Buddha Dhamma in Marathi

संघाचा प्रभाव | Influence of the Sangha of Buddha Dhamma

Explore the influence of the Sangha of Buddha Dhamma in this blog post. Understand how the Buddhist community supports spiritual growth and fosters a path to enlightenment.

एके दिवशी बुद्ध एका राज्यातून दुसऱ्या राज्यात चालले होते. अचानक ते एके ठिकाणी थांबले. खाली पडलेला मळकट दोरीचा तुकडा उचलून त्यांनी आपल्या एका भिक्षूच्या हातात दिला आणि विचारले, ‘आता मला सांग याला कोणता वास आहे?’

त्याचा वास घेत त्या भिक्षूने सांगितले, ‘तिला तर दुर्गंध येत आहे.’ त्यानंतर बुद्धांनी सोबत असलेल्या सर्वच भिक्षंना विचारले, ‘या दोरीचा वास घेऊन मला सांगा, की तिचा वापर कुठे झाला असेल?’ त्या दोरीला खूपच दुर्गंध येत असल्याने वास घेतल्यानंतर भिक्षू चेहरा वेडावाकडा करून पटकन तो दुसऱ्याकडे सोपवून स्वतःचा हात झटकत असे.

बुद्ध धम्माच्या संघाचा प्रभाव | Influence of the Sangha of Buddha Dhamma

दोरखंडाचा वास घेतल्यानंतर बऱ्याच भिक्षूनी सांगितले, ‘कदाचित माशांना पकडण्याच्या कामासाठी कोळ्यांनी ही दोरी वापरली असावी.’ त्यावर बुद्ध म्हणाले, ‘अगदी बरोबर.’ मग त्यांनी विचारले, ‘ही दोरी ज्या वेळी तयार केली गेली, त्या वेळी तिचा असाच गंध येत असेल का?’ सर्व भिक्षूनी एकमुखाने सांगितले, ‘नाही.’ त्यावर गौतम बुद्ध म्हणाले, ‘अगदी बरोबर. दोरीला कुठलाही गंध नसतो.

पण ही दोरी मृत माशांमध्ये ठेवली गेल्यानं तो दुर्गंध या दोरीला लागला आहे. आता तोच दुर्गंध या दोरीचं अभिन्न अंग बनला आहे. आता ही दोरी ज्या मनुष्याच्या हातात जाईल त्या हातालाही तो दुर्गंध लागेल. अशा प्रकारे दुर्गंध पसरवण्याचं काम ही दोरी करेल. म्हणून ती दोरी लोक फेकून देतील. तिच्याकडे कायम तिटकाऱ्यानं पाहिलं जाईल. कुणालाच ही दोरी आवडणार नाही.’



पुढे जाऊन बुद्धांनी समजावले, ‘माणसाच्या बाबतीतही असंच घडतं. चांगल्या किंवा वाईट सवयी घेऊन कुणीही जन्मत नाही. पण ती व्यक्ती जर वाईट लोकांच्या संगतीत राहिली तर तिलाही वाईट सवयी लागतात. तुम्ही कितीही प्रयत्न केलात तरी संगदोष हे लागतातच.

हे समजत असूनही आपण त्या सवयी बदलल्या नाहीत, तर त्या खोलवर रुजून आपल्या व्यक्तिमत्त्वाचा अभिन्न भाग बनतात. त्यानंतर या सवयी सोडणं महाकठीण काम बनतं. तुमच्यातील वाईट सवयी पाहून लोक तुम्हांला वाईट व्यक्ती म्हणून ओळखायला लागतात. तुमची संगत टाळायला लागतात. कुणालाही तुम्ही आवडत नाहीत.

त्यामुळे अगदी सुरुवातीपासून कुणाच्या संगतीत आपण राहायचं, याबाबत सतर्क राहायला हवं. ज्या लोकांप्रमाणे आपल्याला व्हायचं नाही, त्यांच्या संगतीत आपण राहू नये.’ बुद्धांनी दाखवलेल्या या उदाहरणातून वाईट संगतीपासून का दूर राहावे, हे भिक्षूना उमगले.

अशाच पद्धतीने बुद्धांनी एकदा रस्त्यावर पडलेल्या एका फाटक्या कापडाचा तुकडा उचलला आणि सोबत असलेल्या भिक्षूपैकी एकाला त्याचा वास घेण्यास सांगितले. त्याने वास घेतला व आश्चर्यचकित होऊन म्हणाला, ‘ते वस्त्र सुगंधी आहे.’ बाकीच्या भिधूंनीही त्याचा वास घेतला. त्यांचा चेहराही त्या वस्त्राच्या सुवासाने प्रफुल्लित झाला.

एका भिक्षूने विचारले, ‘वस्त्र तर गंधहीन असतं. मग या वस्त्राला सुगंध कसा?’ त्यावर बुद्ध उत्तरले, ‘यात उदबत्त्या लपेटून ठेवलेल्या होत्या. त्यामुळे या वस्त्रालाही सुगंध प्राप्त झाला आहे. शिवाय, सर्वांनाच त्याचा वास आवडू लागला आहे.

त्याचप्रमाणे माणूस सुसंगतीनं घडतो. सज्जनांच्या सहवासात राहून त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील चांगले गुण, चांगुलपण पाहून तो ते टिपतो. मग हे सद्गुणच त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग बनतात. अशा सज्जनांच्या, सद्गुणी व्यक्तींच्या सोबत राहणं सर्वांनाच आवडतं.’

यावर आणखी विवेचन करताना बुद्ध म्हणाले, ‘चांगल्या किंवा वाईट लोकांच्या संगतीचा प्रभाव हळूहळू पण नियमितपणे होतो. ज्याप्रमाणे पर्वत चढणाऱ्या दोन लोकांना दोन समूह स्वतंत्रपणे भेटतात.

त्यापैकी एक समूह पर्वतशिखराकडे जात असतो, तर दुसरा समूह पर्वताच्या पायथ्याकडे निघालेला असतो. अशा वेळी पर्वत चढणाऱ्यांच्या बाबतीत काय होईल? ते आपापल्या समूहासोबत एक-एक पाऊल पुढे टाकतील.

त्यापैकी एक जण पर्वतशिखराच्या दिशेनं पाऊल टाकेल आणि दुसरा पर्वतपायथ्याकडे यायला निघेल. अखेर एक जण पर्वतशिखरावर पोहोचेल, तर दुसरा पर्वताच्या पायथ्याशी पोहोचेल.

त्यामुळेच योग्य अथवा अयोग्य संघासोबत राहण्याचे फायदे किंवा तोटे जरी आपल्याला लगेच दिसत नसले, तरी अंतिम परिणामासाठी योग्य संघाची निवडच आपल्यासाठी श्रेयस्कर ठरते.’

You may like this: बुद्धांची महत्त्वाची शिकवण | Important teachings of Buddha

Follow our Podcast: Buddha Dhamma in Marathi

Conclusion on Influence of the Sangha of Buddha Dhamma

The Sangha, or the community of Buddhist monks, nuns, and practitioners, plays a vital role in the spread and sustenance of Buddha Dhamma.

This community provides a supportive environment for individuals seeking spiritual growth and enlightenment. By fostering a sense of belonging, shared values, and mutual encouragement, the Sangha helps practitioners stay committed to their path.

Through the teachings, guidance, and exemplary lives of its members, the Sangha influences society by promoting values such as compassion, mindfulness, and ethical living.

Embracing the support and wisdom of the Sangha can significantly enhance one’s spiritual journey, paving the way for a more enlightened and harmonious existence.

Let us recognize and appreciate the profound impact of the Sangha in our pursuit of peace and enlightenment.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *