Buddha Stories

17. कथा गौतमीची | The story of Gautami in Marathi

Discover the inspiring story of Gautami in Marathi. Explore the life of Gautami, her trials, triumphs, and profound impact on Buddhism. Uncover the essence of compassion, strength, and wisdom through her journey.

कथा गौतमीची | The story of Gautami in Marathi

17. कथा गौतमीची | The story of Gautami in Marathi
कथा गौतमीची | The story of Gautami in Marathi

एकदा किसा गौतमी नावाच्या एका स्त्रीचा छोटा मुलगा अकाली निधन पावला होता. हे दुःख ती काही केल्या स्वीकारू शकत नव्हती. आपल्या मुलाचा मृतदेह ती अनेकांकडे घेऊन गेली. तिच्या मृत मुलाला कोणी जिवंत करावे यासाठी मदतीची याचनाही करत होती.

मात्र, तिची ही मागणी पूर्ण करणे कुणालाही शक्य नव्हते. तिचे दुःख पाहून कुणीतरी तिला गौतम बुद्धांकडे जाण्याचा सल्ला दिला. तिला वाटले, बुद्ध नक्कीच आपल्या मुलाला जिवंत करतील. म्हणून मुलाचे पार्थिव घेऊन ती बुद्धांकडे गेली.

बुद्धांनी तिचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले आणि तिची मागणी नाकारलीही नाही. बुद्धांचा व्यक्तिगणिक शिकवण्याचा ढंग वेगवेगळा होता. बुद्ध गौतमीला म्हणाले, ‘तुझ्या मुलाला जिवंत करण्यासाठी गावातील अशा घरातून मोहरीचे दाणे घेऊन ये, ज्या घरातील लोकांच्या कुठल्याही नातलगाचा आजवर कधी मृत्यूच झाला नाही.’

बुद्धांच्या या अटीमागचे मर्म किसा गौतमी समजू शकली नाही. ती तशीच गावाकडे धावत सुटली. तिने संध्याकाळपर्यंत गावातील बहुतेक सर्व घरांचे दरवाजे ठोठावले. पण ज्या घरात एकही मृत्यू झालेला नाही, असे घर तिला संध्याकाळपर्यंत काही सापडले नाही.

बुद्धांना आपल्याला नेमके काय समजावून सांगायचे आहे, याचे भान मात्र संध्याकाळ संपताना गौतमीला आले. ती बुद्धांना शरण गेली आणि त्यांच्याकडून दीक्षा घेऊन संघात सामील झाली.

गौतमीच्या या उदाहरणाद्वारे बुद्धांनी सर्वांना मृत्यूचे वास्तव सांगितले. खरे तर आपल्याला रोजच मृत्यूचे दर्शन घडत असते. साधारणपणे दररोज कुणी ना कुणी मृत्युमुखी पडतच असते. परंतु जेव्हा आपल्या नातलगाचा मृत्यू होतो, तेव्हा तुम्ही त्याकडे कसे पाहता?

आता मला अमुक सुख मिळणार नाही… आता मी एकटा पडेन… असे विचार सामान्यपणे माणसाच्या मनात येत असतात. या घटनेकडे कुणी अज्ञानातून पाहत असेल, तर तो नक्कीच दुःखी होतो. वास्तविक अशा घटना पाहताना जी समज असणे अपेक्षित आहे, नेमका तिचाच अभाव असतो.

मनुष्याला खऱ्या अर्थाने निरीक्षणाची कला अवगत झाली, तर अनेक जण अशा मृत्युदर्शनानेच आमूलाग्र बदलून जातील. गौतमीचा जसा कायापालट झाला, तसा त्यांचाही होईल. भगवान बुद्धांच्या मार्गदर्शनामुळे स्वतःच्या मुलाचा मृत्यू किसा गौतमीच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी कारणीभूत ठरला. 

Conclusion

In conclusion, the story of Gautami in Marathi is a testament to the transformative power of compassion and wisdom.

Her life serves as an inspiration to all, highlighting the importance of perseverance and kindness in the face of adversity.

Through her story, we learn valuable lessons about the true meaning of strength and the enduring legacy of those who choose the path of empathy and understanding.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *