Buddha Stories

16. पुन्नची भक्ती | Buddha Story in Marathi

Experience the timeless wisdom of Buddha’s story in Marathi. Dive into the life of Siddhartha Gautama, his journey to enlightenment, and the profound teachings that continue to inspire millions worldwide. Explore the path to inner peace and enlightenment through this enlightening narrative.

Buddha Story in Marathi

पुन्नची भक्ती | Buddha Story in Marathi
पुन्नची भक्ती | Buddha Story in Marathi

भगवान बुद्धांच्या या वाटचालीत त्यांच्या सहवासात अनेक साधू आले. शेकडो शिष्य असणारे साधूही बुद्धांशी संवाद साधल्यानंतर आपल्या शिष्यांसह दीक्षा घेऊन बुद्धांच्या संघात सामील होत असत. त्यामुळे प्रारंभीच्या काळात बुद्धांच्या संघाचा विकास आणि विस्तार वेगाने झाला.

भगवान बुद्ध आपल्या शिष्यांना सांगत, ‘भिक्षूनो, ज्यांची दृष्टी अद्याप धुळीनं अंधुक झाली नाही, त्यांच्यापर्यंत माझा संदेश पोहोचवा. सत्याचा हा संदेश ते नक्कीच ऐकतील.’ अशा प्रकारे बुद्धांचे शिष्य उत्तर व पूर्व भारतासह चारही दिशांना पोहोचले.

भगवान बुद्धांचे शिष्य भिक्षा मागण्यासाठी गावोगावी जात, तेव्हा त्यांचे प्रसन्न चेहरे पाहून लोकांनाही बोध प्राप्त करण्याची प्रेरणा मिळत असे. आपण ज्याचा अविरत शोध घेत आहोत, ते या भिक्षूना मिळाले आहे, याची जाणीव तत्क्षणी सत्यशोधकांना होत असे. मग हे सत्यसाधक बुद्धांना शरण येत असत.

व्यापारासाठी भारतात आलेले काही परदेशी व्यापारी बुद्धांच्या सहवासात आले. त्यांनी बुद्धांकडून दीक्षा घेतली आणि ते आपल्या देशात परतले. अशा प्रकारे बुद्धांची शिकवण चीन, कोरिया, जपान, थायलंड, ब्रह्मदेश (म्यानमार), तिबेट, नेपाळ यांसारख्या देशांत पोहोचली.



अशांपैकी पुन्न या परदेशी प्रवाशाने आपल्या देशात पुन्हा परतण्याची आणि सत्याचा प्रचार आणि प्रसार करण्याची परवानगी बुद्धांकडे मागितली. त्या वेळी बुद्धांनी पुन्नला अनेक प्रश्न विचारून त्याच्या भक्तीची परीक्षा घेतली. ही प्रश्नोत्तरे अशीः

बुद्ध : तुझ्या देशातील लोक ही शिकवण स्वीकारणार नाहीत. ते तुला शिवीगाळ करतील. तुला वाईटसाईट बोलतील. त्या वेळी तू काय करशील?

पुत्र : ते लोक खूप चांगले आहेत, असं मी समजेन. कारण त्यांनी मला फक्त शिवीगाळ केली, मारलं तर नाही ना !

बुद्ध : या लोकांनी तुला मारहाण केली, तर तू काय करशील?

पुन्न : या लोकांनी मला फक्त मारहाण केली आहे, दगडाने अथवा काठीने मारहाण केली नाही, त्यामुळे हे लोक खूप चांगले आहेत, असंच मी समजेन.

बुद्ध : त्यांनी दगडानं किंवा दांडक्यानं तुला मारहाण केली, तर काय करशील?

पुन्न : त्यांनी मला मारण्यासाठी शस्त्रांचा वापर केला नाही, त्यामुळे ते चांगलेच आहेत, यावर मी विश्वास ठेवीन.

बुद्ध : त्यांनी शस्त्रांचा वापर करून तुला जखमी केलं तर तू काय करशील ?

पुन्न : या लोकांनी मला फक्त जखमी केलं आहे, मला मारून टाकलं नाही, त्यामुळे ते चांगलेच असल्याचं मी समजेन.

बुद्ध : त्या लोकांनी तुला मारून टाकलं, तर मरताना तुला कसं वाटेल?

पुन्न : माझ्याकडून पापकर्म, चुका होण्याची शक्यता होती, जीवनातून मुक्ती मिळवून देण्यास ते निमित्त ठरले म्हणून मी त्यांचे आभारच मानेन.

बुद्ध : (प्रसन्न होत…) पुत्रा, तू खऱ्या अर्थानं ज्ञान ग्रहण केलं आहेस. तेव्हा आता तू तुझ्या देशात परतू शकतोस.

भगवान बुद्ध स्वतः एका राज्यातून दुसऱ्या राज्यात, एका जंगलातून दुसऱ्या जंगलात प्रवास करत असत. एकाच ठिकाणी ते फार काळ थांबत नसत. आपल्या पावलांखाली चुकून एखादा जीवजंतू येऊन तो मृत्युमुखी पडू नये, याची काळजी घेण्यासाठी ते केवळ पावसाळ्यात एकाच ठिकाणी मुक्काम करत. तिथे त्यांचे सर्व भिक्षु सतत ध्यानसाधनेत मग्न राहत.

संघाच्या कामाचा व्याप वाढल्यानंतर बुद्धांच्या दैनंदिन सेवेची जबाबदारी त्यांचा चुलत बंधू आनंदने सांभाळली. हे काम सांभाळण्यासाठी आनंदने एकच अट घातली होती, ती म्हणजे भगवान बुद्धांची सर्व प्रवचने त्याला ऐकवली जावीत.

आनंदवर बुद्धांसोबत सतत राहण्याची, त्यांच्या आहाराची, कपडे-भांडी धुण्याची, मालिश करण्याची, लोकांच्या भेटीगाठी घडवून आणण्याची, बुद्धवाणी पाठ करण्याची… अशा अनेक जबाबदाऱ्या होत्या.

कालांतराने भगवान बुद्धांची कीर्ती सर्वदूर पसरली. 

You may like this: उपाली आणि शाक्य तरुणांची दीक्षा | Buddha Story

Follow our Podcast: Buddha Dhamma in Marathi

Conclusion

In conclusion, Punna’s declaration of following the Buddha marks a pivotal moment in his spiritual journey. By choosing to follow the Buddha, Punna embraced a path of wisdom, compassion, and liberation.

His decision symbolizes the transformative power of the Buddha’s teachings, showing that anyone, regardless of background or past, can find enlightenment and inner peace through the teachings of the Buddha.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *