Buddha Dhamma in Marathi

निर्वाण अवस्थेचे ज्ञान | Knowledge of Nirvana State of Buddha

Unlock the profound insights into the Nirvana state of Buddha. Delve into the essence of enlightenment, peace, and spiritual liberation. Explore the path to Nirvana and discover timeless wisdom for inner transformation.

Knowledge of Nirvana State of Buddha

निर्वाण अवस्थेचे ज्ञान | Knowledge of Nirvana State of Buddha
निर्वाण अवस्थेचे ज्ञान | Knowledge of Nirvana State of Buddha

एकदा एक मुलगा आपल्या आईसोबत जत्रेत गेला. तिथे तो सगळीकडे आश्चर्याने पाहू लागला. कारण तिथे अनेक प्रकारचे स्टॉल्स होते. जसे, खेळण्याची दुकाने, मिठाईची दुकाने इत्यादी. या सर्व दुकानांकडे कुतूहलाने पाहत तो आपल्या आईसोबत चालला होता.

एका दुकानातील काही खेळणी त्याला फार आवडली म्हणून तो त्यांना न्याहाळत होता. परंतु अचानक त्याला जाणवले, ‘आपली आई तर कुठे दिसत नाही.’ त्या मुलाने मागे वळून पाहिले, तर एका स्त्रीने त्याच्या आईसारखीच साडी नेसलेली होती. तिथे ती काहीतरी विकत घेत होती. तो धावत-पळत त्या स्त्रीजवळ गेला. परंतु ती त्याची आई नव्हती. त्याला वाटले, ‘नक्कीच आई या जत्रेत कुठेतरी हरवली.’ तो जोरजोरात रडू लागला.

त्या मुलाला रडताना पाहून एका दुकानदाराने त्याला खुळखुळा दाखवला. मुलाने त्या दुकानदाराच्या हातातून खुळखुळा घेतला आणि म्हणाला, ‘हा मला पाहिजेच.’ सुदैवाने त्याच्या आईने त्याच्या खिशात काही पैसे ठेवले होते.

ते देऊन त्याने दुकानदाराकडून तो खुळखुळा विकत घेतला आणि वाजवू लागला. त्यानंतर काही वेळ आईची आठवण त्याच्या मनातून धूसर झाली. मग तो पुढे चालू लागला. पण लगेच त्याला त्याच्या आईची आठवण आली. ‘माझी आई कुठे आहे’ असे म्हणून तो पुन्हा रडू लागला.



अचानक एका स्त्रीची नजर त्या मुलावर पडली. त्या स्त्रीने तिच्या केसांमध्ये गुलाबाचे फूल लावले होते. मुलाला रडताना पाहून तिने ते फूल त्याला दिले. मुलाला ते फूल खूप आवडले. थोडा वेळ तो आनंदात होता. पण आता पुन्हा त्याला त्याच्या आईची आठवण आली आणि तो रडू लागला.

या कहाणीमागचा आशय म्हणजे या जगातील सर्व बाह्य वस्तू आपल्या मनाला काही काळ संतुष्टी देतात. परंतु खरी शांती निर्वाण प्राप्त केल्यानेच मिळते. याचाच अर्थ, त्या मुलाला आई भेटल्यानंतरच खरा आनंद, संतुष्टी मिळाली. अन्यथा तो क्षणभंगुर गोष्टींमध्येच आनंद शोधत राहिला असता. चला, तर मग आता आपणही त्या आईला म्हणजेच निर्वाण अवस्थेला जाणू या.

निर्वाण अवस्था

एका मेणबत्तीच्या उदाहरणाने आपण ही निर्वाण अवस्था समजून घेणार आहोत. समजा, एक मेणबत्ती जळत आहे आणि आपण त्यावर फुंकर मारता. फुंकर मारताच मेणबत्तीची ज्योत विझते. मेणबत्ती विझवण्यासाठी तुम्ही ज्योतीवर फुंकर मारता, मेणबत्तीवर नाही. आग ज्वलंत राहण्यासाठी मेणबत्तीच्या आत असलेले मेण मदत करते. हे इंधन स्त्रोत आहे, जे अग्नी प्रज्वलित ठेवत असते.

परंतु फुंकर मारताच अग्नी गायब होतो. जणू कधी तो नव्हताच. याच प्रकारे मनुष्याच्या अंतर्यामी जेव्हा अशी अवस्था प्रकटते, तिलाच ‘निर्वाण अवस्था’ म्हटले जाते. इथे मेणबत्ती म्हणजे मनुष्याच्या शरीराचे प्रतीक. त्याच्या आत असलेले इंधन म्हणजे मेण- सेल्फ, स्वानुभव, चैतन्य आणि चेतना यांचे प्रतीक आहे.

प्रज्वलित ज्योत म्हणजे मनुष्याच्या अंतर्यामी असलेल्या अहंकाराचे प्रतीक आहे. अशा प्रकारे गुरू या अहंकाराला म्हणजे ज्योतीवर फुंकर मारण्याचे काम करतात. परंतु सर्वच लोकांमध्ये अशी अवस्था निर्माण होत नाही. कित्येक वेळा फुंकर मारल्यानंतर एखाद्या मेणबत्तीत म्हणजे व्यक्तीमध्ये ही अवस्था तयार होते. त्यानंतरच मनुष्य सांसारिक मोहमायेतून मुक्त होऊन ‘स्व’मध्ये स्थित होतो, अहंकारशून्य होतो.

यालाच ‘निर्वाण अवस्था’ असे संबोधले गेले आहे. निर्वाण या अवस्थेची अनुभूती घेता येते. परंतु शब्दात तिचे वर्णन केले जाऊ शकत नाही. जसे, जीवनानंतर मृत्यू आहे आणि मृत्यूनंतर जीवन आहे. हे जीवन-मृत्यूचे चक्र अव्याहतपणे सुरू असते. अहंकाराचा जन्म होणे… मरणे… पुन्हा जन्म घेणे… या चक्रातून मुक्त होण्यालाच ‘निर्वाण’ असे म्हणू शकतो.

मनुष्यात असलेला अहंकारच निर्वाण अवस्था प्राप्त होण्यासाठी बाधा बनतो. पण अहंकार समर्पित केल्याने मनुष्य ‘स्वानुभव’ प्राप्त करतो. हा अहंकार समर्पित करायला वेळ लागला तर तो इंद्रिय आणि वेळ यांचे बळ प्राप्त करून ज्वालेचे रूप धारण करतो. अन्यथा ती ज्योत एक फुंकर मारल्यानेच विझली असती.

मनुष्य जेव्हा निर्वाणाचे ज्ञान प्राप्त करून अहंकार समर्पित करतो, तेव्हा त्याच्या मनात सत्याप्रति प्रेम जागृत होते. या प्रकारच्या समर्पणात फुंकर जोरात मारली गेल्याने मनुष्य लवकरच सदेह मुक्ती प्राप्त करतो. भगवान बुद्धांच्या मतानुसार निर्वाणाची अवस्था तोच समजू शकतो, ज्याने याचा अनुभव करून दुःखमुक्तीची अवस्था प्राप्त केली असेल. अनुभूती नसेल तर केवळ प्रतीके आणि उदाहरणांच्या माध्यमातूनच ही अवस्था समजू शकते.

निर्वाणाची अवस्था प्राप्त केल्यानंतर स्थिरतेची स्थिती येते. ज्याप्रमाणे मेणबत्ती फुंकर मारल्यानंतर शांत आणि स्थिर होते, त्याचप्रमाणे ज्या मनुष्यामध्ये ही अवस्था प्राप्त होते त्याला, त्याचे काही हरवले आहे… त्याच्यातून काही कमी झाले आहे… असे कधीही वाटत नाही. मेणबत्ती विझली हे दिसते; परंतु मनुष्यातील अहंकार नष्ट झाला हे कोणाला दिसत नाही. कारण ती आंतरिक बाब आहे. मनुष्याला कधीही रिक्त व्हायला आवडत नाही.

तो रिक्त होत नाही म्हणून त्याच्यात ईश्वरापासून स्वतःला वेगळे मानण्याची वृत्ती, म्हणजे मेणबत्तीची ज्योत तयार होते. या ज्योतीशी (अहंकाराशी) जेव्हा प्रेम आणि क्षमा जोडली जाते, तेव्हा ती विलीन होण्यास तयार होते. त्यानंतर सत्याची फुंकर मारल्याने ती निर्वाणाला प्राप्त होते.

लोकांना निर्वाण किंवा समाधी यांसारखे शब्द सुरुवातीला आवडत नाहीत. कारण तिथे त्यांना मृत्यूच आठवतो. परंतु गुरूंनी ज्ञान दिल्यानंतर मनुष्यात ती अवस्था प्राप्त करण्याची इच्छा जागृत होते.

निर्वाण अवस्थेचे पुढील दोन प्रकार आहेत.

  1. निःशेष निर्वाण

मनुष्य मृत्यूसमयी ‘निर्वाणा’ची अवस्था प्राप्त करतो, तेव्हा तिला निःशेष निर्वाण असे म्हटले जाते. मात्र, त्या वेळी त्याच्याकडे या निर्वाण अवस्थेचा लाभ घेण्यासाठी किंवा त्या अवस्थेचे वर्णन करण्यासाठी वेळच उरत नाही. म्हणून तिला ‘निःशेष निर्वाण’ असे म्हटले गेले आहे.

मनुष्याला मृत्यूच्या वेळी शरीर वेगळे आणि तो वेगळा असे जाणवते. त्या वेळी त्याची जी अवस्था असते, ती त्याने यापूर्वी आयुष्यात कधीही अनुभवलेली नसते. इतकेच काय पण आनंदी असतानाही ही अवस्था त्याला कधीही जाणवलेली नसते. मात्र मृत्यूच्या वेळी जीवनाचे अंतिम सत्य त्याच्या लक्षात येते.

मात्र, प्रत्येक मनुष्याच्या अंतर्यामी अशी अवस्था प्रकट होईलच असे नाही. जे लोक स्वानुभवाला समजून घेण्याचा प्रिय प्रयास करतात, त्यांच्या लक्षात ही अवस्था लगेच येते.

2. अवशेष निर्वाण (सदेह निर्वाण)

अवशेष निर्वाण म्हणजे जिथे निर्वाण मिळाल्यानंतरही मनुष्याचे आयुष्य शिल्लक असते. अद्याप शरीर जिवंत आहे म्हणून या निर्वाणाला विशेष महत्त्व आहे. यासाठीच याला विशेष निर्वाण असेही म्हणू शकतो. गौतम बुद्धांना जिवंत असतानाच ही निर्वाण अवस्था प्राप्त झाली. म्हणून तिला ‘सदेह निर्वाण’ संबोधले गेले. कारण त्यांचे चरित्र जाणून लोकांच्याही मनात सत्याविषयी तृष्णा जागृत होते, प्रार्थना निघते, ‘आम्हांलाही सदेह निर्वाणाची अवस्था प्राप्त व्हावी.’

मरणोत्तर जीवनात निर्वाण

मृत्यूनंतरच्या जीवनातही शरीर म्हणजे मेणबत्ती असतेच. मनुष्य तिथेही जीवन जगत असतो. इथेदेखील त्याचा अहंकार शून्यात विलीन होऊ शकतो. काही मेणबत्त्या अशा असतात ज्यांना आपण विझवले, तरी त्या परत पेटतात. मग आपण जोरात फुंकर मारतो, जेणेकरून ती पुन्हा प्रज्वलित होऊ नये. याचाच अर्थ, काही लोकांमध्ये अहंकार नष्ट तर होतो;

पण काही काळाने तो पुन्हा जागृत होतो. अशा लोकांसाठी गुरूंना खूप काम करावे लागते. वारंवार फुंकर मारल्यानंतरही त्यांच्यातील अहंकार जागृत होतच राहतो. कारण या लोकांना मोहवश शून्याची किंवा निर्वाणाची अवस्था आवडत नाही. मोहपाशाच्या जाळ्यांतून मुक्त होणे का आवश्यक आहे हे आता आपण समजून घेऊ या.

मोहमायेचे जाळे

ज्या लोकांनी स्वतःला मोहमायेच्या बंधनांतून मुक्त केले आहे, ज्यांना सत्याचे ज्ञान झाले आहे, असेच लोक या सत्यमार्गावर मार्गक्रमण करू इच्छितात. अन्यथा इतर कुणाला याचा विचारदेखील येणार नाही. काही लोक मोहमायेच्या जाळ्यातून ज्योतीपासून ज्वाळा बनले आहेत. त्यांच्यात अहंकार इतका ठासून भरलेला असतो, की तो कितीही नष्ट करण्याचा प्रयत्न केला, तरीदेखील नष्ट होत नाही.

विकार म्हणजे अशी ज्वाळा ज्याला आपण कितीही फुंकर मारली तरी ती विझत नाही. अशा लोकांना सत्याचा मार्ग आवडत नाही. शिवाय, जे लोक त्या मार्गावर वाटचाल करतात, त्यांनादेखील त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न ते करतात. अशा लोकांसाठी बुद्धांसारख्या गुरूंची नितांत आवश्यकता असते.

अंगुलीमालचे उदाहरण आपण ऐकलेच असेल. अंगुलीमाल असा दरोडेखोर होता, जो लोकांना मारून, त्यांची बोटं कापून त्यांची माळ बनवून ती आपल्या गळ्यात घालत असे. परंतु भगवान बुद्धांच्या संपर्कात येताच त्याची हत्या करण्याची, बोटं जमा करण्याची वृत्ती नष्ट झाली. याचाच अर्थ, गुरूंच्या सान्निध्यात आल्यानंतर डाकूंमध्येदेखील परिवर्तन घडते.

मात्र, काही लोक असे असतात, जे गुरूंच्या संपर्कात आधीपासून असले तरी त्यांच्यात तीळमात्रही बदल घडत नाही. जसा, भगवान बुद्धांचा भाऊ देवदत्त. सिद्धार्थान राजा बनूच नये अशी त्याची इच्छा होती. बालपणापासूनच त्याच्या मनात सिद्धार्थांविषयी द्वेष, मत्सराची भावना होती. अशा लोकांवर गुरूंच्या फुंकर मारण्याचा काहीही परिणाम होत नाही.

सिद्धार्थांना जेव्हा निर्वाण अवस्था प्राप्त झाली आणि ते भगवान बुद्ध बनले, तेव्हा निर्वाण म्हणजेही राजा बनण्यासारखेच एक पद असेल, असे त्याला वाटले. ज्याप्रमाणे त्याला राजा बनायचे होते, त्याप्रमाणे आता हे निर्वाण पदही प्राप्त करायचे होते. परंतु ही अवस्था प्राप्त करण्यासाठी अहंकार समर्पित ‘करून त्याला शून्य व्हावे लागेल, हे ठाऊक नव्हते. कारण अहंकाराच्या समर्पणाने निर्वाण अवस्था प्राप्त होऊ शकते; देवदत्त नाव ठेवल्याने नाही. 

You may like this: अनुभवातून निघालेली साद | Buddha Teachings in Marathi

Follow our Podcast: Buddha Dhamma in Marathi

Conclusion

In conclusion, the concept of Nirvana in Buddhism represents the ultimate goal of spiritual practice – the cessation of suffering and the attainment of enlightenment.

Through the teachings of Buddha, we learn that Nirvana is not a distant or unattainable state, but rather a profound realization of our true nature. By cultivating mindfulness, compassion, and wisdom, we can all move closer to experiencing the peace and liberation that Nirvana offers.

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *