Buddha Dhamma in Marathi

मन-बुद्धी बोध आणि बुद्धत्व | Buddhism In Marathi

Explore the profound teachings of Buddhism in Marathi, a language that adds depth and richness to these ancient philosophies.Gain insights into the peaceful and mindful way of life promoted by Buddhism, and discover how its teachings can bring tranquility and understanding in today’s fast-paced world.

मन-बुद्धी बोध आणि बुद्धत्व | Buddhism In Marathi

मन-बुद्धी बोध आणि बुद्धत्व | Buddhism In Marathi
मन-बुद्धी बोध आणि बुद्धत्व | Buddhism In Marathi

हे जग म्हणजे एक आश्चर्यच! या जगात दररोज घडणाऱ्या घटना पाहून किंवा ऐकून आपले मन विदीर्ण होऊन जाते. येथील विविध जाती, वेषभूषा, चालीरीती, जीवनशैली, परंपरा, धारणा विभिन्न आहेत.

यापैकी कोणती योग्य आणि कोणती अयोग्य, हाच प्रश्न सर्वांना पडतो. खरे तर प्रत्येकालाच आपली धारणा योग्य वाटते. मात्र, या विस्मयजनक जगात काही जण मात्र बुद्ध न राहता बुद्ध बनतात.

बुद्ध होण्याच्या प्रवासात सर्वप्रथम बुद्धी आणि सामान्य ज्ञानाचा उपयोग होतो. विविध धारणा समजुतींच्या सापळ्यातून सुटका करण्यासाठी बुद्धीचाच उपयोग होतो. मात्र, हीच बुद्धी बुद्धिविलासात अडकली तर हा गुंता सुटण्याऐवजी वाढतच जातो.

पण आपल्या बुद्धीचा अत्युच्च विकास केला तर तिच्या साहाय्याने आपण प्रज्ञावान आणि स्थितप्रज्ञ बनतो. मन आणि बुद्धीचा वापर कसा करायचा? मनाला निर्मळ कसे ठेवायचे ? मन आणि बुद्धी यांचा समन्वय कसा साधायचा? एखादा मनुष्य जेव्हा या सर्व गोष्टींचा ताळमेळ साधतो, तेव्हा त्याच्या बुद्धीचा सर्वोच्च विकास होतो.

सिद्धार्थ गौतमांनी मन आणि बुद्धी यांचा सम्यक उपयोग केला, त्यामुळेच त्यांना संबोधी प्राप्त झाली. जी बुद्धी आपल्याला संबोधीपर्यंत घेऊन जाते, तीच बुद्धी सम्यक आणि तेजस्वी बुद्धी होय. संबोधी म्हणजे समज (अंडरस्टॅण्डिंग). या संबोधीनंतरच बुद्धत्व प्राप्त होऊ शकते. बुद्ध हे नाव किंवा उपनाव नाही.

तर बुद्ध हे नाव आहे त्या अवस्थेचे जिथे, ‘मी कोण आहे’ हे मनुष्य जाणतो. या अवस्थेला पुढील नावदेखील दिले जाऊ शकते. जसे, गुरू नानक, संत मीरा, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम, रामकृष्ण परमहंस, रमण महर्षी इत्यादी. अशा या व्यक्ती वेगवेगळ्या असल्या, तरी या सर्वांचा अनुभव समानच आहे. ही अनुभूती मिळवणेच खरे अध्यात्म आहे, बुद्धत्व आहे.

संबोधी प्राप्त झाल्यानंतर भगवान बुद्धांचा अनेक लोकांशी संपर्क आला. त्यात गृहस्थ, राजघराण्यातील व्यक्ती, संन्यासी, सर्वसामान्य आबालवृद्धांचा समावेश होता. ज्ञानप्रसार करताना बुद्धांनी वेगवेगळ्या लोकांसाठी तीन वेगवेगळे मार्ग सांगितले.

कारण प्रत्येकाची जीवनगीता वेगळी असते. महाभारतात श्रीकृष्णांनी सांगितलेली गीता अर्जुनासाठी होती. अर्जुनाऐवजी श्रीकृष्णांसमोर दुर्योधन असता, तर अर्जुनापेक्षा वेगळे प्रश्न त्याने विचारले असते. त्यामुळे गीतेतही बदल झाला असता. कारण, अर्जुन व दुर्योधन या दोघांच्या जाणिवेत मूलभूत फरक होता.

भगवान बुद्धांनी आपल्या सम्यक ज्ञानाद्वारे लोकांची मनःस्थिती ओळखून त्यांना मार्गदर्शन केले. ज्यांनी बुद्धांचे मार्गदर्शन ध्यानपूर्वक ऐकले, समजून घेतले, त्यांनी बुद्धांच्या सहवासाचा पुरेपूर लाभ मिळवला. मात्र, ज्यांनी बुद्धांचे नुसतेच शब्द ऐकले, ते पूर्वीसारखेच जीवन जगत राहिले.

एकदा एक भिक्षु गावात भिक्षा मागत फिरत होता. त्याच वेळी एक पक्षी त्याच्या डोक्यावरून उडत गेला. तो पक्षी चोचीतून नेत असलेला मांसाचा तुकडा या भिक्षूच्या भिक्षापात्रात पडला. तो भिक्षु बुद्धाकडे जाऊन म्हणाला, ‘मी हे खाऊ की नको?

कारण आपण नेहमी सांगत असता, की भिक्षापात्रात जे पडेल ते स्वीकारून खाल्लं पाहिजे. पण, आपण मात्र मांस खाण्याची आज्ञा दिली नाही. आता मी काय करू?’ अशी घटना अगदीच दुर्मीळ असते, अनेक वर्षांतून कधीतरी घडते, हे बुद्धांना ठाऊक होते. म्हणून भिक्षापात्रात जे काही पडेल ते खाण्याची बुद्धांनी भिक्षूना आज्ञा दिली होती.

मात्र, यामुळे काही लोकांना मांसाहार करण्याची जणू मुभाच मिळाली. ज्या घरांत जास्त मांसाहार होतो, अशी काही घरे भिक्षूना ठाऊक होती. म्हणून ते तशाच घरांसमोर भिक्षा मागायला जाऊ लागले. मग भिक्षापात्रात मांस मिळाल्यावर, भिक्षापात्रात जे पडेल, ते स्वीकारून खाण्यास बुद्धांनी सांगितले आहे.

आम्ही त्यांचीच आज्ञा पाळत आहोत, असा युक्तिवाद करून ते मांसाहार करू लागले. अशा त-हेने थोडी मुभा मिळाली की मानवी मन त्यातून सोयीस्कर अर्थ काढून मूर्खपणा करत असते.

बौद्ध धर्म म्हणजे नकारात्मक किंवा नास्तिक लोकांचा धर्म, असा गैरसमज आहे. बुद्धांनी दुःखावर भाष्य केले, त्याची ओळख करून दिली म्हणून त्यांना दुःखवादी समजले गेले. बुद्धी न वापरता बुद्धांचे उपदेश समजून घेण्याचा प्रयत्न केला तर कोणीही भगवान बुद्धांच्या उपदेशांचा वास्तविक अर्थ समजून घेऊ शकणार नाही.

मग त्याशिवाय बुद्धीचा सर्वोच्च विकास होणार कसा? भगवान बुद्धांनी सांगितलेल्या अनेक मार्गांपैकी तीन मार्ग प्रचलित झाले. चला, तर मग या पुस्तकात त्या मार्गांविषयी जाणून घेऊ या. खुल्या मनाने व बुद्धीचा सम्यक उपयोग करून हे पुस्तक वाचावे.

भगवान बुद्धांची शिकवण आपण जर खऱ्या अर्थाने समजून घेतली, तर हे पुस्तक बोधप्राप्ती म्हणजेच सत्याकडे जाणारा सरळ मार्ग होऊ शकेल. प्रस्तुत पुस्तकात भगवान बुद्धांचे जीवन-चरित्र तीन मुख्य पात्रांद्वारे सादर केले आहे. शिवाय तीन टप्प्यांच्या रूपातील हे चरित्र वाचताना त्यामागील संकेतही आपल्याला समजून घ्यायचे आहेत.

बुद्धांच्या जीवनातील पहिला टप्पा म्हणजे राजकुमार सिद्धार्थ. दुसरा टप्पा आहे गौतम आणि तिसरा भगवान बुद्ध ! भगवान बुद्धांना गौतम बुद्ध किंवा सिद्धार्थ गौतम असेही संबोधले जाते. या नावांमागेही काही संकेत आहेत. पहिले नाव सिद्धार्थ, जो राजकुमार आहे. दुसरे नाव गौतम, जो सत्यसाधक आहे आणि बुद्ध ही एक अवस्था आहे. 

Conclusion

In conclusion, Buddhism in Marathi offers a unique perspective on life and spirituality, encouraging introspection and mindfulness. Its teachings, conveyed through the elegance of the Marathi language, inspire a sense of peace and harmony within oneself and with the world.

Embracing these teachings can lead to a more fulfilling and enlightened existence, transcending barriers of language and culture.

You may like this: ओळख बुद्धांची

Follow our podcast: Buddha Dhamma in Marathi

Buddha Dhamma in Marathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *