Discover the profound teachings of Buddha on good friendship in this insightful Marathi blog post. Learn how fostering true friendships can lead to a more fulfilling and harmonious life.
मंगल मैत्री | Buddha on Good friendship In Marathi
भगवान बुद्धांच्या काळात एखाद्या घराजवळ भिक्षु गेला तर दरवाजा उघडेपर्यंत तो भिक्षु मंगल मैत्री करत असे. म्हणजे त्या घरातील कुटुंबाच्या सदस्यांसाठी तो प्रार्थना करत असे.
‘या घरातील सर्व व्यक्तींचं मंगल होवो, भलं होवो, सर्वांवर परमेश्वराच्या कृपेचा वर्षाव होवो’ अशी प्रार्थना तो करत असे. बुद्धांच्या कार्याची महती ज्यांना ठाऊक होती, त्यांना आपल्या दारात त्यांचा भिक्षु आल्याचा मनस्वी आनंद होत असे.
परंतु काही लोक बुद्ध व त्यांच्या कार्याविषयी अनभिज्ञ होते. त्यांना हे भिक्षू पाहून संताप येत असे. त्यांना वाटत असे, की संसारसुखांना त्यागून सत्यशोधासाठी निघालेले हे भिक्षु खरे तर वेडेच आहेत. हे लोक भिक्षूना पाहून शिवीगाळ करायला सुरुवात करत.
ते पाहून भिक्षू भिक्षेविना परतत असे. याचाच अर्थ, जो आपल्यासाठी मंगल मैत्रीची प्रार्थना करत आहे, त्यालाच ते दारातून हाकलून लावत. तसं पाहिलं तर आपल्या जीवनात आपल्याविषयी मंगल कामना करणाऱ्या, प्रार्थना करणाऱ्या, करुणा भाकणाऱ्या व्यक्ती जास्तीत जास्त असल्या पाहिजेत.
दोस्त शब्दात ‘दो’चा अर्थ आहे दोन लोकांचा संघ आणि ‘स्त’चा अर्थ आहे, सत्य. दोन व्यक्ती जेव्हा एकत्रितपणे सत्याच्या मार्गावर चालतात, तेव्हा त्यांना दोस्त म्हटले जाते. खरा दोस्त आपल्या मित्राला चुकीचे काम करण्यापासून रोखतो.
त्याला त्याचे अवगुण सांगतो. सत्यमार्गावर चालण्यासाठी मदत करतो, निमित्त बनतो. आपल्या मित्रांपैकी एक व्यक्ती जरी योग्य नव्या विचारांची, विशालहृदयी असेल, तर तिच्या विचारांचा लाभ आपल्यालाही होतो. असा माणूस जेव्हा संघाच्या नवनिर्माणाविषयी बोलू लागतो, तेव्हा अन्य लोकांत यासंदर्भात लगेच विचारमंथन सुरू होते.
‘संघम् शरणम् गच्छामि’ हे शब्द गौतम बुद्धांच्या माध्यमातून अनेक शतके आधी आले होते. कारण संघात कुणाच्या ना कुणाच्या तरी चेतनेचा स्तर उच्च असतोच.
ज्याच्या चेतनेचा स्तर उच्च असतो, तो इतरांना विचारप्रवण होण्यास उद्युक्त करतो आणि सगळ्यांच्याच उन्नयनाचे निमित्त बनतो. संघाचा एक जरी सदस्य कुठल्याही परिस्थितीत संघाचे आदर्श, नियमांवर अविचल राहणारा असेल, तर संघाची वाटचाल आणि प्रगती केवळ त्याच्या सामर्थ्यावर होऊ शकते.
मैत्री हे नाते असे आहे, ज्यात लोकांचा परस्परांशी खुल्या दिलाने संवाद होऊ शकतो. मित्रांचा संघ बनणे जास्त सोपे जाते. कारण मित्र परस्परांशी मनमोकळा संवाद साधू शकतात.
दोस्ती नेहमी अशा व्यक्तींशीच करा जे सद्गुणांनी आपल्यापेक्षा दोन पावलं पुढे असतील, किमान आपल्या बरोबरीचे तरी असतील. आर्थिक बरोबरीचे नसले तरी चालतील, पण मित्र गुणांच्या बाबतीत समान पातळीवर असावेत.
चुकीच्या मित्रांच्या समूहात राहिलात तर त्यांचे अवगुण तुमच्यात उतरतील. कुसंगतीमुळे माणसाचे स्वनियंत्रण होत नाही. दिवसेंदिवस त्याचे चारित्र्य घसरत जाईल अशी कामे त्याच्याकडून कळत-नकळत होऊ लागतात.
त्यामुळे अशा मित्रांशी मैत्री करा, जे तुमच्याबाबतीत आरशाचे काम करतील. तुमच्या बाबत प्रत्येक घटना, संधी कशी आहे, याविषयी तुम्हांला मार्गदर्शन करतील. तुम्ही नक्की कोण आहात, याचे दर्शन तुम्हांला घडवतील.
अशा तेजमित्रांसमोर स्वदर्शन घडते. ज्याच्या सान्निध्यात तुम्हांला स्वयंदर्शन घडेल, संधी कशात आहे हे समजेल, तो असतो तुमचा खरा तेजमित्र. तेजमित्र म्हणजे मित्र आणि शत्रू यांपलीकडे असणारा, निरपेक्ष भावनेने मदत करणारा मित्र.
तेजमित्राला भेटल्यानंतर जीवनातील अज्ञान, भ्रम, मायाजाल, इंद्रजाल दूर होते. तुम्हांला स्वतःचे स्पष्ट दर्शन घडते. बाहेरचा आरसा तुम्हांला तुमच्या शरीराचे दर्शन घडवतो.
परंतु तेजमित्र तुम्हांला तुम्ही नेमके कोण आहात, या वास्तवाचे दर्शन घडवतो. यामुळे तेजमित्राच्या मैत्रीला मंगल मैत्री म्हटले जाऊ शकते. असे तेजमित्र प्रत्येकाच्या जीवनात असावेत.
Buddha Quotes On Good Friendship in Marathi
मैत्रीच्या विषयावर बुद्धांचे काही अवतरण येथे दिले आहेत:
“A friend is a gift you give yourself.”
- हा सुविचार मौल्यवान आणि स्वत: ची दिलेली गोष्ट म्हणून मैत्रीच्या मूल्यावर जोर देते, चांगले मित्र हुशारीने निवडण्याचे महत्त्व प्रतिबिंबित करते.
“An insincere and evil friend is more to be feared than a wild beast; a wild beast may wound your body, but an evil friend will wound your mind.”
- हा सुविचार फसवे मित्र असण्याचा धोका हायलाइट करते, जे महत्त्वपूर्ण भावनिक आणि मानसिक नुकसान करू शकतात.
“The company of the wise is a blessing. He who walks with fools walks a dangerous path.”
- बुद्ध ज्ञानी आणि सद्गुणी लोकांसह स्वतःच्या सभोवतालच्या महत्त्वावर जोर देतात, कारण त्यांचा प्रभाव एखाद्याला सकारात्मक आणि नीतिमान जीवनाकडे नेऊ शकतो.
“Good friends who are good people are called the soul’s deliverance.”
- हा सुविचार अधोरेखित करते की चांगले मित्र एखाद्याच्या आध्यात्मिक कल्याणासाठी आणि वाढीसाठी महत्त्वपूर्ण असतात.
“In the presence of friends who speak the truth, avoid idle chatter, and are not envious, one should spend time.”
- बुद्ध प्रामाणिकपणा, सचोटी आणि मत्सराची कमतरता असलेल्या मित्रांसोबत वेळ घालवण्याचा सल्ला देतात.
“In this world, hate never yet dispelled hate. Only love dispels hate. This is the law, ancient and inexhaustible.”
- मैत्रीबद्दल थेट नसले तरी, हा सुविचार सूचित करते की खऱ्या मित्रांनी सौहार्द आणि शांतता राखण्यासाठी द्वेष नव्हे तर प्रेम आणि करुणा जोपासली पाहिजे.
“Should a person do good, let them do it again and again. Let them find pleasure therein, for blissful is the accumulation of good.”
- हा सुविचार मैत्रीमध्ये चांगल्या कृती आणि कृतींचे पालनपोषण करण्यास प्रोत्साहित करते, ज्यामुळे चिरस्थायी आनंद आणि आनंद मिळतो.
“The whole secret of existence is to have no fear. Never fear what will become of you, depend on no one. Only the moment you reject all help are you freed.”
- हा सुविचार प्रामुख्याने स्वावलंबनाबद्दल बोलतो, परंतु याचा अर्थ असाही होतो की खरी मैत्री परस्पर आदर आणि अवलंबित्वाशिवाय समर्थनावर आधारित असते.
हे अवतरण सत्यता, शहाणपण आणि करुणा यासारख्या सद्गुणांवर भर देऊन, चांगली मैत्री निवडणे आणि टिकवून ठेवण्याच्या महत्त्वावर बुद्धाचे गहन ज्ञान प्रतिबिंबित करतात.
Conclusion
In conclusion, Buddha’s teachings on good friendship hold timeless wisdom that is still relevant in our modern lives. By embracing the principles of trust, loyalty, compassion, and understanding in our relationships, we can cultivate deeper and more meaningful connections.
True friends support each other through life’s challenges and joys, embodying the essence of companionship that Buddha so eloquently described.
As we reflect on these teachings, let us strive to be good friends to others, nurturing relationships that bring happiness, peace, and mutual growth.
May we all find the strength and wisdom to build and sustain the bonds of true friendship in our lives.
You may like this: ज्ञानप्रसार: Dissemination Of Knowledge by Buddha in Marathi
Follow our Podcast: Buddha Dhamma in Marathi