Buddha Dhamma in Marathi

बौद्ध धम्म जिज्ञासा | Curiosity About Buddhism In Marathi

Embark on a soulful expedition into the profound teachings and practices of Buddhism in our latest blog post, “Curiosity About Buddhism (बौद्ध धम्म जिज्ञासा).” Dive deep into the rich tapestry of this ancient philosophy as we unravel its core principles, delve into its history, and explore its transformative impact on individuals and societies worldwide.

बौद्ध धम्म जिज्ञासा : भाग – १

बौद्ध धम्म जिज्ञासा : Part 1
बौद्ध धम्म जिज्ञासा : Part 1

प्रश्न १ : बुद्ध म्हणजे काय?

उत्तर : बुद्ध म्हणजे ज्याला सम्यक् संबोधीची प्राप्ती झालेली आहे असा. सम्यक संबुद्ध किंवा ज्याला परिपूर्ण ज्ञान प्राप्त झाले आहे असा. पाली भाषेत याला “सब्ब” म्हणजे सर्वज्ञ (अमर्याद ज्ञानी) म्हटलेले आहे. बुद्ध हे व्यक्तिचे नाव नव्हे. ते मनाच्या स्थितीचे किंवा अवस्थेचे नाव आहे. मनाची अशी अवस्था की, जी मानसिक विकासाच्या अत्युच्च शिखरावर पोहोचलेली आहे बोधीसत्त्व म्हणजे बुद्ध होण्याचा प्रयत्न करणारा मनुष्य. ज्ञान प्राप्तीपूर्वी गौतम केवळ बोधिसत्त्व होता.

बोधिसत्त्व आपल्या जीवनाच्या अवस्थेत क्रमाक्रमाने प्रगती करीत. दहा पारमितांचा परिपूर्ण अभ्यास करीत. सम्यक् संबुद्ध होतो. पहिल्या अवस्थेत ‘मुदिता’ (आनंद), दुसऱ्या अवस्थेत ‘विमलता’ (शुद्धता), येणेप्रमाणे ‘प्रभाकारी’ (तेजस्विता), ‘अर्चिष्मती’ (अग्नी प्रमाणे तेजस्वी बुद्धिमत्ता), ‘सुदूर्जया’ (जिंकण्यास कठीण), ‘अभिमुखी’ (पदार्थांची उत्क्रांती व तिच्या कारणांची बारा निदाने जाणणे.), ‘दरजमा’ (दर जाणे), ‘अचल’ (अढळ), ‘साधुमती’ (धर्माच्या सर्व दिशा जाणणे.) आणि दहाव्या अवस्थेत तो ‘धर्म मेध’ होतो व त्याला बुद्धाची दिव्य दृष्टी प्राप्त होते.

प्रश्न २ : भगवान बुद्ध कोण होते?



उत्तर : भगवान बुद्धांचे बालपणीचे नाव सिद्धार्थ होते. माता, पित्यांची अपत्य प्राप्तीची इच्छा पूर्ण झाल्यामुळे त्यांनी मुलाचे नांव सिद्धार्थ असे ठेवले. जन्मानंतर पाचव्या दिवशी नामग्रहण संस्कार झाला. सिद्धार्थ हे राजवंशीय नाव असून त्यांचे गोत्र गौतम किंवा ‘गोतम’ असे होते. ते सूर्यवंशी घराण्यातील प्रसिद्ध ईश्वाकू कुळातील असून कपिलवस्तू नगरीचे राजकुमार होते. त्यांच्या पित्याचे नाव राजा शुद्धोदन व मातेचे नाव राणी मायादेवी असे होते. मायादेवीला महामाया असेही म्हणत. राजा शुद्धोदन शाक्य वंशीय प्रजेवर राज्य करीत होता.

‘शाक्य’ हे क्षत्रिय वर्णाचे आर्य होते. शुद्धोदन म्हणजे धुतलेले तांदूळ, त्यांना बऱ्याच वर्षांपासून मूल बाळ नव्हते एके दिवशी मायादेवीला असे स्वप्न पडले की, तिला सुवर्णाच्या पालखीत बसवून चारही दिशारक्षक हिमालयातील अनोतवदह सरोवरावर घेऊन गेले व सुमेध नावाचे बोधिसत्त्व पांढऱ्या शुभ्र हत्तीच्या रूपाने तेथे प्रकट झाला.

त्याने तिला तीन प्रदक्षिणा घातल्या व तिच्या उजव्या कुशीतून गर्भात दाखल झाला. यालाच ‘बोधिसत्त्वाचा बीजांकुर’ म्हणतात. महामायेस जाग आली व तिने राजाला स्वप्नाबद्दल सांगितले. दुसऱ्या दिवशी आठ ब्राह्मणांना भविष्य वर्तविण्यास राजाने बोलाविले त्यांची नावे अशी : ‘राम, ध्वज, मंत्री, लक्ष्मण, सुयाम, सुदत्त, भोज आणि यज्ञ” त्यांनी सांगितले की – तुम्हाला एक पुत्र होईल. जो चक्रवर्ती राजा होईल किंवा बुद्ध होऊन जगावर धर्म राज्य करेल.

प्रश्न ३ : कपिलवस्तु नगर कोठे वसलेले होते?

उत्तर : भारत देशात वाराणसीच्या उत्तरेला १०० मैलांवर आणि हिमालय पर्वताच्या पायथ्यापासून सुमारे ४० मैलांवर रोहिणी नदीच्या काठावर वसलेले होते. सध्या तिला कोहना नदी म्हणतात. हे ठिकाण सुहरतगढ़ स्टेशनापासून उत्तरेस १२ मैलांवर नेपाळ राज्यातील तौलिहवा बाजाराजवळ असून त्याचे सध्याचे नाव तिलौराकोट असे आहे.

प्रश्न ४ : राजकुमार सिद्धार्थाचा जन्म कधी व कोठे झाला?

उत्तर : राजकुमार सिद्धार्थाचा जन्म वैशाखी पौर्णिमेला इ. स. पूर्व ५६३ साली झाला. जन्माचे निश्चित स्थळ पूर्णतः सिद्ध झालेले आहे. भारत सरकारच्या पुराण वस्तू संशोधन खात्याने नेपाळ तराईच्या अरण्यात हे निश्चित स्थळ दाखविण्यासाठी सम्राट अशोकाने जो दगडी स्तंभ उभारलेला होता. त्याला शोधून काढलेले आहे. त्या काळी या अरण्याला ‘लुम्बिनी वन’ असे म्हणत.

प्रश्न ५ : सिद्धार्थाच्या जन्मानंतर ऋषी असिताने काय भविष्य वर्तवले? व त्याचा शुद्धोदनावर काय परिणाम झाला?

उत्तर : सिद्धार्थाच्या जन्मानंतर ऋषी असिताने असे भविष्य वर्तवले की – एके दिवशी सिद्धार्थ आपल्या राज्याचा त्याग करून सन्यास दीक्षा घेऊन ‘बुद्ध’ होईल. पिता शुद्धोदन आपल्या राज्याच्या वारसाला मुकण्यास तयार नव्हता, म्हणून त्याने मानवी दुःखे व मृत्यू यांची राजकुमारास कल्पना येईल. अशी कोणतीही दृश्ये त्याच्या पाहण्यात येऊ नयेत, ह्याबद्दल दक्षता बाळगली होती. राजकुमार जवळ ह्या गोष्टी बोलण्याची देखील कोणाला ही परवानगी नव्हती.

तो आपल्या विलासयुक्त सुसज्जित महालात आणि सुगंधी फुलांच्या मनोहर बागेत प्रायः जणु काही एखाद्या बंदिवानासारखा राहत असे. त्याच्या महालासभोवती उंच परकोट होते. आणि महालाच्या आतील भागात प्रत्येक गोष्ट जेवढी सुशोभित करता येईल तेवढी सुसज्जित केलेली होती जेणेकरून त्याला बाहेर जाण्याची व जगातील दुःख आणि विपत्ती पाहण्याची इच्छाच होऊ नये, अशी परंपरागत कथा आहे.

बौद्ध धम्म जिज्ञासा : भाग – २

प्रश्न ६ : बालक सिद्धार्थ विषयी काही अद्भुत गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्या खऱ्या आहेत काय?

उत्तर : बालक सिद्धार्थ विषयी ज्या अदभूत गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्यांच्या विषयी असे म्हणता येईल की, बौद्धांच्या इतिहासात महायानाच्या प्रभावाने एक काळ असा आला की, भगवान बुद्धांचा केवळ धम्मच लोकोत्तर मानला जात नव्हता. तर त्यांचे शरीर ही लोकोत्तर मानले जाऊ लागले.

प्रश्न ७ : सिद्धार्थाचे लालन – पालन कोणी केले?

उत्तर : सिद्धार्थाची आई राणी महामाया अचानक आजारी पडली व बालक केवळ सात दिवसांचा असतानाच तिचे निधन झाले. त्यानंतर त्याची मावशी महाप्रजापती गौतमी हिनेच त्याचे फार प्रेमाने लालन पालन केले. ती त्याची सावत्र आई देखील होती. सिद्धार्थास विमातेपासून नंद नावाचा लहान भाऊ-ही होता.

प्रश्न ८ : राजकुमार सिद्धार्थाला कशा प्रकारची सौख्ये उपलब्ध होती?

उत्तर : राजा शुद्धोदनाने आपल्या पुत्राकरिता सर्व सुख सोयींनी परिपूर्ण हिवाळ्याकरिता, उन्हाळ्याकरिता व पावसाळ्याकरिता प्रत्येकी एक असे तीन महाल बांधले होते. एक नऊ मजली, दुसरा पाच मजली व तिसरा तीन मजली, असे तीन ही महाल सुंदर सजविलेले होते.

प्रत्येक महालाभोवती अत्यंत रमणीय बाग असून त्यांत सुंदर फुले होती. पाण्याच्या कारंजांनी बागेला शोभा आलेली होती. वृक्षावर बसलेल्या गाणाऱ्या पक्षांचा सुंदर कलरव ऐकू येत असे आणि जमिनीवर मयूर पक्षी आपला पिसारा उभारून नयन मनोहर नृत्य करीत असत. अनेक लावण्यवती नृत्यांगना आणि गायिका त्याचे मनोरंजन करावयास सतत तत्पर असत. अनेक दासदासी त्याची सेवा करावयास हजर असत.

प्रश्न ९ : विलासी वातावरणात देखील राजकुमार सिद्धार्थास सात्त्विक शहाणपणा कसा प्राप्त झाला?

उत्तर : सिद्धार्थ जात्याच अतिशय तल्लख बुद्धीचा होता. लहानपणापासूनच कसल्या ही प्रकारची शिल्प कला किंवा विद्या विशेष अभ्यास न करताच तो हस्तगत करीत असे. त्याला शिकवायला उत्तम शिक्षक होते. गूढ विषयाचेही त्याला त्वरित आकलन होत असे. त्यामुळे त्याला सात्त्विक शहाणपणा प्राप्त झाला.

प्रश्न १० : सिद्धार्थाने कोण कोणत्या प्रकारचे शिक्षण घेतले?

उत्तर : सिद्धार्थ आठ वर्षांचा झाल्यावर त्याचे विधिवत शिक्षण सुरू झाले. त्याचे प्रथम शिक्षक तेच आठ ब्राह्मण होते ज्यांनी त्याच्या विषयी बालपणी भविष्यवाणी केलेली होती. त्याचे द्वितीय गुरू उद्दिच देशातील सञ्चमित्त नांवाचे विद्वान आचार्य होते. ते उत्कृष्ट व्याकरणाचार्य आणि वेद, वेदांग, वैय्याकरण आणि उपनिषद यांचे प्रकांड विद्वान होते. त्यांनी सिद्धार्थास दर्शनशास्त्रात पूर्णतः पारंगत केले. त्यानंतर आलार कालामाचा शिष्य भारद्वाज याने चित्तास एकाग्र करावयाची व समाधीस्थ राहावयाची विद्या शिकविली.

बौद्ध धम्म जिज्ञासा : भाग – ३

प्रश्न ११ : सिद्धार्थ गौतमाने वेद आणि वैदिक ऋषींच्या शास्त्रांचे अध्ययन केले होते काय?

उत्तर : होय. सिद्धार्थने वेदांचे आणि दहा वैदिक ऋषिच्या शास्त्रांचे अध्ययन केले होते सिद्धार्थने वेद, वेदांग, उपनिषद यांचे अध्ययन सम्बमित्त आणि उदिच्च या विद्वानांच्या हाताखाली केले. परंतु यांच्या मध्ये मानवाच्या नैतिक उत्थानाला सहायक होईल. असे त्याला काहीच आढळले नाही.

त्याच्या दृष्टीने वेद वाळूच्या भिंतीप्रमाणे निरूपयोगी असून त्यात ग्रहण करण्यासारखे त्यास काहीच आढळले नाही. तसेच सिद्धार्थला त्या काळच्या मोठ मोठ्या दर्शन शास्त्रांत ही तात्विक दृष्ट्या महत्त्वाचे काही सुद्धा दिसले नाही. त्यावतीने सत्य शोधायची तळमळ होती. त्याबद्दल सिद्धार्थास शंका नव्हती, परंतु ते अंधकारात चाचपडत सत्याचा शोध घेत होते व ते त्यांना प्राप्त झालेले नव्हते.

प्रश्न १२ : त्या काळातील यज्ञयागांतील पशुबली विषयी सिद्धार्थाचे काय मत होते?

उत्तर : यज्ञ विरोधी लोक पशुबली विषयी ब्राह्मणांचा उपहास करीत. यज्ञयागांतील पशुबली सर्वथ निरर्थक असल्याचे ज्यांचे मत होते. त्यांच्याशी सिद्धार्थ सहमत होता.

प्रश्न १३ : देवदत्ताशी शत्रुत्व व्हावयास कोणता करुणामय प्रसंग कारणीभूत झाला?

उत्तर : एकदा सिद्धार्थ आपल्या शेतावरील एका झाडाखाली विश्राम करीत असताना एका एकी एक पक्षी आकाशातून त्याच्या पायाजवळ येऊन पडला. बाणाने जखमी झाल्यास तो वेदनेने तडफडत होता. त्याने त्याच्या शरीरातील बाण काढला. न्यास पाणी पाजले. ऊब मिळावी म्हणून त्यास कुशीत घेऊन बसला. तेवढ्यातच त्याचा आतेभाऊ देवदत्त तेथे आला व आपल्या शिकारी विषयी चौकशी करू लागला, सिद्धार्थाने त्यास स्वस्थ होत असलेला पक्षी दाखविला. परंतु त्यास परत करण्यास साफ नकार दिला.

सिद्धार्थ म्हणाला – “मारणाऱ्या पेक्षा वाचविणारा श्रेष्ठ होय. म्हणून हा पक्षी माझा आहे.” पुढे हे प्रकरण राज दरबारात गेले. तेथे ही सिद्धार्थाचे म्हणणेच मान्य करण्यात आले. तेव्हापासून देवदत्ताने सिद्धार्थाशी शहत्व सरू केले.

प्रश्न १४ : सिद्धार्थाचा विवाह कधी व कशा प्रकारे संपन्न झाला?

उत्तर : पूर्वीच्या क्षत्रिय लोकांच्या रीती रिवाजानुसार स्वयंवरासाठी विविध प्रकारचे खेळ, शिल्प कला व शस्त्र विद्या ह्याच्या स्पर्धा आयोजित केल्या जात असत. सिद्धार्थ त्या काळच्या सर्वच विद्या हस्तगत केलेल्या होत्या. त्यामुळे सर्व प्रतिस्पर्ध्याना जिंकत त्याने यशोधरेचे स्वयंवर जिंकले व तिचे पाणिग्रहण केले. त्यावेळी सिद्धार्थाचे वय १६ वर्ष व यशोधरेचे १५ वर्षांचे होते. तिच्या पित्याचे नाव दण्डपाणी असून तो देखील शाक्य वंशाचाच होता, सौंदर्य आणि शील याविषयी यशोधरेची फार प्रसिद्धी होती.

प्रश्न १५ : तारुण्याचे दिवस सिद्धार्थाने कसे व्यतीत केले?

उत्तर : शुद्धोदन राजाच्या आज्ञेनुसार राज पुरोहित उदायी याने निटासाठी सर्व सोयी उपलब्ध केल्या. पित्याच्या योजनेनुसार सिद्धार्थाने तारुण्याचे दिवस भोग विलासात केले. तथापि त्याने आपल्या कर्तव्याकडे दुर्लक्ष केले नाही. बीस वर्षांचा असतानाच शाक्य संघाचा सदस्य झाला व संघाचे प्रत्येक कार्य अत्यंत दक्षतेने करु लागला. शाक्य संघाच्या सभांचे आयोजन होत असे.

बौद्ध धम्म जिज्ञासा : भाग – ४

प्रश्न १६ : सिद्धार्थाच्या मुलाचे नाव काय होते?

उत्तर : वयाच्या एकोणतिसाव्या वर्षी त्यास पुत्ररत्न झाले. त्याचे नांव राहुल ठेवण्यात आले. कारण सिद्धार्थास असे वाटते की – जणू काही संसारात गुंतविण्यास य मुक्तीच्या मार्गात अडथळे निर्माण करण्यास तो राहू (राहु ग्रह) उत्पन्न झाला आहे.

प्रश्न १७ : गृहत्याग करून अरण्यात जावयास (महाभिनिष्क्रमणास) परंपरागत कथेनुसार कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरल्या?

उत्तर : परंपरागत कथेनुसार गृह त्यागाचा प्रसंग ‘बुद्ध चरित’ काम्यादी ग्रंथातून चमत्कारिक रीतीने वर्णिता आहे. सिद्धार्थ अत्यंत भोग विलासांत राहत होता. त्याला तीन ऋतूकरिता तीन राजवाडे बांधून देण्यात आले होते. दासदासी आणि नृत्यांगना सदैव सेवेत हजर असत. त्याला कसलीही दुखदायक दृश्ये दिसू नयेत. याची खबरदारी घेतली जात होती. त्याला म्हातारपण, आजारपण आणि मृत्यू या अत्यंत सामान्य दुखद गोष्टींचे ही दर्शन झालेले नव्हते. पुढे अकस्मात त्याला मुक्तपणे फिरावयाची इच्छा झाली.

तेव्हा चार निरनिराळ्या प्रसंगी सिद्धार्थ आपल्या महालातून निघून रथावर बसून जात असताना त्यास मनुष्याची चार वेगवेगळी रूपे दिसलीत. ती अशी :-

प्रथम गलितगात्र झालेला म्हातारा मनुष्य दिसला. मग रोगाने जर्जर झालेला आजारी मनुष्य, त्यानंतर एक मृत व्यक्ती आणि शेवटी एक तेजस्वी परिवाजक दिसला. त्याचा सारथी छन्न यानेही ही दृश्ये पाहिलीत आणि ती दृश्ये प्रत्येकाच्या जीवनाशी निगडित असतात, असे सिद्धार्थास समजावून सांगितले.

येणेप्रमाणे जीवनातील दुःखाचे दर्शन पडल्याने सिद्धार्थास वैराग्य प्राप्त झाले. संन्यास दीक्षा हाच खरा दुख मुक्तीचा मार्ग आहे, असे वाटून त्याने गृहत्याग केला. (तथापि सिद्धार्थ सर्व विद्यांमध्ये पारंगत होऊन २९ वर्षे वयाचा होईपर्यंत त्यास कोणत्याही रोग्याचे, वृद्धाचे व प्रेताचे दर्शन घडले नाही, ही पारंपरिक गोष्ट बुद्धि संगत आणि तर्क संगत वाटत नाही.)

प्रश्न १८ : परंपरागत कथेनुसार सिद्धार्थाने महाल कसा सोडला?

उत्तर : एके रात्री सर्वजण गाढ झोपले असताना सिद्धार्थ उठला. आपल्या निद्रिस्त पत्नीला व तान्या बाळाला शेवटचे पाहून घेतले. आपला सारथी छन्न याला बोलाविले, आपला पांढरा शुभ्र आवडता घोडा कंथक यावर आरूढ होऊन महालाच्या द्वाराजवळ पोहोचला.

महाद्वाराशी पहारा देत असलेल्या राजाच्या सेवकांना देवांनी गाढ झोप आणली. त्यामुळे ते घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकू शकले नाहीत, महाद्वाराचे कुतूप आपोआप उपडण्यास देवच कारणीभूत झाले आणि राजकुमार अंधारात दूर निघून गेला व नंतर त्याने दुख मुक्तीचा मार्ग शोधावयास प्रव्रज्या ग्रहण केली.

प्रश्न १९ : राजकुमार सिद्धार्थाच्या महाभिनिष्क्रमणाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेले कारण कोणते?

उत्तर : डॉ. भीमराव आंबेडकरांनी आपल्या ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या पुस्तकात ज्या कारणांचा उल्लेख केला आहे, ते अधिक योग्य व संयुक्तिक वाटते. ते कारण असे सिद्धार्थ राजकुमाराचे राज्य म्हणजेच शाक्यांचे राज्य व शेजारी असलेले कोलियांचे राज्य यांच्यात रोहिणी नदीच्या पाण्याबाबत वाद निर्माण झाला.

हा प्रश्न बाटापाटीने सोडवावा असे. सिद्धार्थचे मत होते. तथापि शाक्य संपाचे बहूमत युद्ध करावे म्हणजे संघर्ष करावा असेच होते. संघाचे म्हणणे सिद्धार्थास मान्य नसल्यामुळे त्याला संप सोडावा. आपले राज्य सोडून जावे लागले व तसे करताना जगातील संघर्षाच्या व दुःखाच्या कारणाचे मूळ शोधून काढावयास त्याने संन्यास दीक्षा ग्रहण केली.

प्रश्न २० : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सिद्धार्थाच्या गृह त्यागाच्या घटनेचे वर्णन आपल्या पुस्तकात केले. त्याचा उद्देख बौद्ध साहित्यात कोठे व कशा प्रकारे केलेला आहे?

उत्तर : ही गृह त्यागाची घटना मझिम निकायांतील अविरपरियेसन सुत्रात भगवंतानी येणे प्रमाणे कथन केलेली आहे. :-

भिक्खूनो,

मी सुद्धा संबोधी ज्ञान होण्यापूर्वी बोधिसत्त्वावस्थेत, स्वत जन्मपी असताना जन्माच्या फेन्यात सापडलेल्या वस्तूंच्या (पुर, दाग, दासी, दास इत्यादिकांच्या) मागे लागलो होतो. म्हणजे माझे सुख त्यांवर अशा दूर आहे, असे मला वाटते. या जराधर्मी असतांना, व्याधी धर्मी असतांना मरण धर्मी असताना, शोक धर्मी असताना, जरा, व्याधी, मरण, शोक यांच्या फेन्यांत पडलेल्या वस्तूंच्याच मागे लागलो होतो. तेव्हा माझ्या मनात असा विचार आला की – हे ठीक नव्हे. मी या जन्म, जरा ठिकाणी होणारी हानी पाहून अज्ञान, नजर, अव्याधी, अमर, आणि अशोक असे जे परमश्रेष्ठ निर्वाण पद त्यांचा शोध करावा. हे योग्य आहे.

भिक्खूनो,

असा विचार करीत असता काही काळाने जी मी त्यावेळी होतो, माझा एकही केस पिकला नव्हता, भर जवानीत होतो आणि माझे आई, वडील परवानगी देत नव्हते. डोळ्यांतून निघणाऱ्या अनुप्रवाहाने त्यांची मुखे भिजली होती, ते सारखे रडत होते. तरीही मी (या सगळ्यांची परवा न करता) शिरोमुंडन करून काषाय वस्त्रांनी देह आच्छादून घरातून बाहेर पडलो. (मी संन्यासी झालो.)

बौद्ध धम्म जिज्ञासा : भाग – ५

प्रश्न २१ : सिद्धार्थ प्रवजित झाला त्या प्रसंगाचे वर्णन करा.

उत्तर : भारद्वाज मुनीचे आश्रम कपिलवस्तू मध्येच होते. तेथे जण प्रव्रजित सिद्धार्थने ठरविले. आपल्या कंधक नावाच्या घोड्यावर स्वार होऊन सारथी छन्न याला सोबत घेऊन तो तेथे पोहोचला. महानाम नावाच्या चुलत भावाने त्याच्यासाठी भिक्खूचे कपडे व भिक्षापात्र आणले. त्याचे माता, पिता देखील तेथे उपस्थित होते. ते फारच शोकाकुल होते. सर्वांच्या समक्ष त्याचे मुंडन झाल्यावर त्याने परीव्रज्या घेतली. त्यानंतर अनोमा नदी ओलांडून ओलांडून तो कपिलवस्तू सोडून निघून गेला.

प्रश्न २२ : गृह त्याग करताना सिद्धार्थाने कोणत्या गोष्टींचा त्याग केला?

उत्तर : आपले सुंदर व सुशोभित महाल, अगणित संपत्ती विलास, सुखचैन, मऊ बिछाने, सुंदर राजसी पोशाख, सुग्रास अन्न, माता, पिता आणि आपले राज्य या सर्वांचा सिद्धार्थाने त्याग केला. एक्देच नव्हे तर आपली प्रिय पत्नी यशोधरा आणि एकुलता एक पुत्र राहुल यांचा ही त्याग केला.

प्रश्न २३ : बहुजनांच्या सुखाकरिता व मानवाचे दुख दूर करण्याच्या उद्देशाने अन्याहतपणे एवढा स्वार्थ त्याग केल्याचे दुसरे उदाहरण आहे काय?

उत्तर : एकही नाही, म्हणूनच बौद्धजन त्यांच्यावर एवढे प्रेम करतात व त्यांचा आदर्श समोर ठेवतात, जगाला सुखी करण्याकरिता आणि दुखापासून सुटकेचा मार्ग संपूर्ण मनुष्यमात्राला दाखविण्याकरिता (स्वतः सम्बद्ध होईपर्यंत) त्यांनी देह दंडनाद्वारे कठीण तपश्चर्या केली आणि त्यानंतर मनन आणि चिंतन करून सत्याचा मार्ग शोधून काढला.

प्रश्न २४ : अरण्यामध्ये जाऊन दुःखाचे मूळ शोधून काढण्याची अपेक्षा त्यांनी का केली?

उत्तर : मनुष्याच्या प्रवृत्तीचे मूळ कारण व दुःखाचे मूळ कारण शोधून काढावयास कराव्या लागणाऱ्या चिंतनामध्ये कसला ही प्रतिबंध येऊ नये. यासाठी ते अरण्यात गेले.

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *