Experience the remarkable story of the Buddha, his quest for truth, and the enlightenment that changed the world. Discover the profound lessons that resonate through the ages.
The story of the Buddha
एका आठवड्यानंतर गौतम बुद्ध हे सर्वोच्च ज्ञान प्रदान करण्यासाठी सुयोग्य व्यक्तीच्या शोधार्थ निघाले. ज्या व्यक्तीचा आधीच एवढा विकास झालेला असेल, की हे ज्ञान थेट शब्दांद्वारे ती आत्मसात करू शकेल, अशी व्यक्ती म्हणजे ग्रहणशील, पात्र व्यक्ती!
गौतम बुद्धांना आठवडाभर या गोष्टीचे वारंवार आश्चर्य वाटत होते, की हे रहस्य समजून घेणे किती सोपे आहे. ज्या व्यक्तीत कुठलाही पूर्वग्रह नाही, ती हे रहस्य त्वरित समजू शकेल. पण एखाद्या अपात्र व्यक्तीसाठी मात्र हे ज्ञान आत्मसात करणे सर्वात कठीण गोष्ट ठरते.
मानसिक विषय समजून घेण्यासाठी पात्र व्यक्ती सहजपणे मिळतात. आजपर्यंत अनेक वैज्ञानिकांनी, संशोधकांनी मोठमोठे शोध लावले आहेत. त्यांनीही प्रदीर्घ काळ संशोधन केल्यानंतर त्यांना हे वैज्ञानिक रहस्य उलगडले. मग त्यांनी धावत जाऊन आपल्या सहकाऱ्यांना, मित्रांना, शिक्षकांना आपले संशोधन सांगितले. त्यानंतरच त्या सर्वांनाही ते समजले. मग त्यांचे हे संशोधन समजू शकणारे अनेक जण त्यांना भेटले.
बुद्धांना अनेक दिवस अशी एकही व्यक्ती भेटली नाही, जी ब्रह्मांडांचे रहस्य समजण्यास पात्र असेल. कारण ही गोष्ट मनाच्याही पलीकडची होती. ती समजून घेण्यास पात्रता आवश्यक होती. तत्कालीन लोक खूप कर्मठ परंपरा, धारणांमध्ये जगत असल्याने ते ही गोष्ट समजू शकत नव्हते.
गौतम बुद्धांना हे ज्ञान आपल्या जुन्या गुरूंना- आलार कलाम यांना- देण्याची इच्छा होती, पण तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. आता त्यांच्यासोबत असलेले पाच साथीदार यासाठी पात्र ठरू शकत होते. बुद्ध प्रवास करत करत त्यांच्याकडे आले. प्रथम कौंडण्य आणि त्याचे साथीदार बुद्धांवर बहिष्कार टाकण्याचाच विचार करत होते.
परंतु बुद्धांच्या सान्निध्यात आल्यावर त्यांचे तेज पाहून हे सर्व जण त्यांना शरण गेले, समर्पित झाले. त्यांना उमगले, की गौतमांच्या शरीरात अंतिम सत्य प्रकटले आहे. त्यांनी तत्क्षणी गौतम बुद्धांना आसन देऊन आपली भक्ती व्यक्त केली. अनेक वर्षांच्या तपस्येनंतर ते सत्य श्रवण करण्यासाठी आसुसले होते. तेव्हा बुद्धांनी त्यांच्यासाठी पहिले ज्ञानशिबिर घेतले.
गौतम बुद्धांनी आपल्या प्रवचनात, ‘आत्मा, परमात्मा, आकार-निराकार, स्वर्ग- नरक, मागील जन्मांची कर्मे’ अशा शब्दांचा वापरच केला नाही. या शब्दांमुळे लोक विनाकारण बुद्धिविलासात गुरफटून बुद्धी आणि वेळेचा योग्य उपयोग न करता मोक्षप्राप्तीपासून वंचित राहतील, असे त्यांना वाटत असे.
असेच एकदा बुद्ध फिरत फिरत एका गावात पोहोचले. तेथील लोकांना गौतम बुद्धांच्या आगमनाविषयी समजताच, ते बुद्धांचा उपदेश ऐकण्यासाठी एकत्र जमले. बुद्धांशी संवाद सुरू झाल्यावर एकाने त्यांना प्रश्न विचारला, ‘तुम्ही आतापर्यंत आत्म्याविषयी काहीही सांगितलं नाही, आत्मा असतो का, कृपया याविषयी आम्हांला मार्गदर्शन करा.’ हा प्रश्न ऐकून बुद्ध मौन झाले. त्यांनी डोळे मिटून घेतले.
गौतम बुद्धांच्या शिष्यांना बुद्ध या प्रश्नाचे उत्तर देणार नाहीत, हे ठाऊक होते. कारण यापूर्वी त्यांनी बुद्धांना अशाच प्रकारचे प्रश्न विचारले होते, उदाहरणार्थ, मृत्यूनंतर आत्मा कुठे जातो? स्वर्ग कसा असतो ? परमात्मा कसा दिसतो? असे अनेक प्रश्न बुद्धांना विचारले गेले होते.
अशा वेळी बुद्ध मौन बाळगत असत किंवा ते एका वाक्यात उत्तर देत, ‘तथागतांनी या गोष्टी अव्यक्त ठेवल्या आहेत.’ त्यामुळे या विषयांवर आपल्याला चर्चा करता येणार नाही, हे शिष्य समजून घेत. मग तो विषय टाळूनच ते इतर विषयांवर चर्चा करत.
या वेळीही बुद्धांनी कुठलेही उत्तर न देता, डोळे मिटून घेतले. काही क्षणांनंतर त्यांनी डोळे उघडले आणि उपस्थित सर्वांना उद्देशून ते म्हणाले, ‘एखाद्याला बाण लागल्यानंतर हा बाण कोणी सोडला आहे, कुठल्या धनुष्यातून तो सुटला आहे, कुठल्या धातूचा आहे, त्यावर कोणतं विष लावले आहे, या विषानं किती लवकर मृत्यू येतो, सर्वप्रथम याविषयी माहिती आणा, मगच हा बाण काढा… असं तो विचारतो का? नाही.
सर्वात आधी तो बाण काढण्याचा प्रयत्न करेल. मग या कमी महत्त्वाच्या, व्यर्थ गोष्टींवर विचार केला जाऊ शकतो. पहिल्यांदा दुःखापासून मुक्त होणं गरजेचं असतं. त्यानंतर या बुद्धिविलासाच्या गोष्टी करायला हव्यात.’ हे ऐकल्यानंतर ‘अशा प्रश्नांचं उत्तर मिळालं, तरी आपले दुःख संपणार नाही. त्यामुळे त्यात वेळ वाया न घालवता दुःखमुक्तीच्या उपायांना प्राधान्य द्यायला हवं, असे बुद्धांना समजावून सांगायचं आहे,’ याची जाणीव त्या गावातील लोकांना झाली.
एके दिवशी जंगलातून जात असताना हीच गोष्ट आणखी स्पष्ट करण्यासाठी बुद्धांनी जमिनीवर पडलेली काही पानं आपल्या मुठीत घेतली आणि म्हणाले, ‘भिक्षंनो, जेवढी पानं माझ्या मुठीत आहेत, त्याच्या कितीतरी पटीनं जास्त पानं या जंगलातील झाडांवर आहेत. तुम्हां सर्वांना जितकं आवश्यक आहे, तितकंच मूठभर ज्ञान मी दिलं आहे.
यापेक्षा जास्त ज्ञानही माझ्याकडे आहे. पण तुमच्या मुक्तीसाठी त्या ज्ञानाची गरज नाही. या सिद्धान्तावर काम करून तुम्ही दुःखमुक्त व्हा. व्यर्थ बुद्धिविलासात अडकून न राहता वेळेचा सदुपयोग करा. हेच ज्ञान तुम्हांला निर्वाणपद देईल.’ त्यामुळे बुद्धिविलासाच्या गोष्टींत अडकून वेळ वाया घालवायचा नाही, हे शिष्यांना उमगले.
अशा प्रकारे आपल्या पाच साथीदारांना भगवान बुद्धांनी पहिला बोध दिला. त्यानंतर आपल्या या साथीदारांसमवेत ते सत्यप्रसारासाठी निघाले. भगवान बुद्धांच्या आगमनाची वार्ता समजताच संबंधित राज्यातील राजे त्यांचा उपदेश ऐकण्यासाठी येत. काही राजांनी बुद्धांकडून दीक्षा घेतली. त्यामुळे त्या राज्यातील प्रजाजन आणि प्रसेनजित, बिंबिसार आदी राजा बुद्धांना शरण आले.
शुद्धोधन राजांनाही भगवान बुद्धांना बोध प्राप्त झाला आहे; आणि ते आपल्या राज्याच्या जवळच आले आहेत, हे समजले, तेव्हा त्यांनी आपल्या पुत्राला राज्यात येण्याचे निमंत्रण दिले. बुद्धांनी हे निमंत्रण स्वीकारून ते कपिलवस्तूत परतले. आपला मुलगा आपल्याच राज्यात भिक्षा मागतो आहे, हे जेव्हा राजा शुद्धोधनाना समजले, तेव्हा त्यांना खूपच वाईट वाटले.
ज्या रस्त्यांवरून गौतमांचे रथ जायचे, तेथूनच ते भिक्षा मागत फिरत आहेत, ही बाब शुद्धोधन राजास खूपच खटकली. बुद्धांना भेटल्यानंतर त्यांनी त्याविषयी नाराजी व्यक्त केली. त्या वेळी बुद्ध म्हणाले, ‘भिक्षा मागणं, हीच आपल्या वंशाची परंपरा आहे.’ त्यावर शुद्धोधन आश्चर्याने म्हणाले, ‘आपल्या वंशाची अशी कुठलीही परंपरा नाही.’
तेव्हा बुद्ध उत्तरले, ‘मी तुमच्या नव्हे, तर माझ्या वंशाविषयी सांगतोय. माझा वंश हा बुद्धांचा वंश आहे. या वंशात स्वतःचा उदरनिर्वाह भिक्षा मागूनच केला जातो.’ राजा शुद्धोधनांनी बुद्धांचे काहीही न ऐकता, त्यांचे मन वळवून त्यांना राजमहालात नेले. मग तिथे बुद्धांनी भोजन केले. बुद्धांची आई प्रजापती गौतमीने बुद्धांचा उपदेश ऐकून त्यांच्याकडून दीक्षा घेतली.
You may like this: प्रत्येक परीक्षेत यशस्वी | Buddha Tales in Marathi
Follow our Podcast: Buddha Dhamma in Marathi
Conclusion
In conclusion, the story of the Buddha is a testament to the transformative power of compassion, wisdom, and inner peace.
His journey from a life of luxury to one of spiritual awakening serves as an inspiration to all who seek meaning and purpose. Through his teachings, the Buddha offers a timeless message of hope, urging us to cultivate mindfulness, kindness, and understanding in our lives.
May we all find the path to enlightenment and peace, following in the footsteps of the Buddha.
One Comment