Buddha Stories

18. अनाथपिंडकाचे दान | Anathpindak Donation to Buddha

Discover the story of Anathpindak’s donation to Buddha, a tale of generosity and compassion in Marathi. Learn about the profound impact of this act of giving on Buddhism and the teachings it embodies. Explore the timeless lessons of kindness and charity through this inspiring narrative.

अनाथपिंडकाचे दान | Anathpindak Donation to Buddha

अनाथपिंडकाचे दान | Anathpindak Donation to Buddha
अनाथपिंडकाचे दान | Anathpindak Donation to Buddha

अनाथपिंडक हा मुळातच खूप दानशूर होता. तो नेहमी गरिबांना भरपूर दान करत असे. याच कारणामुळे सुदत्तऐवजी अनाथपिंडक असे त्याचे नाव पडले होते. त्याच्या दारातून कुणी रिक्त हाताने माघारी गेला, असे कधीच घडले नव्हते.

एके दिवशी अनाथपिंडक काही कामानिमित्त त्याच्या बहिणीच्या सासरी गेला होता. तिथेच त्याला भगवान बुद्धांचा सहवास लाभला. बुद्धांचे प्रवचन ऐकून तो खूप प्रभावित झाला आणि बुद्धांना शरण गेला.

‘मला मानवसेवा करण्याची मनापासून इच्छा आहे’, असे सांगून त्याने भगवान बुद्धांना विचारले, ‘माझी सर्व संपत्ती, माझं घर आणि व्यापार यांचा त्याग करून आध्यात्मिक जीवनाचं सुख मिळवण्यासाठी मी बेघर होणं योग्य ठरेल काय?’

त्यावर बुद्धांनी त्याला उत्तर दिले, ‘ज्याला धनाची आसक्ती नाही, ज्याच्याजवळ धन आहे; पण जो त्याचा योग्यरीत्या उपयोग करतो, त्या प्रत्येक व्यक्तीला आध्यात्मिक सुख उपलब्ध आहे. अशी व्यक्ती संपूर्ण मानवजातीसाठी एक वरदानस्वरूप ठरते. अशा व्यक्तीचं जीवन ऐश्वर्य आणि सत्तेमुळे गुलाम बनत नाही;

परंतु जीवन, ऐश्वर्य आणि अधिकाराप्रति असलेल्या आसक्तीला आपला गुलाम बनवते. व्यक्ती कोणतंही काम करत असेल… मग ते व्यापार, नोकरीचा किंवा प्रपंचाचा त्याग करून ध्यानधारणा करत असो, तिनं हे काम मनापासून केलं पाहिजे.

एखादी व्यक्ती सतत मेहनत करून चैतन्यमयी राहत असेल, जीवनात संघर्ष करतानाही मनात ईर्षा, द्वेषभावनेला थारा नसेल, प्रापंचिक आयुष्यातही स्वार्थी वृत्तीला थारा न देता परमार्थ करत जीवन जगत असेल, तर त्या व्यक्तीचं मन आनंद, शांती आणि सुख यांनी परिपूर्ण असेल, यात शंकाच नाही.’

भगवान बुद्धांचा उपदेश ऐकून आपणही या संसारात राहूनच सत्य प्राप्त करू शकतो ही गोष्ट अनाथपिंडकाच्या लक्षात आली. त्यानंतर तो त्यांचा शिष्य बनला. त्याने मोठ्या श्रद्धेने बुद्धांना, ‘पुढील पावसाळ्यात माझ्याकडे संघासहित मुक्कामास यावं’ असे आमंत्रण दिले. बुद्धांनीही त्याचे आमंत्रण आनंदाने स्वीकारले.

आता अनाथपिंडक बुद्धांच्या निवासव्यवस्थेची तयारी करू लागला. किती तरी दिवस तो योग्य परिसर, घर, बागेच्या शोधार्थ भटकत राहिला. अखेर राजकुमार जेत यांचा बगिचा त्याला आवडला.

अनाथपिंडकाने राजकुमार जेत याच्याकडे त्या जमिनीचा खरेदीव्यवहार करण्याची इच्छा व्यक्त केली. पण राजकुमाराने ती जमीन त्याला विकण्यास स्पष्ट नकार दिला. त्यानंतर मग अनाथपिंडकाने राजकुमाराला त्या जागेची वाटेल ती किंमत देण्याचे वचन दिले.

राजकुमाराने विचार केला, ‘अनाथपिंडकाला अशी किंमत मागावी, जेणेकरून ती द्यायला तो कधीच तयार होणार नाही.’ म्हणून तो अनाथपिंडकाला म्हणाला, ‘तुम्हांला जी जमीन पाहिजे त्यावर सोन्याची नाणी पसरा, त्या नाण्यांनी जेवढी जमीन व्यापेल, तेवढी जमीन तुमची होईल.’

हे ऐकून अनाथपिंडक अतिशय आनंदित झाला. त्याने गाड्या भरभरून सुवर्णमुद्रा आणल्या. ते पाहून राजकुमार जेतला खूपच आश्चर्य वाटले. हा माणूस कुणासाठी एवढे सगळे करतो आहे, असा प्रश्न त्याला पडला. या सोन्याच्या नाण्यांनी बरीचशी जमीन व्यापून गेली, तेव्हा त्याने अनाथपिंडकाला थांबवले आणि उरलेली जमीनही त्याला देऊन टाकली.

भविष्यात अनाथपिंडकाची हीच जमीन ‘जेतवनाराम’ नावाने ओळखली जाऊ लागली. पुढे भगवान बुद्धांनी पावसाळ्यात अनेक वर्षे इथेच मुक्काम केला होता. अशा रीतीने अनाथपिंडकाच्या उदारपणामुळे हजारो साधकांना तिथे सत्यप्राप्ती करता आली. 

You may like this: गौतमाची बोधयात्रा | Gautama’s Pilgrimage

Follow our Podcast: Buddha Dhamma in Marathi

Conclusion

In conclusion, Anathpindak’s donation to Buddha exemplifies the transformative power of generosity and compassion.

His act of giving not only provided material support but also symbolized a deep commitment to the teachings of Buddha.

Through this story, we are reminded of the importance of selflessness and charity in our lives, and how even a small act of kindness can have a profound impact on others.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *