Buddha, also known as Siddhartha Gautama, was a spiritual leader and the founder of Buddhism. Born in approximately the 6th century BCE in Lumbini (modern-day Nepal), his life story forms the basis of Buddhist teachings.
थोडक्यात बुद्धांची ओळख | गौतम बुद्ध कोण होते?
प्राचीन काळी आपल्या देशात अनेक लहान-मोठी राज्ये होती. या राज्यांवर विविध गणांचे लोक राज्य करायचे. त्यापैकी कपिलवस्तू, येथील राजा शुद्धोदन हे शाक्य गणाचे प्रमुख होते. गोतम हे त्यांच्या घराण्याचे नाव, अगदी आजच्या आपल्या आडनावासारखं. राजा शुद्धोदन यांना महामायादेवी आणि महाप्रजापती अशा दोन पत्नी होत्या.
त्यापैकी महामायादेवी यांच्या पोटी इ.स.पू. ५६३ साली एका गोंडस मुलाचा जन्म झाला. मुलाचं नाव ठेवलं गेलं ‘सिद्धार्थ’ सिद्धार्थच्या जन्मानंतर फक्त सात दिवसांनी त्याची आई महामायादेवी यांचं निधन झालं. आईचं छत्र हरवलेल्या सिद्धार्थचे पालनपोषण महाप्रजापती यांनी अतिशय मायेनं केले.
हळूहळू सिद्धार्थ मोठा व्हायला लागला. राजकुमार सिद्धार्थ गोतम याच्या शिक्षणाची अतिशय उत्तम व्यवस्था वडील शुद्धोदन यांनी केली. लहानपणापासून सिद्धार्थचा स्वभाव अतिशय हळवा आणि संवेदनशील होता. कुणाचंही दुःख बघून तो अतिशय व्याकूळ व्हायचा. इतर राजकुमारांप्रमाणे तलवारबाजी, शिकार आणि लढाई यात न रमता सिद्धार्थने वेगळ्या वाटेवर चालणं पसंत केलं.
त्याच्या बालमनाला अनेक प्रश्न पडायचे. आपल्या मनातील विविध प्रश्न विचारून तो अनेकांना कोड्यात टाकायचा. लहानपणापासूनच त्याला ध्यान करायची खूप आवड. वडील शुद्धोदन शेतात नांगरणीचा उत्सव (हलोत्सव) साजरा करत असताना त्याने शेतातच पहिल्यांदा ध्यान केलं. राजकुमार सिद्धार्थ हा इतर राजकुमारांपेक्षा खूपच वेगळा होता.
वयाच्या १६ व्या वर्षी यशोधरा नावाच्या एका गुणवान मुलीशी त्यांचं लग्न लावण्यात आलं. वाढत्या वयाबरोबर सिद्धार्थला पडणारे प्रश्न त्याला अधिकच अस्वस्थ करायला लागले. त्याचे ध्यान आता त्याला वेगळ्या वाटेवर घेऊन जाईल की काय, अशी भीती सगळ्यांना वाटत होती. माणूस दुःखी का आहे? त्याला दुःखातून मुक्त होता येईल का? त्यासाठी त्याने काय केलं पाहिजे? असे अनेक प्रश्न त्याच्या डोक्यात गोंधळ घालत होते.
पुढे वयाच्या २९ व्या वर्षी आपल्या मनातील प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी सिद्धार्थ घराचा आणि सगळ्या राजवैभवाचा त्याग करून बाहेर पडला. मोकळ्या आकाशाखाली, मुक्त वातावरणात तो खूप खूप भटकला. फिरता-फिरता त्याने विविध प्रकारचे अनुभव घेतले. स्वतःवर अनेक प्रयोग केले. अनेकदा ध्यान केले. आपल्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी अक्षरशः प्रयत्नांची पराकाष्ठा केली.
अखेर त्याच्या प्रयत्नांना यश आले. वयाच्या ३५ व्या वर्षी वैशाखी पौर्णिमेला पिंपळाच्या झाडाखाली बसून असलेल्या सिद्धार्थला आपल्या मनातील प्रश्नांची उत्तरे सापडली. यालाच ‘बोधिप्राप्ती’ असे म्हणतात. बोधिप्राप्त झालेले युवराज सिद्धार्थ आता बुद्ध म्हणून ओळखले जाऊ लागले. सत्यापर्यंत पोहचलेल्या बुद्धांना लोक ‘तथागत बुद्ध’ म्हणून ओळखू लागले. अशाप्रकारे सिद्धार्थ गोतम नावाचा एक सर्वसामान्य माणूस आपल्या प्रयत्नांमुळे, स्वतःच्या कष्टांमुळे जगातील सर्वात ज्ञानी पुरुष तथागत बुद्ध बनले.
पुढे आपल्याला मिळालेले ज्ञान इतरांना देऊन, त्यांना दुःखमुक्त करण्यासाठी ते सतत ४५ वर्षे प्रवास करीत राहिले, पायी चालत राहिले. यालाच ‘चारिका’ असे म्हणतात. ते गावोगाव फिरायचे. तेथील लोकांशी चर्चा करायचे. लोकांना दुःखातून मुक्त होण्यासाठी मार्गदर्शन करायचे.
माणूस आपल्या वागणुकीत योग्य बदल करून जीवनातील अनेक प्रश्न सहजपणे सोडवू शकतो, असा त्यांचा ठाम विश्वास होता.
त्यांच्या उपदेशाचे पालन करणारे आणि विशिष्ट संस्कार झालेले त्यांचे शिष्य ‘भिक्खू’ म्हणून ओळखले जायचे. भिक्खूंच्या समूहाला ‘संघ’ म्हटले जायचे. बुद्धांचा उपदेश, त्यांची शिकवण ही ‘धम्म’ म्हणून ओळखली जाऊ लागली.
चारिका करत ४५ वर्षे गावोगाव फिरणाऱ्या बुद्धांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागले. अनेक लोकांनी त्यांच्यावर टीका केली, त्रास दिला. एकदा तर अंगुलिमाल नावाच्या एका क्रूर दरोडेखोराशी त्यांची गाठ पडली. पण कशालाही न घाबरता बुद्ध आपले काम करतच राहिले.
अखेर वयाच्या ८० व्या वर्षी इ.स.पू. ४८३ ला कुशीनगर येथे त्यांनी शेवटचा श्वास घेतला. आपल्या प्रयत्नांनी बुद्ध बनलेल्या या महामानवाने अवघ्या जगावर आपली छाप पाडली.
Here’s a concise overview of Buddha:
- Early Life: Siddhartha was born into a royal family and led a life of luxury. However, he encountered the realities of suffering, old age, and death, prompting him to seek answers beyond material wealth.
- The Great Renunciation: At the age of 29, Siddhartha renounced his princely life in pursuit of spiritual awakening. He embarked on a journey of self-discovery, seeking enlightenment and the end of suffering.
- Enlightenment: After years of meditation and intense spiritual practice, Siddhartha attained enlightenment, sitting under the Bodhi tree in Bodh Gaya, India. This moment marked his awakening to profound truths about life and suffering, leading to his designation as the “Buddha” or “Enlightened One.”
- Teaching: Following his enlightenment, Buddha began sharing his insights, teachings, and the Four Noble Truths – the essence of his wisdom. These truths revolve around the existence of suffering, its cause, its cessation, and the path leading to its end (the Eightfold Path).
- Spread of Buddhism: Buddha’s teachings gained popularity across ancient India and beyond. He established a monastic order and accepted followers from various backgrounds, emphasizing compassion, mindfulness, and the pursuit of enlightenment.
- Parinirvana: At the age of 80, Buddha passed away in Kushinagar, attaining Parinirvana, which is the final passing into complete Nirvana, the state beyond suffering.
Conclusion
Buddha’s teachings laid the foundation for Buddhism, focusing on the importance of understanding and addressing the nature of suffering and finding a path to enlightenment and inner peace.
His teachings, preserved in the form of discourses called sutras, continue to influence millions worldwide, guiding individuals on their quest for spiritual fulfillment and liberation from suffering.
You may like this: Blind Man And The Elephant Buddha Story in Marathi
Listen to our podcast: Buddha Dhamma in Marathi
3 Comments