Buddha Stories

बुद्ध कथा -५: उपाली आणि शाक्य तरुणांची दीक्षा | Buddha Story

Explore the profound teachings and timeless wisdom of Buddhism through our insightful blog post on Buddha Story in Marathi. Delve into the rich narratives and enlightening stories that embody the essence of Buddhist philosophy.

बुद्ध कथा

तथागत बुद्ध आपल्या भिक्खूंसह लोकांना सदाचरणाचा उपदेश करत गावोगाव फिरायचे. बुद्धांच्या उपदेशाने, वागण्याने प्रभावित होऊन, अनेक लोक धम्माची दीक्षा घ्यायचे आणि संघात प्रवेश करायचे. असेच एकदा भद्दीय, आनंद, अनुरुद्ध, भगू, किमील आणि देवदत्त हे सहा शाक्य तरुण बुद्ध विचारांनी प्रेरित झाले आणि त्यांनी दीक्षा घेण्याचे ठरवले.

हे सर्व तरुण अतिशय श्रीमंत आणि शूर अशा शाक्य कुटुंबात जन्मले होते. शाक्यांचे एक वैशिष्ट्य म्हणजे बहुतेक शाक्य हे शीघ्रकोपी म्हणजे लवकर चिडणारे होते. त्यांच्याकडे प्रचंड संपत्ती व सैन्य होते. त्यांच्या सैन्याला ‘चतुरंग सेना’ म्हटले जायचे. लहानपणापासून त्यांची सेवा करणारा ‘उपाली’ नावाचा एक नाभिक सेवक सतत त्यांच्यासोबत असायचा.

एके दिवशी बुद्धांकडून धम्माची दीक्षा घेण्यासाठी हे सहा तरुण आपल्या चतुरंग सेनेसह नगरातून बाहेर पडले. उपाली नाभिक सुद्धा त्यांच्या बरोबर होता. नगरपासून दूर गेल्यावर त्या शाक्य तरुणांनी आपली सेना परत पाठवली आणि परराज्यात प्रवेश केला. मग त्या सर्वांनी आपल्या अंगावरचे मौल्यवान दागिने उतरवून ते एका कापडात बांधले.

ते उपालीला म्हणाले, “उपाली, आजपर्यंत तू आमची खूप सेवा केलेली आहेस. कापडात बांधलेले हे सारे दागिने घे आणि परत जा. या दागिन्यांच्या आधारे तू तुझा उदरनिर्वाह कर.” उपालीने दागिन्यांचे गाठोडे हाती घेतले आणि त्या सहा जणांना नमस्कार करून तो परत जायला निघाला. परत जाताना त्याच्या मनात विचार आला आणि तो स्वतःला म्हणाला, “हे दागिने घेऊन मी चूक तर नाही ना केली? शाक्य तापट आहेत, रागीट आहेत.



Buddha Story in Marathi

मी या सहा जणांना मारून दागिने पळवले, असे तर इतर शाक्यांना वाटणार नाही ना?” तो एका झाडाखाली थांबला. अचानक त्याच्या मनात विचार आला, हे सहा शाक्य तरुण आपली सारी संपत्ती, सारे राजवैभव, सारे सुख सोडत आहेत. घरदार सोडून माणसाच्या भल्यासाठी, कल्याणासाठी हे तरुण सर्व प्रकारच्या सुखांचा त्याग करीत आहेत. मग मी तसे का करू नये? मानव हितासाठी जर हे सहा जण इतका मोठा त्याग करू शकतात, तर मग माझ्यासारख्या गरीब सेवकाने दीक्षा का घेऊ नये?

त्याच्याही मनात बुद्धांबद्दल, धम्माबद्दल जिज्ञासा निर्माण झाली. लगेच त्याने ते दागिन्यांचे गाठोडे एका झाडाच्या फांदीला बांधले आणि ‘जो पाहील त्याला दिले, त्याने न्यावे’, असे म्हणून तो माघारी फिरला. तो शाक्य तरुणांकडे परत गेला. उपाली परत आल्याचे बघून ते तरुण त्याला म्हणाले, “उपाली, तू परत का आलास? काय झालं?” तेव्हा उपालीने त्यांना सारी हकिकत सांगितली आणि आपल्याला सोबत घेण्याची विनंती केली. त्या सहा जणांना उपालीचे म्हणणे पटले. उपालीचे बोलणे ऐकून त्यांना अतिशय आनंद झाला.

त्यानंतर उपालीला बरोबर घेऊन ते सारे तथागतांकडे गेले. सर्वांनी अतिशय आदराने बुद्धांना वंदन केले आणि शांतपणे एका बाजूला जाऊन उभे राहिले. त्यांच्यापैकी एक शाक्य तरुण पुढे येत बुद्धांना नम्रपणे म्हणाला, “भन्ते, आम्ही सारे शाक्य तरुण धम्माची दीक्षा घेऊन आपल्या संघात येऊ इच्छितो. आमच्यासोबत आमचा सेवक नाभिक उपाली सुद्धा आलेला आहे. पण दीक्षा घेण्यापूर्वी आम्हा शाक्य तरुणांची तुम्हाला एक नम्र विनंती आहे. आम्ही शाक्य अभिमानी आहोत.

संपत्ती, सामर्थ्य इत्यादींचा अभिमान आम्ही बाळगतो. परंतु धम्माची दीक्षा घेतल्यावर हा अहंकार, हा दुरभिमान गळून पडावा, यासाठी तथागतांनी आधी उपाली नाभिकाला दीक्षा द्यावी. यामुळे तो सेवक असला तरी धम्माच्या बाबतीत आम्हाला ज्येष्ठ ठरेल. मग आम्ही त्याला उठून सामोरे जाऊ, हात जोडून अभिवादन करू. योग्य अशी इतर कामे करू, असे केल्यामुळे आम्हा शाक्यांचा शाक्य म्हणून असलेला अभिमान नाहीसा होईल. तेव्हा हे सुगत, आपण आधी उपालीला आणि नंतर आम्हाला दीक्षा द्यावी.”

बुद्धांनी सारी हकिकत शांतपणे ऐकली आणि हळुवार स्मित केले. मग त्यांनी आधी उपाली नाभिकाला आणि नंतर सहा शाक्य कुमारांना दीक्षा दिली. अशाप्रकारे उपाली नाभिक आणि सहा शाक्य तरुणांना बुद्धांनी धम्माची दीक्षा दिली. ज्या उपालीने दीर्घकाळ शाक्य तरुणांची सेवा केली, त्यांना अभिवादन केले, तोच पूर्वीचा सेवक उपाली आता संघात शाक्य कुमारांपेक्षा ज्येष्ठ ठरला. त्यामुळे शाक्य तरुण आता त्याला अभिवादन करायला लागले. त्याचा आदर करायला लागले.

अशाप्रकारे पूर्वीचा सेवक नाभिक उपाली आणि सहा शाक्यपुत्र बुद्धांच्या संघाचे सदस्य झाले. हेच उपाली पुढे जाऊन बुद्धांचे एक आवडते शिष्य म्हणून नावारूपास आले. त्यांच्या अंगी असलेल्या जिज्ञासेमुळे, कष्ट करण्याच्या तयारीमुळे संघात त्यांना मानाचे स्थान प्राप्त झाले. त्यांचा अभ्यास, व्यासंग बघून एकदा बुद्ध म्हणाले, “माझ्या शासनामध्ये विनय जाणणारांपैकी उपाली हा अग्रस्थानी आहे.” बुद्धांच्या सहवासात राहून उपाली यांनी अनेक चांगल्या गोष्टी शिकून घेतल्या.

पुढे बुद्धांच्या परिनिब्बानानंतर (निधनानंतर) थोड्याच दिवसांनी राजगृह येथे बुद्धांचा धम्म आणि विनय यांचे स्वरूप निश्चित करण्यासाठी पाचशे भिक्खूंची एक सभा आयोजित करण्यात आली. हीच सभा पहिली धम्मसंगीती म्हणून ओळखली जाते. भिक्खूंनी कसे वागावे, याविषयीचे नियम तयार करण्याची महत्त्वाची जबाबदारी सर्वांनी उपाली यांच्यावर सोपविली. या धम्मसंगीती मध्ये भिक्खू महाकस्सप यांनी इतर भिक्खूंच्या मनातील प्रश्न उपाली यांना विचारले.

उपाली यांनी बुद्धांच्या शिकवणीच्या आधारे या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. उपालींच्या उत्तरांवरून विनयाचे स्वरूप निश्चित करण्यात आले. इतकेच नव्हे तर बुद्धांनंतर सतत तीस वर्षे उपाली यांनी भिक्खूंना विनय शिकविण्याचे काम केले. अशा प्रकारे एका गरीब आणि अतिसामान्य कुटुंबात जन्मलेले, लोकांची सेवा करणारे उपाली नाभिक विनयाचे जाणकार ‘महाद्युति उपाली’ म्हणून इतिहासात अजरामर झाले.

तात्पर्य/बोध – शाक्य तरुणांनी स्वतःच्या संपत्तीचा दुरभिमान बाजूला सारून उपालींना आधी दीक्षा देण्याचे सुचवून त्यांचा गौरव केला, त्याचप्रमाणे आपण सुद्धा जात-धर्म संपत्ती इत्यादींचा अहंकार सोडून ज्ञानी माणसाचा गौरव केला पाहिजे. जात-धर्म संपत्ती यापेक्षा व्यक्तीचे गुण महत्त्वाचे आहेत. मिळालेल्या संधीचा योग्य उपयोग करून स्वतःचा विकास केला पाहिजे. व्यासंग, जिद्द आणि अभ्यास करण्याची तयारी असेल तर सामान्य माणूस सुद्धा यशस्वी होऊ शकतो. 

Conclusion

In conclusion, our Tales of Buddhism in Marathi blog post serves as a gateway to the timeless narratives and spiritual insights that Buddhism has to offer. As we wrap up this exploration, we encourage you to continue your journey of self-discovery and mindfulness.

May these tales inspire and guide you on a path towards inner peace, compassion, and enlightenment. Stay tuned for more engaging content that delves into the profound teachings of Buddhism, providing valuable lessons for personal growth and well-being.

Embark on this transformative journey with us and embrace the wisdom that has resonated through centuries. Thank you for joining us in unraveling the tales of Buddhism, and we look forward to sharing more enlightening stories in the future. May your path be filled with serenity and mindfulness.

You may like this: बुद्ध कथा -४: मौल्यवान काय? | Buddha Tales in Marathi

Follow our podcast: Buddha Dhamma in Marathi

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *