Buddha Dhamma in Marathi

ना दुःखाशी संघर्ष, ना सुखाशी सलगी | Buddha on Sorrow

Discover Buddha’s profound teachings on sorrow. Explore the wisdom and insights that offer solace and guidance in times of sadness. Learn how to navigate life’s challenges with mindfulness and compassion, as taught by the enlightened one.

ना दुःखाशी संघर्ष, ना सुखाशी सलगी | Buddha on Sorrow

ना दुःखाशी संघर्ष, ना सुखाशी सलगी | Buddha on Sorrow
ना दुःखाशी संघर्ष, ना सुखाशी सलगी | Buddha on Sorrow

अलिप्ततेची कला

अलिप्ततेची कला आपल्याला सुख-दुःखाच्या पलीकडे घेऊन जाते. ही कला शिकण्यासाठी तुम्हांला दिवसभर सुख-दुःखांवर मनन करण्याची गरज आहे. तुम्ही सकाळपासून रात्रीपर्यंत कोणकोणत्या गोष्टींमध्ये गुंतून जाता, त्याचे निरीक्षण करा.

आपल्या आयुष्यात एकदा डोकावून पाहा. कोणत्या व्यसनात, कुठल्या प्रकारच्या प्रशंसेने, कोणत्या इंद्रियांशी तुम्ही आसक्त होता, हे जाणून घ्या. ज्या गोष्टीबाबत तुमचे आकर्षण अधिक असेल, ती तुम्हांला अधिक सुखद वाटू लागेल. जी गोष्ट तुम्हांला आवडत नाही, तिच्याविषयी दुःखद भावना निर्माण होतात.

खरे तर आपण जीवनात नेहमी सुखाची अपेक्षा करतो, म्हणून आपल्याला सतत सुख हवेहवेसे वाटते. दुःखद भावना आपल्याला चांगली वाटत नसल्याने त्या दुःखाचा स्वीकार करणे आपल्याला कठीण जाते. आपण सतत त्याच्याशी संघर्ष करत असतो. परंतु सुख आणि दुःख हे जीवनाचे दोन पैलू आहेत, याचाच आपल्याला विसर पडतो. हे दोन्ही परस्परांशिवाय अपूर्ण आहेत.

दुःखामुळेच तर माणसाला सुखाचे महत्त्व कळते. जीवनभर सुखाच्या अभिलाषेमुळे दुःखाशी झगडत राहाल, तर दुःखीच होत राहाल. त्यापेक्षा दुःखाला आनंदाने स्वीकारले, तर ते सुखात परिवर्तित होईल. ही समज आपल्याला मुक्तीचा मार्ग दाखवेल. हा विषय व त्यामुळे होणारे आकलन आपण काही उदाहरणांद्वारे समजून घेऊ या.

१.

तुम्ही एखादी वस्तू घेण्यासाठी बाजारात गेला आणि ती मनपसंत वस्तू तुम्हांला मिळाली नाही, तर ती आपल्याला कशी मिळेल, याचे विचार तुमच्या मनात सतत रेंगाळत राहतात. पण ती वस्तू मिळत नसल्याने तुम्ही अस्वस्थ मनःस्थितीत राहता. जर ती वस्तू तुम्हांला मिळाली, तर तुमचे मन समाधानी व आनंदी होते.

खरे तर या वस्तूंच्या पलीकडे असणाऱ्या गोष्टींची खरेदी झाली पाहिजे. ही खरेदी आपल्या अंतरंगात होते. अशा वेळी तेजसुख किंवा तेजुखची आठवण आली पाहिजे. असे झाले तर तुमच्यासाठी अनेक गोष्टी सोप्या होतील.

२.

काही व्यक्ती खूप कुटुंबवत्सल असतात. कुटुंबातील सदस्यांना परस्परांकडून काही ना काही मिळण्याची अपेक्षा असते. एखाद्याकडून या अपेक्षा पूर्ण न झाल्यास दुःख होते. अपेक्षा पूर्ण झाल्यास सुख मिळते, ती व्यक्ती आनंदी होते. याचाच अर्थ, सुखद कल्पनाही माणसाला हवीहवीशी वाटते. प्रत्येक जण माझ्या इच्छेनुरूप वागतो आहे, ही भावनाही माणसासाठी सुखद असते.

एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही, तर तिच्यात आपण किती गुंतलो आहोत, हे समजते. अचानक वीज गेल्यावर काही जण लगेच नाराजी व्यक्त करतात. ‘अरेरे, असं कसं झालं, असं व्हायला नको होतं,’ असे उद्‌गार त्यांच्या तोंडातून लगेच निघतात. अशी अनेक उदाहरणे देता येतील. या उदाहरणावरून वीज असल्यावर आपल्याही नकळत आपण ती कायमच असायला हवी, असे गृहीत धरतो.

कुठलीही गोष्ट जीवनभर कायम राहावी, अशी इच्छा बाळगणे म्हणजे कुत्र्याचे वाकडे शेपूट नळीत घालून सरळ करण्याच्या निष्फळ प्रयत्नांप्रमाणे आहे. ही इच्छा कधीही सफल होत नाही. त्यामुळे माणूस आयुष्यभर दुःखीच राहतो. जर त्याला हे उमगले, की कुत्र्याची शेपटी सरळ होवो अथवा न होवो, मला अंतर्यामी, आतून सरळ व्हायचे आहे.

अवघे तेजसुख या सरळपणात सामावले आहे. तिथवर पोहोचण्यासाठीच अवघ्या ज्ञानाचे प्रयोजन आहे. हे समजल्यानंतर त्याचे दुःख विलीन होते आणि तो तेजसुख किंवा तेजुख या अवस्थेपर्यंत पोहोचतो.

३.

आपल्याला जेव्हा आजारपण अथवा इतर कुठला शारीरिक त्रास असतो, तेव्हा आपले मन त्या वेदना नको, यासाठी झगडत असते. आता तुम्ही एक प्रयोग करून पाहा, माझ्यासोबत असे घडत आहे तर घडू देत.

मी केवळ साक्षीभावाने जाणत राहीन. हा अलिप्तपणा तुम्हांला शक्ती आणि आत्मबल देईल. या आत्मबलासाठीच तुम्हांला ध्यानाचा सराव करायचा आहे. अर्थात, हे करत असताना तुमच्या शारीरिक वेदना, आजारांवर वैद्यकीय उपचार अवश्य करा. मात्र, तुमच्या मनात सदैव सुरू असलेला संघर्ष या साक्षीभावाने नक्कीच थांबेल. यासाठी ही साक्षीभावाची जाण येणे अत्यंत महत्त्वाचे असते.

तुम्ही मांसाहार बंद करण्याचा संकल्प केला असेल, पण तुमची त्याविषयीची आसक्ती कमी होत नसेल, तर यालाच आकर्षण म्हणता येईल. तुमचे मन त्या गोष्टींना कुठल्या तरी स्तरावर घट्ट पकडून बसले आहे.

आता त्यावर मात करण्यासाठी तुम्हांला नवीन उपाय करावा लागेल. ज्याप्रमाणे लोक घरात प्राणी पाळतात, त्याचप्रमाणे आपल्याला मांसाहार करण्याची सवय जडते. म्हणून त्याला नेहमी स्वादिष्ट भोजन हवे असते. परंतु आपले ध्येय शरीराला मंदिर बनवण्याचे आहे. ‘मी कोण आहे’ हे जाणण्याचे आहे. त्यासाठी स्वतःमध्ये आपण किती क्षमता तयार केली आहे, याचे स्मरण नेहमी ठेवायला हवे.

ज्या शरीरारूपी कुऱ्हाडीस तुम्ही साधनेसाठी धार लावत आहात, ते शरीर असे मोह सोडण्याच्या संकल्पामुळे भविष्यात कुठल्याही त्रासाशिवाय शेकडो पट अधिक तप करू शकेल. खरे तर अशा छोट्या छोट्या सुखांना सोडण्याची मनाची तयारी नसते. मात्र, या सवयी बदलणे गरजेचेच आहे. तुम्ही जेवढी ध्यानसाधना कराल, तेवढी आसक्ती विलीन होत जाईल.

५.

पैशांनी खरेदी केलेले सुख आणि पैशांअभावी होणारे दुःख हे दोन्हीही एकत्रितपणे माणसावर हल्ला करतात. यालाच मोहमायेचा पाश म्हणतात. त्यामुळे खरा व्यापार, खरे यश म्हणजे काय, हे जाणून सजग होणे महत्त्वाचे आहे.

या भूलोकावरून शेवटी तुम्ही अधिकाधिक आनंदित होऊन जावे, हाच या खऱ्या व्यापाराचा, खऱ्या यशाचा आणि पृथ्वीलक्ष्याचा उद्देश आहे. अन्यथा, खूप पैसे कमावणारे अनेक लोक असतात; पण ते सदैव दुःखीच राहतात. हे खरे यश नव्हे.

तुम्ही पैशांचा ध्यास घेतला, योग्य समन्वय राखून मेहनत केली तर पैसा तुमच्याकडे स्वतःहून येत राहील. असे धनाढ्य लोक पाहिल्यानंतर आपण त्यांचा मत्सर करू लागतो. त्यांना पाहून आपले संतुलन बिघडते. आपण वारंवार आपल्याकडे नसलेल्या पैशांचा विचार केला, तर सदैव त्याच्या अभावग्रस्ततेच्या नकारात्मक भावनेत अडकून राहू.

त्यामुळे तुम्हांला ही नकारात्मक भावना सोडून सकारात्मक भावना आणावी लागेल. कारण या जगात सर्वांसाठी सर्व काही मुबलक आहे. त्यामुळे तुम्हांला जे हवे आहे ते नक्कीच अनेक पटींनी मिळेल. निसर्गनियमांनुसार तुमच्या वाट्याचे दुसरा कुणी घेऊन जाऊ शकत नाही. यावर विश्वास ठेवा. तुम्ही या निसर्गाला व त्याच्या नियमांना जेवढे समजून घ्याल,

६.

तेवढीच तुमची प्रार्थनेवरील श्रद्धा वाढेल आणि तुम्ही निश्चिंत व्हाल. एखादा मनुष्य आजारी असेल, तर ‘हे शरीर पृथ्वीलक्ष्य प्राप्त करण्यास सहयोग देईल की नाही’ याविषयी त्याच्या मनात साशंकता निर्माण होते आणि तो दुःखी होतो. अगदी दोन-चार फांद्या असलेले झाडही कधीकधी आपल्याला कडक उन्हापासून सावली मिळवण्यासाठी उपयोगी पडते.

त्याचप्रमाणे हे शरीर कसेही असले, तरी काही फरक पडत नाही. ते कोणत्या ना कोणत्या स्वरूपात आपल्यासाठी उपयुक्त ठरते. तुम्हांला जे मिळाले आहे, जसे मिळाले आहे, त्यालाच वरदानात रूपांतरित करून घेण्याची कला आपल्याला शिकायची आहे. आपल्या कमतरता, उणिवांनाही आपले बलस्थान बनवायचे आहे. तुम्ही असे करू लागलात, तर अवघे अस्तित्व तुम्हांला तुमचे लक्ष्य मिळवण्यासाठी पुरेपूर मदत करेल.

७.

काही जणांना आपल्या कार्यालयात नवनवीन प्रकल्प, योजन यांवर काम करणे आवडते. असे नवीन काम मिळाले नाही तर ते दुःखी होतात. अशा प्रकल्पांसाठी काम मिळणे म्हणजे आपल्या मनाजोगते काम मिळण्याचे सुख उपभोगणे. अशा नवीन प्रकल्पांचा विचारही आपल्याला आनंदित करतो. आता तुम्ही त्या विचारांमागील विचारकाला समजून घ्या.

विचारक म्हणजे हा विचार करणारी व्यक्ती. जेव्हा तुम्ही हा विचार करणारी व्यक्ती कशी तयार झाली, याचा विचार कराल, तेव्हा विचार येत आहेत व जात आहेत, तेच सुख आणि दुःख निर्माण करत आहेत, हे तुम्हांला समजेल. त्यानंतर आपल्या लक्षात येईल, ‘मी जर या सुख-दुः खांकडे योग्य दृष्टिकोनातून बघायला शिकलो, तर कामं होतच राहतील; पण मी आनंदी राहीन.’ मग काम मिळाले अथवा नाही मिळाले तरी आपण सुख-दुःखाच्या दुष्टचक्रात अडकणार नाही. तथापि, ती जाणण्याची सजगता महत्त्वपूर्ण ठरेल.

८.

सध्याच्या तरुण पिढीसाठी इंटरनेट आणि फेसबुक हे आकर्षण बनले आहे. जे समोर दिसते त्याला त्याक्षणी लाइक किंवा डिसलाइक केले जाते. यात सदैव हाच सुख-दुःखाचा खेळ सुरू असतो. अशा वेळी आपल्याला जास्त सजग झाले पाहिजे. केवळ अधिक सुख (लाइक्स) मिळवण्यासाठी आपण यात गरजेपेक्षा जास्त वेळ वाया घालवतो आहोत, याची जाणीव आपल्याला व्हायला हवी.

अशा वेळी स्वतःला हा प्रश्न विचारा, इंटरनेटवर तासन्तास वाया घालवण्याने मला जास्तीत जास्त काय मिळू शकते? त्यानंतर आपल्याला त्यातील फोलपणा लक्षात येईल. मग तुम्ही त्यात वेळ वाया घालवणे थांबवाल. जेव्हा तुम्ही गौतम बुद्धांसारख्या महापुरुषाप्रमाणे सम्यक संकल्प करून स्वतःला बजावाल, की

९.

मी फक्त दहा-पंधरा मिनिटेच इंटरनेटसाठी देईन, तेव्हा तेवढ्या वेळेनंतर तुमचा इंटरनेटचा मोह आपोआपच नष्ट होईल. काही जणांना आपले शरीर आणि मन या दोहोंविषयी खूप मोह असतो. त्यामुळे त्यांना आपण ‘पृथ्वीलक्ष्य’ मिळवू शकू की नाही, याविषयी साशंकता असते. खरे तर अशा शंका-कुशंका आपल्या शत्रू असतात.

त्यांच्यावर मात करण्यासाठीच तर सत्य श्रवण आणि पठण केले जाते. तुम्ही जेव्हा ध्यानात बसता, तेव्हा मध्येच एक तपासनीस येतो. काही होत आहे की नाही हे तपासण्याचे काम तो करतो. हे मला शक्य आहे का? त्यावर मात करण्यासाठी तुम्हांला आत्मबल मिळवावे लागेल.

वाचकहो, ज्याप्रमाणे आपण आता हे पुस्तक वाचत आहात, त्याप्रमाणे बुद्धांसारख्या महान व्यक्तींची आत्मचरित्रेही आपल्याला वाचावी लागतील. त्यामुळे आपल्याला प्रेरणा, स्फूर्ती मिळेल, शिवाय इतक्या लोकांना हे शक्य झाले, तर मलाही हे नक्की जमेल, असा दृढविश्वास तुमच्यात निर्माण होईल. या प्रेरणेच्या साहाय्यानेच तुम्हांला निरंतर आध्यात्मिक प्रगती करायची आहे.

माणसाच्या काही आकांक्षा अशा असतात, ज्या सांसारिक, भौतिक पद्धतीने पूर्ण न झाल्यास माणूस त्यांच्या पूर्तीसाठी विविध सिद्धींमध्ये गुंतून जातो. त्यांनाच तो खरा मार्ग समजतो. इतर लोक अशा सिद्धी असलेल्या व्यक्तीला खूप मोठे मानून त्याची स्तुती करतात, त्यामुळे तो अहंकारी बनतो आणि त्यातच त्याला सुख वाटू लागते. परंतु जेव्हा ती व्यक्ती सत्य श्रवण करते, तेव्हा तिला वस्तुस्थितीची जाणीव होते.

जी व्यक्ती सत्य श्रवणासाठी तयार असते, तिच्यासाठी भगवान बुद्धांनी चार आर्य सत्यं सांगितली आहेत. त्यापैकी पहिले आर्य सत्य म्हणजे- दुःख आहे. याचाच अर्थ आपल्या मनात जो कुठला विचार येतो, तो दुःख निर्माण करतो. तो विचार तुमच्यासाठी अगदी सुविधाजनक असला, तरी अंततः त्यातून दुःखच निर्माण होते. काही दुःखं लगेच निर्माण होतात, काही दुःखं कालांतराने प्रकट होतात, एवढाच काय तो फरक.

जी व्यक्ती ही गोष्ट सजगतेसह स्वीकारते व समजून-उमजून घेते, तिच्यात एक शुभ इच्छा निर्माण बदलत असेल, तर यातून मुक्त कसे होता येईल? अशा प्रकारे लोकांत हे ज्ञान आणि होते. मग ती विचार करते, आसक्ती जर मोह निर्माण करत असेल आणि तो दुःखान परमानंद अवस्था मिळवण्याची इच्छा अथवा मंगल कामना निर्माण होते. 

You may like this: मौल्यवान काय? | Buddha Tales in Marathi

Follow our Podcast: Buddha Dhamma in Marathi

Conclusion

In conclusion, Buddha’s teachings on sorrow provide a profound perspective on dealing with the inevitable challenges of life.

By understanding the nature of suffering and its causes, we can cultivate resilience and inner peace. Through mindfulness and compassion, we can transcend sorrow and find lasting happiness within ourselves.

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *