Discover the essence of pain through the lens of Buddhism with “Pain | The Four Noble Truths.” Explore how understanding the Four Noble Truths can transform your perspective on suffering and lead to a path of enlightenment and inner peace.
पहिले आर्य सत्य – दुःख | Pain | The Four Noble Truths
आर्य सत्य म्हणजे कधीही न बदलणारे वास्तव. आर्य म्हणजे अनुभवातून निर्माण झालेला बोध आणि समज. जेव्हा भगवान बुद्धांना बोध प्राप्त झाला, तेव्हा प्रथम त्यांनी या चार आर्य सत्यांचा विस्तार केला.
दुःख म्हणजे काय? सध्या जगात अनेक ठिकाणी उपासमार आहे. लोकांना दोन वेळचे जेवण सहजासहजी मिळत नाही. विविध रोग, विकार आहेत, व्यथा-वेदना आहेत. मुले-स्त्रियांवर अत्याचार होत आहेत. अनेक जण बेरोजगार आहेत.
सत्तेच्या खुर्चीसाठी स्पर्धा सुरू आहे. हा देश कुणी चालवत नाही, तो आपोआपच चालतो आहे. पंडित, पुजारी नवनवीन कर्मकांड तयार करत आहेत. सोमवारी काय खावे, मंगळवारी काय खावे, अमुक दिवशी आंबट खाऊ नये, तमुक दिवशी केस कापावेत, काळे कपडे घालू नयेत, या दिवशी मीठ विकत घेतले, तमुक दिवशी तेल घेतले तर खूप वाईट होईल, मांजर रस्त्यात आडवे आले, तर अपशकुन होईल…
अशा प्रकारच्या कर्मकांडांत आणि अंधश्रद्धांमध्ये लोक अडकले आहेत. त्याचप्रमाणे मागील जन्मी केलेल्या कर्मांमुळे हे दुःख भोगावे लागत आहे, असेही आपल्याला या तथाकथित साधू-संन्याशांकडून सांगितले जाते. कुणी कुकर्म करत असेल, तर ते पाहून हे पंडित, पुरोहित, ज्योतिषी म्हणतात, की त्यांना पुढील जन्मात याचे फळ भोगावेच लागेल. तुमच्या बाबतीत जर काही वाईट घडत असेल, तर ते म्हणतात, मागील जन्मी तुम्ही काही वाईट कर्मे केली आहेत, म्हणून तुम्हांला आता हे कष्ट भोगावे लागत आहेत.
दुःखाचे अस्तित्व आहे, याचाच अर्थ, आपल्या सभोवताली दुःखच आहे. कुणाला दुःखाचे दर्शन झाले तरच तो त्यातून सहीसलामत बाहेर पडण्याचा मार्ग शोधू शकेल. दुःखच नसेल तर कुणी मोक्षाचा शोध घेणार कसा? काही लोक दुःखात असूनही आपण दुःखात आहोत, याचे त्यांना भान नाही, हे बुद्धांनी पाहिले.
ते असंवेदनशील, बेहोश आणि अज्ञानी आहेत. त्यामुळे आपल्याला दुःख आहे आणि ते निवारण्याची गरज आहे, हे त्यांना समजायला हवे. दुःखच नसेल तर ते दूर करण्याचा प्रयत्न कुणी कशाला करेल?
बुद्धांनी सांगितले, अर्भक जन्मल्यानंतर टाहो फोडते, दुःख व्यक्त करते. म्हणजे आपण जन्मल्यानंतरही रडतो आणि मरतानाही रडतच असतो, असे का? कारण या वेदना आपल्यालाच होत आहेत, या भ्रमात बहुसंख्य लोक असतात.
त्यामुळे त्यांना खूप दुःख होते. या वेदना फक्त शरीरालाच होत आहेत, याची जाणीव नसल्याने त्या व्यक्ती दुःखीकष्टी होतात. शरीराविषयी मोह असल्याने, त्याची आसक्ती असल्याने माणसाला हे शरीराचे दुःख स्वतःचे दुःख वाटू लागते.
एखाद्या विद्यार्थ्याला अभ्यासाविषयी विचारले तर तो म्हणेल, ‘अभ्यास करणं फार दुःखदायक प्रकार आहे.’ परीक्षेच्या काळात तर अभ्यास करावा लागल्याने तो फारच दुःखी असतो. परीक्षेच्या चिंतेने तो प्रसंगी आजारीही पडतो. मग शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याला त्याच्या भविष्याची चिंता वाटत राहते. त्यानंतर नोकरी मिळाली नाही, तर तो दुःखी होतो.
माझ्या मित्राला नोकरी लागली, पण मला लागली नाही या विचारांनी तो अस्वस्थ होतो, चिंताग्रस्त होतो. या चिंता खरे तर कधी संपतच नाहीत. पुढे लग्न… अपत्य… त्यांचे संगोपन… त्यांच्या जबाबदाऱ्या… मग म्हातारपण… असे हे चक्र अव्याहत सुरूच राहते. सर्वप्रथम आपल्या चहुबाजूला काय चालले आहे, ते पाहा. अनेकांना किती प्रकारचे रोग सतावत आहेत, कित्येक समस्या भेडसावत आहेत.
वृद्धापकाळ अनेक व्यथा-वेदनांनी व्याप्त आहे. यासाठीच बुद्धांनी वारंवार आपल्याला स्मरण करून दिले, तुमच्या दुःखाकडे तुम्ही सजगपणे पाहा. जेवढे दुःख तुम्ही पाहाल, तेवढे त्यातून मुक्त होण्याची तीव्र इच्छा तुमच्या मनात जागृत होईल. अन्यथा, या दुःखांतून बाहेर पडण्याची इच्छाच कधी तुम्हांला होणार नाही.
एका कारागृहातून काही कैदी वारंवार पळून जात होते. मग त्या कारागृहात नवा जेलर आला. त्याने विचार केला, ‘याच कारागृहातून कैदी का पळून जातात बरं?’ यासाठी त्याने थोडे सर्वेक्षण केले. त्याने माहिती घ्यायला सुरुवात केली असता त्याला समजले, त्या कारागृहात जो कुणी नवा कैदी येत असे, त्याला आधी संपूर्ण कारागृह दाखवले जात असे.
शिवाय, हा तुझ्या कारागृहाचा परिसर आहे, हेदेखील त्याला सांगितले जात असे. मगच त्याला त्याच्या बराकीत बंदिस्त ठेवले जायचे. आता नव्या जेलरने येणाऱ्या नव्या कैद्यांना संपूर्ण कारागृह दाखवणे बंद केले. त्यानंतर मात्र त्या कारागृहातून कैदी पळून जाण्याचे प्रकारच थांबले. एवढ्या मोठ्या कारागृहात कुठे काय आहे, याचा तपशीलच कैद्यांना माहीत नसल्याने त्यांना पळून जाताच येईना.
यापूर्वी नव्या कैद्यांना कारागृह दाखवल्यानंतर त्याचा तपशील लक्षात ठेवून हे कैदी बाहेर पळून जाण्याची योजना बनवत. ते कारागृह आतून नेमके कसे आहे, याची पूर्ण कल्पना त्याला येत असे. कारण एखाद्या जागेचा अंदाज ती जागा नीट पाहिल्यानंतरच येऊ शकते, अन्यथा येत नाही. …त्याचप्रमाणे दुःख पूर्णपणे पाहिल्यानंतरच त्यातून बाहेर पडणे सहज होते, हे वरील उदाहरणावरून लक्षात येते.
एका ज्योतिषाला एका मनुष्याने आपले भविष्य विचारले, तेव्हा तो ज्योतिषी म्हणाला, ‘पाच वर्षांपर्यंत तुम्हांला खूप प्रतिकूल काळ असेल. अतीव दुःखाचे दिवस असतील.’ मग त्या माणसाने विचारले, ‘त्या पाच वर्षांनंतर काय होईल, हे जरा सांगा ना.’ त्यावर ज्योतिषी उत्तरला, ‘पाच वर्षांनंतर तुम्हांला या दुःखाची, वेदनांची सवयच होऊन जाईल.’
अगदी याचप्रमाणे या दुःखाची आपल्याला सवय झाली आहे. दुःख म्हणजे काय, हे समजत नसल्याने त्यातून बाहेर पडण्याची चिंताच कुणाला सतावत नाही. त्यातच आपला जन्म वाया चालला आहे याचे बुद्धांनी सर्वांना स्मरण करून दिले. तुमच्या भोवताली सर्वत्र दुःखच दिसत असल्याने तुम्हांला दुःखाची सवय झाली आहे. मग तुम्ही सदैव असेच दुःखात राहणार का?
एका माणसाने त्याच्या मित्राला विचारले, ‘तू सफरचंद खाणार का?’ मित्राने होकार दिल्यानंतर त्याने सफरचंदाचे दोन तुकडे केले. त्या सफरचंदाच्या एका फोडीत किडा निघाला. हे पाहून त्याला थोडे वाईट वाटले. त्याने आपल्या मित्राला विचारले, ‘सफरचंदात किडा निघाल्यानंतरही आपल्याला खूप दुःख होतं का?’
त्यावर तो मित्र उत्तरला, ‘हो, तू जर त्या सफरचंदाची फोड अधीं खाल्ली असतीस आणि त्या वेळी तुला तो किडा तूच अर्धवट खाल्लेल्या अवस्थेत दिसला असता, तर तुला खूपच दुःख झालं असतं.’ या उदाहरणांवरून आपल्या लक्षात येईल, एखादी गोष्ट आपल्या मनाविरुद्ध घडली तर आपल्याला दुःख होते. केवळ ते कधी कमी असते, तर कधी जास्त एवढेच !
You may like this: ना दुःखाशी संघर्ष, ना सुखाशी सलगी | Buddha on Sorrow
Follow our Podcast: Buddha Dhamma in Marathi
Conclusion on Pain | The Four Noble Truths.
In conclusion, the Four Noble Truths offer a profound framework for understanding and addressing pain. By recognizing the existence of suffering, identifying its causes, aspiring to end it, and following the Eightfold Path, we can transform our relationship with pain.
This Buddhist teaching not only provides a pathway to alleviate personal suffering but also encourages a deeper connection with the world around us. Embracing the Four Noble Truths can lead to a more compassionate, mindful, and fulfilling life, guiding us toward ultimate liberation and peace.
2 Comments