खू त्याचे आयुष्यभर पालन करतात.

Conclusion

In conclusion, the journey of curiosity about Buddhism (बौद्ध धम्म जिज्ञासा) unveils a profound and enriching path that transcends the boundaries of mere religion. It is a philosophy, a way of life, and a contemplative practice that invites individuals to explore the depths of their consciousness while embracing the interconnectedness of all existence.

Exploring Buddhism often begins with questions—questions about suffering, existence, and the nature of reality. Yet, as one delves deeper into its teachings, it becomes evident that Buddhism offers not just answers but a framework for understanding and navigating life’s complexities.

At its core, Buddhism encourages self-reflection, mindfulness, and compassion. It guides us toward understanding the impermanent nature of reality, the significance of letting go, and the liberation found in living authentically and in harmony with oneself and others.

The journey of curiosity about Buddhism isn’t merely an academic pursuit; it’s an experiential odyssey. It involves meditation, introspection, and embodying the teachings in everyday life. It’s about cultivating wisdom, kindness, and a sense of interconnectedness with all beings.

In a world often characterized by haste and turmoil, the principles of Buddhism offer a sanctuary—a way to find peace amidst chaos, and meaning in the face of uncertainty. It transcends cultural and religious boundaries, resonating with people from diverse backgrounds who seek solace, wisdom, and a deeper understanding of themselves and the world.

Ultimately, the journey into Buddhism is a personal one. It’s about embracing curiosity, embarking on a quest for understanding, and finding resonance with its teachings that can profoundly transform our perspectives and way of being in the world. Whether one becomes a devout practitioner or simply adopts its principles in daily life, the journey of curiosity about Buddhism is a remarkable exploration of the human spirit and our quest for meaning and fulfillment.

You may like this: ओळख बुद्धांची: Brief Information About Buddha In Marathi

Listen to our podcast: Buddha Dhamma in Marathi

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *