Buddha Dhamma in Marathi

अनुभवातून निघालेली साद | Buddha Teachings in Marathi

Explore the profound teachings of Buddha in Marathi, delving into the depth of wisdom and peace. Gain insights on how to lead a simple and fulfilling life through Buddha’s timeless philosophy. Dive into this enlightening journey with us.

Buddha Teachings in Marathi

अनुभवातून निघालेली साद | Buddha Teachings in Marathi
अनुभवातून निघालेली साद | Buddha Teachings in Marathi

बुद्धांचा चुलत भाऊ देवदत्त अगदी लहानपणापासूनच बुद्धांचा मत्सर करत होता. बुद्धांना सत्यप्राप्ती झाल्यानंतर पुन्हा जेव्हा ते आपल्या राज्यात परतले, तेव्हाही देवदत्तच्या मनात त्यांच्याविषयी मत्सर कायमच होता.

बुद्धांच्या कुटुंबातील बहुतेक सर्वांनीच त्यांच्याकडून दीक्षा घेतल्यानंतर नाइलाजाने देवदत्तलाही बुद्धांकडून दीक्षा घ्यावी लागली. त्याच्या मनात बुद्धांविषयीचा तिरस्कार काठोकाठ भरलेला होता. म्हणून बुद्धांना इजा पोहोचेल, त्यांचे नुकसान होईल यासाठी तो सतत कट-कारस्थाने करू लागला.

संघातील लोकांचे कान फुंकून, त्यांना भडकावून तो आपल्याकडे वळवू लागला. सुरुवातीला लोकांना त्याचे म्हणणं खरे वाटत असल्याने ते देवदत्तला साथ देत असत. काही काळानंतर मात्र यामागे त्याचा असलेला कुटील हेतू या सर्वांच्याच लक्षात आला. मग त्यांनी देवदत्तची साथ सोडून दिली.

त्यानंतर देवदत्तने दुसरा मार्ग अवलंबला. त्याने आपल्या मित्राचा मुलगा राजा अजातशत्रू यांचे कान फुंकले. त्यामुळे राजा अजातशत्रू बुद्धांचा कडवा विरोधक बनला. त्याने आपल्या राज्यातील बुद्धांच्या समर्थकांना तुरुंगात टाकण्याचा धडाकाच लावला. बुद्धांचे समर्थक असलेल्या आपल्या पित्यालाही अजातशत्रूने बंदिवान केले.



एके दिवशी देवदत्त व अजातशत्रू या दोघांनी बुद्धांच्या हत्येचा कट आखला. त्या दिवशी अजातशत्रूने आपल्या सर्वात बलवान हत्तीला खूप मद्य पाजले. ज्या वेळी बुद्ध जंगलात एकटेच जात होते, त्या वेळी त्यांच्या अंगावर या हत्तीला सोडले. मद्याची नशा चढल्याने हा हत्ती पिसाळून बुद्धांच्या दिशेने धावत निघाला होता. रस्त्यात येणारे सर्व अडथळे तो उखडून फेकून देत होता.

बुद्धांनी हे दृश्य पाहिले. तरीही ते शांतपणे मार्गक्रमण करत राहिले. मात्र, बुद्धांच्या जवळ जाताच तो हत्ती थबकला आणि शांत झाला. बुद्धांसमोर झुकून त्याने बुद्धांना अभिवादन केले. ते दृश्य पाहून अजातशत्रू आणि त्याचे साथीदार आश्चर्यचकित झाले. अनिमिष नेत्रांनी ते हे दृश्य पाहतच राहिले.

मात्र हा चमत्कार कसा झाला, हे कुणालाच समजू शकले नाही. खरे तर त्या वेळी भगवान बुद्ध आत्मगत शांत भावाने हत्तीच्या समोर चालत गेले. व्यक्ती जर स्वानुभवात लीन असेल, तर समोरच्या शरीरातील स्वानुभवास आपसुक साद घातली जाते. अशा वेळी समोरची व्यक्ती आपल्याला कुठलीही हानी पोहोचवू शकत नाही.

त्यामुळे बुद्ध व्यक्तींच्या केवळ अस्तित्वानेच कित्येक अनुकूल गोष्टी सहजतया घडतात. म्हणूनच स्वानुभूती मिळवणे या जगासाठी फार उपयुक्त ठरते. भगवान बुद्ध स्वानुभूतीत लीन असल्यामुळेच त्या मदमस्त हत्तीमधील चैतन्य जागृत झाले. चेतना जागृत झाल्यानंतर तो हत्ती बुद्धांसमोर नतमस्तक होऊन त्यांना अभिवादन करू लागला.

कारण त्या हत्तीतही तेच चैतन्य होते, ज्याला बुद्धांनी आपल्या स्वानुभूतीद्वारे साद घातल्याने ते जागृत झाले. तुम्ही दिवसभर अनेक लोकांना भेटता, पण तुमच्यातील चैतन्याला कोणी साद घालत नाही. कारण जोपर्यंत तुम्ही सत्य श्रवण करत नाही, तोपर्यंत स्वतःला शरीर समजूनच जगत असता. अनेक ठिकाणी जाता, अनेक लोकांना भेटता. पण तुमच्या चेतनेला कुणी साद घालत आहे, याचा अनुभव तुम्हांला कधी आलाय का?

या घटनेनंतरही राजा अजातशत्रूसह देवदत्त बुद्धांविरुद्ध विविध कट-कारस्थाने करत राहिला. शेवटी अनेक रोगांनी देवदत्तला ग्रासले, त्यातच त्याचा अंत झाला. पण अशा अनेक चुका आणि गैरवर्तणूक करणाऱ्या देवदत्तला भगवान बुद्धांनी सदैव क्षमाच केली.

You may like this: The story of the Buddha in Marathi

Follow our Podcast: Buddha Dhamma in Marathi

Conclusion

In conclusion, the teachings of Buddha resonate deeply with the essence of simplicity, peace, and wisdom. By embracing these teachings in Marathi, we not only honor our cultural roots but also find a universal path to a more meaningful and fulfilling life. Let Buddha’s timeless wisdom guide us towards inner peace and enlightenment.

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *