Buddha Dhamma in Marathi

सुख-दुःखापल्याडचे तेजुख | Buddha on Happiness In Marathi

Explore the teachings of Buddha on happiness in Marathi. Discover the profound insights and hidden meanings of joy and happiness in his teachings. Gain a new perspective on achieving true happiness through the wisdom of Buddha.

Buddha on Happiness In Marathi

सुख-दुःखापल्याडचे तेजुख | Buddha on Happiness In Marathi
सुख-दुःखापल्याडचे तेजुख | Buddha on Happiness In Marathi

दुःख या शब्दात दोन अक्षरं आहेत. पहिले अक्षर ‘दुः’ आणि दुसरे अक्षर ‘ख’ आहे. आपल्याला माहीत आहे, की जी गोष्ट वाईट असते, तिला संबोधताना प्रथम ‘दु’ हे अक्षर लावतात. उदाहरणार्थ, सरकारचे कामकाज वाईट असेल, तर दुःशासन म्हणतात. भावना चांगली नसेल तर दुर्भावना म्हणतात.

त्याचप्रमाणे हिंदीत दुःखाला आणखी एक शब्द आहे दुविधा. त्यातील ‘दु’ काढून टाकला तर मागे राहतो विधा किंवा विदा. विदा या हिंदी शब्दाचा अर्थ आहे निरोप देणे. त्या अर्थाने कुणा जवळच्या व्यक्तीस निरोप दिल्यास दुविधा म्हणूयात आणि निरोप देताना आनंद वाटला तर त्यास सुविधा म्हणता येईल. कारण त्यातून सुख मिळाले.

अशा प्रकारे आपण जेव्हा विकारांचा निरोप घेतो, तेव्हा आपल्याला सुविधा मिळते. आपल्या वृत्ती आणि पारंपरिक समजुतींचे जोखड सोडताना आपल्याला सुख मिळत असेल, तर याचाच अर्थ तुम्ही प्रगतिपथावर आहात. तसे करताना वाईट वाटत असेल, तर तुम्ही दुःखी आहात.

तुम्ही कुणाचा निरोप घेता किंवा कुणापासून विभक्त होता तेव्हा तुम्हांला कसे वाटते? बहुतेक वेळा दुःखच होते. या मोहाला मुरड घालण्यासाठी भगवान बुद्धांच्या उपदेशांमध्ये अनासक्त होण्याला खूप महत्त्व दिले आहे.

आपण जेव्हा एखाद्या गोष्टीचा किंवा व्यक्तीचा निरोप घेतो, तेव्हा दुःख होते. उदाहरणार्थ, आपण सकाळी झोपेतून जागे होतो, तेव्हा आपल्याला वाटते, आणखी थोडा वेळ झोपायला मिळाले असते तर… टीव्हीवरील एखादा आवडता कार्यक्रम संपल्यावर आपल्याला दुःख होते. स्वादिष्ट अन्न मिळणे बंद झाल्यास दुःख होते. हे दुःख म्हणजे खरे तर दुविधा आहे.

माणसाच्या आयुष्यात अशा कितीतरी दुविधा, संभ्रम असतात, हे आपल्याला माहीत आहेच. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीच्या लक्षात येते, की आपले केस गळत आहेत, तर तिला दुःख होते. उठताना, बसताना, बोलताना, चालताना, पळताना शरीराची मिळणारी साथ वयोमानपरत्वे कमी होत जाते, त्याचेही माणसाला दुःख होतेच. जेव्हा मुलगी लग्नानंतर सासरी जायला निघते, तेव्हा तिच्या कुटुंबातील सदस्य रडतात. कारण जवळच्या नातलगांना तिला निरोप देताना दुःखच होते.

दुःखमधील दुः म्हणजे वाईट आणि ख म्हणजे विचार. ज्या विचारांमुळे त्रास होतो किंवा वाईट वाटते त्याला दुःख; तर ज्या विचाराने आपण सुखावतो, त्याला सुख म्हणतात. याव्यतिरिक्त आणखी एक शब्द आहे… तेजुख. परंतु हा विचार (शब्द) कल्पनेपलीकडचा आहे. अशा संकल्पना जेव्हा नव्या आणि अर्थगर्भ शब्दांत प्रस्तुत केल्या जातात, तेव्हाच त्या समजतात.

आता प्रश्न हा आहे, की हे तेजुख केव्हा येते? जेव्हा दुःखही नसते आणि सुखही नसते तेव्हा काय उरते? तर फक्त ‘आहे’. म्हणजेच या प्रश्नाचे उत्तर याच वाक्यात दडलेले आहे. व्यक्तीला दुःखापासून मुक्ती हवी असते;

पण सुखापासून दूर जायची कुणाचीही इच्छा नसते. कारण सुख सगळ्यांनाच हवेहवेसे वाटते. म्हणूनच लोक सुख-दुःखापलीकडे असलेल्या तेजुख अवस्थेपर्यंत पोहोचू शकत नाहीत. त्यासाठी प्रशिक्षणाची गरज असते.

जो विचार आपल्याला विचारांपासून मुक्त करतो, तोच आपल्या उपयोगाचा आहे. अन्यथा मनुष्य नेहमी विचार आणि कल्पना यात जगत असतो. शेखचिल्लीप्रमाणे त्यातच सुख शोधत राहतो.

मनुष्याला जेव्हा याविषयी जाणीव होते, तेव्हा त्याच्या मनात विचारांपासून मुक्ती मिळवण्याची सदिच्छा जागृत होते. आपण अशा अवस्थेत पोहोचू शकतो, असा विश्वास त्याला वाटू लागतो.

माझ्याबाबतीतही असे घडू शकते का, असा विचार जेव्हा माणसाच्या मनात येतो, तेव्हा हाच विचार भविष्यात प्रार्थनास्वरूप बनतो. भगवान बुद्धांचे चरित्र अभ्यासल्यानंतर समजते, की जो विचार प्रार्थनास्वरूप बनतो, तोच चमत्कार घडवून आणतो.

या प्रार्थनेतूनच आपल्या मनात सत्यानुकूल विचार यायला सुरुवात होते. जे आपल्या चहुबाजूस सत्याच्या दिशेने वाटचाल करण्यास आपल्याला प्रेरणा मिळेल, आपण जागृत हम सत्याख्या र वातावरणनिर्मिती करतात.

बुद्धांचा मार्ग जागृतीचा आहे. जे निद्रावस्थेत राहू इच्छितात ते बुद्ध, महावीर, मीरा किंवा येशू ख्रिस्त बनू शकत नाहीत. जे जागृत होतात, त्यांना सुख-दुःखापलीकडच्या गोष्टी आवडतात. पण सुखाची ओढ आणि त्यापासून विभक्त होणे, आपल्याला नकोसे वाटते.

सुख काही काळाने निघून जाते आणि आपण सुखापासून दुरावतो; कारण निघून जाणे, हा त्याचा गुणधर्म आहे. जसे, वाहणे हा पाण्याचा गुणधर्म, स्वभाव असतो. तुम्ही जर पाण्याचा हा गुणधर्म बदलण्याचा प्रयत्न केलात, तर ते पाणी राहणारच नाही. त्याचप्रमाणे सुखही जाते आणि दुःखही जाते. अशा त-हेने जीवनात सुख-दुःख येत- जात राहतील.

पण तुम्हांला या दोहोंपासून आनंद मिळवता आला पाहिजे. त्यासाठी या दोहोंपलीकडे जाणे आवश्यक आहे. विचार दुःखदायक असतील तर त्या विचारांपासून मुक्त होण्याचा मार्गही अस्तित्वात असणार. त्या विचारांपासून मुक्त असण्याची स्थितीसुद्धा असणार. त्यासाठी गरज आहे ती, हा मार्ग शोधण्याची!

तुमचे शरीर त्यासाठी तयार असेल, तर मुक्ती मिळवण्याचे प्रयत्न शतपटीने वेगात होतील. उदाहरणार्थ, धार नसलेल्या कुऱ्हाडीने लाकूड तोडण्यासाठी माणसाला शतपटीने जास्त कष्ट करावे लागतील.

आपले मनोशरीर यंत्र असे आहे, ज्याला प्रशिक्षित केल्याशिवाय कुठलीही साधना अथवा तपश्चर्या केली तरी त्याचे इच्छित फळ मिळणार नाही. पण, जेव्हा तुम्ही सत्याविषयी ऐकता, साधना करता, मूळ मुद्दा समजून घेता, तेव्हा जणू कुऱ्हाडीच्या पात्याला धार येते. अर्थ समजून घेऊन छोटेछोटे प्रयोग करत राहिलात तर त्याचेही मोठे फळ मिळू लागते.

सुरुवातीला ध्यानाला बसल्यानंतर कधी तुम्हांला पाय हलवावेसे वाटतील, तर कधी हात हलवावेसे वाटतील. कधी खाज येत आहे असे वाटेल, तर कधी वेदना होतील. त्या वेळी तुम्हांला मनाला समजावता आले पाहिजे, की हे सगळे करायचे आहे, पण थोड्या वेळाने.

अशा रीतीने मनाला काही क्षण थांबवून तुम्ही त्याच्या सवयी तोडण्याचा सराव करू लागाल. दुःखाशी संघर्ष करू नका आणि सुखाची आस ठेवू नका, असे तुम्हांला सांगितले जाते. आता तुम्ही विचाराल, त्या दोघांचा त्याग करून काय मिळणार आहे?

खरे तर त्यातूनच तुम्हांला तेजुख मिळेल. हेच तर तुम्हांला समजून घ्यायचे आहे. तेजुख म्हणजे ‘तेज’ आणि ‘ख’चा अर्थ आहे रिक्त होणे. कारण विचारांतून मन मुक्त झाल्यानंतर जो संकल्प होईल तो मुक्तीचाच असेल. मग तुम्ही सुख आणि दुःख या दोन्हींचा त्याग करून तेजुख अवस्थेत जगायला सुरुवात कराल….

You may like this: निर्वाण अवस्थेचे ज्ञान | Knowledge of Nirvana State of Buddha

Follow our Podcast: Buddha Dhamma in Marathi

Conclusion

In conclusion, Buddha’s teachings on happiness in Marathi offer profound insights into the nature of joy and contentment.

Through his guidance, we learn that true happiness comes from within and is not dependent on external circumstances. By cultivating mindfulness, compassion, and wisdom, we can all find lasting happiness and peace in our lives.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *