Buddha Stories

20. कर्म बंधन बनू नये | Buddha Thoughts on Karma in Marathi

Explore the concept of karma in Buddhism with ‘कर्म बंधन बनू नये | Buddha Thoughts on Karma in Marathi.’ Understand how karma influences our lives and discover the path to peace, enlightenment, and liberation through Buddha’s teachings.

कर्म बंधन बनू नये | Buddha Thoughts on Karma in Marathi

भगवान बुद्ध एके दिवशी आपल्या भिक्षूसमवेत एका गावात मुक्कामाला होते. त्या गावातला एक माणूस भगवान बुद्धांचा विरोधक होता. त्याला जेव्हा समजले, की त्या गावात बुद्धांचे आगमन झाले आहे, तेव्हा तो बुद्धांकडे गेला.

तिथे जाऊन त्याने बुद्धांना अद्वातद्वा बोलायला सुरुवात केली. भगवान बुद्ध शांतपणे बसून होते. त्यांनी कुठलीच प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. बुद्ध काहीच प्रतिक्रिया देत नाहीत, हे जाणवल्यावर त्याने त्यांना शिवीगाळ करणे सुरू केले. तरीही बुद्ध शांतच बसून होते.

अखेर त्या माणसाने बुद्धांना विचारले, ‘तुम्ही मला काही उत्तर का देत नाहीत? काही तरी बोला.’ तेव्हा बुद्ध उत्तरले, ‘तू तुझं काम केलंस. आता मी माझं करेन. मी काही तुझा गुलाम नाही.’ थोड्या वेळाने तो माणूस बुद्धांजवळ जाऊन म्हणाला, ‘माझ्याकडून चूक झाली. मला क्षमा करा.’

बुद्ध शांतच बसलेले पाहून तो माणूस पुन्हा म्हणाला, ‘तुम्ही मला क्षमा का करत नाहीत?’ त्यावर बुद्ध उत्तरले, ‘अद्याप खूप वेळ आहे. आधी तू काही चुकीचं काम केलंस का, हे नक्की ठरव. कारण चूक केली असेल तरच क्षमा करण्याचा प्रश्न येतो. मी जे काही करेन ते माझ्या आकलनानुसार करेन. मी तुझा गुलाम नाही.’ हे ऐकून तो माणूस संभ्रमित अवस्थेत तेथून निघून गेला.

तो गेल्यावर भिक्षूनी गौतम बुद्धांना विचारले, ‘तुम्ही त्या माणसाला काही बोलला का नाहीत ?’ यावर गौतम बुद्धांनी त्यांना विचारले, ‘समजा, एखादी व्यक्ती तुमच्यासाठी खूप भेटवस्तू घेऊन आली आहे. पण, तुम्ही त्या स्वीकारल्याच नाहीत तर काय होईल?’ त्यावर एका भिक्षुने उत्तर दिले, ‘त्या आणलेल्या भेटवस्तू त्याला परत घेऊन जाव्या लागतील.’

हे ऐकून बुद्ध उत्तरले, ‘अगदी बरोबर. तो माणूस मला भेटीदाखल अनेक शिव्या घेऊन आला होता. पण त्या मी स्वीकारल्याच नाहीत. त्यामुळे त्या शिव्या त्यालाच परत घेऊन जाव्या लागल्या. ती शिव्यारूपी भेटवस्तू आता त्या माणसासोबतच आहे.’

बुद्धांकडून कशी कर्मे घडत होती, हे या उदाहरणातून आपल्याला दिसते. कोणते कर्म केल्यानंतर कर्मबंधन बनणार नाही, ही शिकवण आपल्याला बुद्ध, येशू ख्रिस्त अशा महापुरुषांच्या जीवनातून मिळेल. घटना घडल्यानंतर आणि कर्म करण्यादरम्यान जो भाग आहे तो आपापल्या संवेदनशीलतेनुसार छोटा-मोठा वाटू शकतो.

काही जण तांदळाच्या छोट्याशा दाण्यावर शब्द लिहितात. तोच तांदळाचा दाणा तुमच्यासमोर ठेवला, तर तुम्हांला त्याच्यावर लिहिण्यासाठी जागाच सापडणार नाही. पण, जी व्यक्ती कुशल असेल, तिच्यासमोर हा तांदळाचा दाणा ठेवला तर ती म्हणेल, ‘तांदळावर खूप जागा आहे. त्यावर मी लिहू शकेन.’

जे कुशल असतात, त्यांना तांदळाचा छोटासा दाणाही मोठा वाटू शकतो. त्या दाण्यावर खूप जागा असून त्यावर आपण लिहू शकतो, संदेश पाठवू शकतो, याची खातरी त्यांना असते. तुम्ही बुद्ध, येशू ख्रिस्त अशा महापुरुषांचे आयुष्य पाहिले तर तुमच्या लक्षात येईल, की ते कुठल्याही कर्मबंधनात अडकत नाहीत.

कर्म बंधन बनू नये | Buddha Thoughts on Karma in Marathi Image
कर्म बंधन बनू नये | Buddha Thoughts on Karma in Marathi Image

कारण त्यांचे जीवन अव्यक्तिगत (इम्पर्सनल) असते. जेव्हा जीवन व्यक्तिगत असते, तेव्हा ते अहंकारयुक्त असते. ‘मी शरीर आहे’ या अज्ञानातून जेव्हा जीवनप्रक्रिया सुरू असते, तेव्हा त्या व्यक्तीकडून ज्या क्रिया होतात, त्याद्वारे बंधन निर्माण होते. मात्र, अव्यक्तिगत जीवनाद्वारे ज्या क्रिया घडतात त्यातून बंधन निर्माण होत नाही. क

तुम्ही कोणतीही क्रिया केली नाही, तरीही क्रिया न करण्याचे कर्म आपल्याकडून झालेलेच असते. शिवाय त्याचे फळही तुम्हांला मिळते. माणसाकडून खूप कर्मे होतात. त्यातून बंधनेही निर्माण होतात. त्यामुळे अशी अव्यक्तिगत (दुसऱ्यांना लाभ होईल अशी) कर्मे आपल्याकडून व्हायला हवीत, ज्यामुळे बंधनांची निर्मिती होणार नाही.

भगवान बुद्ध, येशू ख्रिस्त आदी महान संतांद्वारे वर्षानुवर्षे अव्यक्तिगत आणि उच्च कर्म होत होती. त्यांचे संपूर्ण जीवन अव्यक्तिगत असल्याने ते कर्मबंधनात अडकले नाहीत. त्यांच्या अशा कार्यातून प्रेरणा घेत आपलेही जीवन अव्यक्तिगत बनावे, हीच अपेक्षा.

You may like this: Buddha Story on Temperament: आपला खरा स्वभाव जाणा

Follow our Podcast: Buddha Dhamma in Marathi

Conclusion on Buddha Thoughts on Karma in Marathi

Understanding the concept of karma in Buddhism can bring about positive changes in our lives. Karma is not just the result of our actions but also a reflection of our thoughts and emotions.

Everything we do affects our lives through karma. Therefore, to follow the path of peace, enlightenment, and liberation, it is essential to cultivate good karma.

Inspired by Buddha’s teachings, we can experience peace and happiness in our lives. Let’s strive to break free from the bonds of karma and move forward on the path of peace.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *